Tinda Masala Dry Subji (ढेमसं (टिंडा)  मसाला सुकी भाजी) – Indian Round Gourd / Apple Gourd Dry Subji

Tinda Masala
Tinda Masala

Tinda Masala Dry Subji (ढेमसं (टिंडामसाला सुकी भाजी) Indian Round Gourd / Apple Gourd Dry Subji

ढेमसं (टिंडा) मसाला सुकी भाजी मराठी

I’d never tasted Tinda till recently as this was not cooked in my mother’s house. It’s only when I read a Tinda Recipe from my friend on a food group, I decided to try it out. It came out really well. So as always, I changed the recipe a bit and made Tinda Masala Subji. It’s an easy recipe and makes tasty subji.

In Marathi Tinda is called by a funny name – Dhemase (ढेमसं).

Ingredients (Serves 3)

Tinda ¼ kg

Onion 2 medium finely chopped

Roasted Peanut Powder 2 tablespoon

Fresh Scraped coconut 1 tablespoon

Red Chili Powder ½ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Coriander Powder ¼ teaspoon

Chopped Coriander 1 tablespoon

Sugar ½ to 1 teaspoon

Aamchoor (Mango Powder) ½ teaspoon

Salt to taste

For Tempering

Oil 1 tablespoon

Mustard seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida a pinch

Instructions

1. Wash and chop Tinda into medium size pieces.

Tinda (Dhemase)
Tinda (Dhemase)
Chopped Tinda (Dhemase)

 

2. In a pan, heat oil.

3. Add Mustard seeds, wait for splutter; Add Cumin Seeds, wait for splutter; Add Turmeric Powder and Asafoetida.

4. Add chopped Onion; saute on low flame till translucent.

5. Add coconut; saute on low flame for 2 minutes.

6. Add Tinda, saute on low flame for 2 minutes.

7. Cook covered till Tinda is soft; Sprinkle little water if required.

8. Add Chili Powder, Garam Masala, Aamchoor, Coriander Powder, Sugar, Salt and Mix.

9. Add Roasted Peanut Powder; chopped coriander and Mix.

10. Delicious Tinda Masala is ready. Serve hot with Roti (Indian Bread).

Note

1. Tender Tinda do not have any seeds or have soft seeds. If there are hard seeds in Tinda, remove them while chopping Tinda.

 

Tinda Masala
Tinda Masala
Tinda Masala
Tinda Masala

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

ढेमसं (टिंडा) मसाला सुकी भाजी Indian Round Gourd / Apple Gourd Dry Subji

ढेमसं किंवा टिंडा ह्या नावाची भाजी मी ४५ वर्षांपूर्वी पर्यंत खाल्ली नव्हती. लहानपणी कधी घरी केली जात नसे. कॉलेजला असताना मैत्रिणींकडून हे नाव ऐकलं होतं. पण कधी चव घेतली नव्हती. ५ वर्षांपूर्वी फेसबुक वरचे फूड ग्रुप जॉईन केल्यावर भारतातल्या सगळ्या प्रांतातल्या भाज्यांची ओळख झाली. त्यातली ही एक यूपी, एमपी मधे याला टिंडा म्हणतात आणि मराठीत याला ढेमसं असं एक विचित्र नाव आहे. नाव विचित्र असलं तरी भाजी चविष्ट असते. कोवळी ढेमसं (अनेकवचन ढेमशी म्हणायचं का ??) मिळाली तर ती जास्त चवदार असतात आणि त्यात बिया नसतात. जून ढेमश्यातल्या बिया काढून टाकाव्या लागतात आणि ती शिजायला जास्त वेळ लागतो. कोवळी ढेमसं पोपटी रंगाची असतात. जून झाल्यावर रंग गडद होतो

ही ढेमश्याची सुकी भाजी कांदा आणि शेंगदाण्याचं कूट घालून केलेली आहे. कांदा परतताना फक्त पारदर्शक होईपर्यंतच परता. अशा कांद्याला जरा गोडसर चव असते. ह्याच्या पुढची पायरी म्हणजे गुलाबी किंवा गडद रंगावर परतलेला कांदा. ह्याची चव वेगळी लागते.

शेंगदाणे खमंग भाजून त्याचं कूट केलं तर भाजीला खमंग चव येते. कूट जरा लालसर दिसलं पाहिजे. पांढरं कूट घालून भाजीची चव बदलेल.

माझ्या बहुतेक सगळ्या रेसिपींसारखी ही सुद्धा सोपी रेसिपी आहे.

साहित्य (३ जणांसाठी)

ढेमसं पाव किलो

कांदे मध्यम २ बारीक चिरून

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट २ टेबलस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

धने पूड पाव टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

साखर अर्धा एक टीस्पून

आमचूर अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग चिमूटभर

कृती

. ढेमसं धुवून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

Tinda (Dhemase)
Tinda (Dhemase)
Chopped Tinda (Dhemase)

 

. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हळद आणि हिंग घालून खमंग फोडणी करा.

. कढईत कांदा घालून मंद आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या.

. आता कढईत खवलेला नारळ घालून २ मिनिटं परता.

. आता ढेमश्याचे तुकडे घालून मंद आचेवर २ मिनिटं परतून घ्या. आणि झाकण ठेवून वाफ काढा. ढेमसं नरम होईपर्यंत वाफेवर शिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी शिंपडा. जास्त शिजवू नका.

. लाल तिखट, गरम मसाला, आमचूर, धने पूड, मीठ आणि साखर घालून व्यवस्थित मिसळून घ्या.

. शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून भाजी ढवळून घ्या

. ढेमश्याची चविष्ट सुकी भाजी तयार आहे. गरम भाजी पोळी/ भाकरीसोबत खायला द्या.   

टीप

. ढेमसं कोवळी असतील तर त्यात बिया नसतात. जून असतील तर ढेमशी चिरताना बिया काढून टाका.

Tinda Masala
Tinda Masala
Tinda Masala
Tinda Masala

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes