Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ) – Savory Vegetable Cake

Handvo (हांडवो - चविष्ट गुजराती पदार्थ)

Handvo (हांडवो चविष्ट गुजराती पदार्थ) – Savory Vegetable Cake

हांडवो चविष्ट गुजराती पदार्थ मराठी

This is a popular Gujarati snack. It has different lentils, rice and veggies. So it is Proteins, Carbs and vitamin rich healthy and tasty snack. I use Handvo dry flour that is available in grocery store and add Bottle Gourd. You can Carrots, Cabbage, Spring Onion or mix veggies also. Handvo is either baked in Oven or roasted in a Wok / Griddle on low flame.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Handvo dry Flour 1 cup (this is easily available in grocery store)

Curd ¼ cup

Bottle Gourd (Dudhi) Grated 1 cup (use along with peel if peel is tender)

Oil 2 Tablespoon

Baking Soda a pinch

Fruit salt 1 teaspoon

Chili Paste ½ teaspoon

Ginger Paste ½ teaspoon

Cumin Powder ¼ teaspoon

Coriander Powder ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

White Sesame Seeds 1 tablespoon

Sugar 1 tablespoon

Salt to taste

For Tempering

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ½ teaspoon

Asafoetida a pinch

Curry leaves 8-10

White Sesame Seeds 1 teaspoon

Instructions

1. Mix Handvo flour, Curd and some water to make a thick batter – thicker than Idli / Pan Cake batter. Keep it for 6-8 hour for fermentation.

2. Add grated Bottle Gourd, Chili paste, Ginger paste, Cumin powder, Coriander Powder, Sugar, Turmeric Powder, White Sesame Seeds and salt. Mix well. If batter is too thick add some water. Consistency should be like Idli / Pan Cake batter.

3. Add oil and baking soda. Mix well.

4. Pre-heat over on 200 degrees Celsius.

5. In a small griddle, heat oil for tempering on low flame. Add mustard seeds and wait for splutter. Add Asafoetida, Sesame seeds and curry leaves. Switch off the gas.

6. Grease the baking tray with oil.

7. Add Fruit Salt to Handvo batter and mix well.

8. Pour the batter in the greased baking tray.

9. Spread Tempering on Handvo batter to cover the surface. Do not Mix the batter.

10. Bake on 200 degrees Celsius for 50 to 60 minutes. When the edges of Handvo are brown and the knife comes out clean, Handvo is done.

11. Serve with Chutney / Sauce of you choice. You can eat Handvo hot or cold. It tastes yummy.

Note

1. Instead of / In addition to Bottle Gourd, you can add Carrots, Cabbage, Spring Onion or Mix veggies.

2. You can also add chopped coriander if you like.

3. Another variation is to add chopped garlic to tempering. This gives a nice taste to Handvo.

4. You can add white sesame seeds in tempering only and not add in the batter. Alternatively, you can skip sesame seeds from the tempering and add only in batter. But sesame seeds added to tempering makes Handvo more yummy.

Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)
 
Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)
          ===================================================================================

हांडवो चविष्ट गुजराती पदार्थ

गुजराती पदार्थांमध्ये ढोकळा, मुठिया सगळ्यांना माहिती असतात. पण हांडवो हा प्रकार फार थोड्या जणांना माहित असतो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा पदार्थ ओव्हनमध्ये किंवा कढईत / तव्यावर पीठ पसरून झाकण ठेवून मंद आचेवर भाजून करतात. हांडव्याचं सुकं पीठ किराणा दुकानात मिळतं यात प्रकारच्या डाळी आणि तांदूळ एकत्र दळलेलं असतं. पीठ आंबवून त्यात भाज्या आणि मसाले घालून भाजून हांडवो बनवतात. मी ह्यात दुधी भोपळा घालते. तुम्ही गाजर, पातीचा कांदा, कोबी किंवा मिक्स भाज्या घालू शकता. हांडवो नाश्त्याला किंवा साईड डिश म्हणून खाऊ शकता. आमच्या घरी तर सूप आणि हांडवो आम्ही जेवण म्हणून खातो. रेसिपी सोपी आहे.

साहित्य ( जणांसाठी) ( कप = २५० मिली)

हांडव्याचं पीठ १ कप

दही पाव कप

किसलेला दुधी भोपळा १ कप (साल कोवळी असेल तर सालीसकट किसा)

तेल २ टेबलस्पून

खायचा सोडा एक चिमूट

फ्रुट सॉल्ट (इनो) १ चमचा

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

ठेचलेलं आलं अर्धा चमचा

जिरेपूड पाव  चमचा

धणेपूड पाव चमचा

हळद पाव चमचा

तीळ १ चमचा

साखर टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ चमचा

मोहरी अर्धा चमचा

हिंग १ चिमूट

तीळ १ चमचा

कढीपत्ता ८१० पानं

कृती

. हांडव्याचं पीठ,दही आणि थोडं पाणी एकत्र करून भिजवा. इडलीच्या पिठाएवढं पातळ पीठ भिजवा आणि ६८ तास झाकून ठेवा

. पिठात किसलेला दुधी, ठेचलेली मिरची, ठेचलेलं आलं, जिरेपूड, धणेपूड, साखर, हळद, तीळ आणि मीठ एकजीव करा. इडलीच्या पिठाएवढं पातळ पीठ भिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.     

. तेल आणि खायचा सोडा घाला. मिक्स करा

. ओव्हन २०० डिग्रीवर गरम करायला ठेवा

. एका कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा. गॅस बंद करून फोडणी जरा गार होऊ द्या.   

. बेकिंग ट्रे ला तेल लावून घ्या.

. पिठात इनो फ्रुट सॉल्ट घालून लगेच ढवळून घ्या.

. पीठ तेल लावलेल्या ट्रे मध्ये ओतून घ्या

. पिठावर फोडणी नीट पसरून घाला. पीठ ढवळू नका.

१०. २०० डिग्रीवर ५० ते ६० मिनिटं भाजून घ्या. भाजलेला हांडवो कडेने ब्राऊन दिसेल आणि सूरी घालून पाहिलं तर सुरीला पीठ चिकटणार नाही.

११. तयार हांडवो कापून घ्या आणि तुमच्या पसंतीच्या चटणी / सॉस बरोबर खायला द्या. हांडवो गार किंवा गरम कसाही खाऊ शकतामस्त यम्मी लागतो

टीप

. दुधी भोपळ्याऐवजी गाजर, पातीचा कांदा, कोबी किंवा मिक्स भाज्या घालू शकता.

. आवडत असेल तर पिठात चिरलेली कोथिंबीर घाला.

. जरा वेगळी चव हवी असेल तर फोडणीत लसूण चिरून घाला आणि लालसर रंगावर परतून घ्या. छान लागतं.

. ह्यात मी तीळ पिठात आणि फोडणीत घालते. तुम्हाला जास्त तीळ घालायचे नसतील तर फक्त फोडणीत घाला. तीळ फोडणीत घातल्यावर लगेच झाकण ठेवा म्हणजे तीळ सगळीकडे उडत नाहीत

Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)
Handvo (हांडवो – चविष्ट गुजराती पदार्थ)
 

3 Comments

  1. मला ही रेसिपी करुन बघायची आहे पण Handvo पीठ घरी कसं बनवायचं ते सांगाल का? म्हणजे घरची पीठे वापरुन करता येईल का दळून आणावे लागेल?
    धन्यवाद.

    • मी रवा आणि डाळी घालून ही हांडवो करते. त्याची रेसिपी पोस्ट करेन. 
      Sudha

Your comments / feedback will help improve the recipes