Tikhat Mithachya Purya (तिखटमिठाच्या पुऱ्या) – Spicy Puri / Indian Bread
तिखटमिठाच्या पुऱ्या – चवदार खुसखुशीत पुऱ्या मराठी
These are Puri’s with added spices. In Maharashtra, we call it Tikhat Mithachi Puri (Namkeen / Spicy Puri). I’m sure, every region in India has something similar with a different name. These are very tasty Puris that you can have for Breakfast / Snack or as a part of meal.
Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)
Wheat Flour 1 cup
Bengal Gram Flour (Besan) ¼ cup
Chili Powder ½ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida a pinch
Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon
Oil 1 teaspoon
Salt to taste
Oil for deep frying
Instructions
1. Mix all the ingredients and bind a stiff dough using water. Leave it to rest for 30 minutes.
2. Take a small dough ball and roll a little thick round Puri and deep fry in hot oil on medium flame. While frying Puri, gently press the Puri with Frying Strainer; this way Puri will puff properly.
3. Serve these puffed Puri’s with Chutney / Sauce / Curd / Subji. You can serve these as a part of meal or for breakfast or evening snack.
==================================================================================
तिखटमिठाच्या पुऱ्या – चवदार खुसखुशीत पुऱ्या
ह्या चवदार खुसखुशीत पुऱ्या करायला अगदी सोप्या आहेत. तुम्हीही करत असाल. पुऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. मी ह्या पुऱ्यात कणकेसोबत थोडं बेसन घालते. चवीसाठी लाल तिखट आणि ओवा घालते. पुऱ्यांचं पीठ घट्ट भिजवावं म्हणजे पुरी लाटताना सुकं पीठ लावावं लागत नाही. सुकं पीठ पुऱ्या तळताना तेलात पडून तेल काळं होतं. ह्या पुऱ्या तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा जेवणात भाजीसोबत खाऊ शकता.
साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
कणिक १ कप
बेसन पाव कप
लाल तिखट अर्धा टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग १ चिमूट
ओवा अर्धा टीस्पून
तेल १ टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल पुऱ्या तळण्यासाठी
कृती
१. एका परातीत सर्व साहित्य घेऊन थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्या. पीठ ३० मिनिटं झाकून ठेवा.
२. पीठ नीट मळून छोट्या गोळ्या करा. थोड्या जाडसर पुऱ्या लाटून गरम तेलात तळून घ्या. तळताना झाऱ्याने पुरी सर्व बाजूनी हलकेच चेपून तळा म्हणजे पुरी छान फुगेल.
३. गरमगरम खुसखुशीत पुऱ्या चटणी / लोणी / दही / सॉस / भाजीसोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes