Avial (अवियल) – Mix Vegetable from South India – No Onion Garlic Recipe
Avial is a type of mix vegetable from southern India. There are different recipes of Avial in different regions. I use the following recipe to make Avial. I was told sweet corn is not added in traditional Avial. But I add it because we all love it and believe Avial tastes better with Sweet corn. You can add Green peas/ Beans or any veggies of your choice. This is a No Onion, Garlic recipe and has minimal spices. But it’s very yummy.
Ingredients (Serves 6) (1 cup = 250 ml)
Pumpkin 100 gms
Carrots 100 gms
Suran (Yam) 100 gms
Drumstick 1
Sweet Corn ½ cup
Fresh scraped coconut 3 tablespoon
Cooked rice 1 tablespoon
Green Chilies 3-4 (Add more if you want it spicy)
Curd / Yogurt 2 tablespoon
Coconut Oil / any other oil 1 tablespoon
Cumin Seeds ½ teaspoon
Asafoetida 2 pinch
Cumin Powder ½ teaspoon
Salt to taste
Sugar ½ teaspoon (optional)
Curry leaves 8-10
Chopped coriander 1 teaspoon
Instructions
1. Wash, Peel and cut Pumpkin, Carrots, Yam as long rectangular pieces about 2 inch long (like French fries). Boil them separately with water and a pinch of salt till almost cooked
2. Wash and cut drumsticks in 2 inch pieces. Boil them in water and a pinch of salt till cooked.
3. Wash Sweet corn. Add little water and cook in microwave on high for 4 minutes. Or cook in pressure cooker.
4. Grind fresh coconut, curd, cooked rice and green chilies into a coarse paste. Add little water while grinding.
5. In a pan, mix all veggies and coconut paste, cumin powder. Add water to adjust consistency. Cook of low flame for 5 minutes.
6. In a ladle, heat oil (coconut oil tastes better but you can use any cooking oil) for tempering. Add cumin seeds; wait till splutters; add Asafoetida; add curry leaves
7. Pour Tempering in the pan. Add salt, sugar (optional) and chopped coriander and cook for a minute.
8. Delicious Avial is ready. Serve hot with Rice or Roti. Or you can eat it as it is without any accompaniment.
Note
1. Instead of cooked rice, you can add ¾ teaspoon rice flour mixed with water.
==================================================================================
अवियल (Avial) – दक्षिण भारतीय मिक्स भाजी – कांदा लसूण विरहित
ही एक प्रकारची दक्षिण भारतीय मिक्स भाजी आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ही भाजी केली जाते पण यात हिरवी मिरची आणि जिरं सोडून काहीही मसाले नसतात. ही सात्विक भाजी खोबरेल तेलात केली की अजून छान लागते. तुम्ही ह्यात तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या घालू शकता. जसे मी यात स्वीट कॉर्न घालते. पारंपरिक रेसिपीत घालत नाहीत पण खूप छान लागतात. नक्की करून बघा ही वेगळ्या चवीची भाजी.
साहित्य (६ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
लाल भोपळा १०० ग्राम
गाजर १०० ग्राम
सुरण १०० ग्राम
शेवग्याची शेंग १
स्वीट कॉर्न अर्धा कप
ताजा खवलेला नारळ ३ टेबलस्पून
शिजलेला भात १ टेबलस्पून
हिरव्या मिरच्या ३–४ ( तिखट हवे असेल तर जास्त घाला )
दही २ टेबलस्पून
तेल १ टेबलस्पून (मी खोबरेल तेल वापरते )
जिरं अर्धा चमचा
हिंग २ चिमूट
ताजी जिरेपूड अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
साखर अर्धा चमचा (ऐच्छिक)
कढीपत्ता ८–१० पानं
चिरलेली कोथींबीर १ चमचा
कृती
१. लाल भोपळा, गाजर आणि सुरण धुवून सोलून घ्या. २ इंच लांबीचे पातळ चौकोनी तुकडे करा (फ्रेंच फ्राईज सारखे ). चिमूटभर मीठ पाण्यात टाकून हे सगळे गॅसवर एका पाठोपाठ एक वेगवेगळं शिजवून घ्या. म्हणजे तेच पाणी परत वापरता येईल. मऊ झाले की पाण्यातून काढून घ्या.
२. शेवग्याची शेंग धुवून २ इंच लांबीचे तुकडे करून मिठाच्या पाण्यात शिजवून घ्या.
३. स्वीट कॉर्न पाणी घालून मायक्रोवेव्ह मध्ये ४ मिनिटं शिजवा किंवा प्रेशर कुकर मध्ये शिजवा.
४. मिक्सर च्या भांड्यात नारळ, दही, हिरवी मिरची आणि शिजलेला भात जाडसर वाटून घ्या. वाटताना थोडं पाणी घाला.
५. एका पातेल्यात सर्व भाज्या, वाटलेला नारळ, जिरेपूड घालून मिक्स करा. पाणी घालून हवे तसे पातळ करा . मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.
६. फोडणीच्या छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करा .
७. ही फोडणी पातेल्यात घाला.
८. साखर, मीठ आणि ,कोथिंबीर घालून एक उकळी काढा.
९. चविष्ट अवियल तयार आहे. गरमागरम अवियल भात / पोळीसोबत खायला द्या. ही भाजी नुसतीच खायला पण छान लागते.
टीप
१. शिजलेल्या भाताऐवजी पाऊण चमचा तांदुळाचं पीठ पाण्यात मिक्स करून घालू शकता.
tasty one
Yes Kumar. My favorite. Thank you.