Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा) – Buckwheat Savory Cake – Gluten Free recipe

Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)
Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)

Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा) – Buckwheat Savory Cake – Gluten Free recipe

कुट्टू ढोकळा मराठी

Kuttu / Buckwheat is rich in Protein and Vitamins. It has no Gluten. Kuttu is not very popular in Maharashtra. My Gujarati friend shared this recipe, I found it interesting and tried it. We all liked it. Kuttu is available in grocery stores in the form of broken grains (Dalia – it’s called Kuttu Daro in Gujarati). You can use Kuttu Daro as it is or grind it into little coarse powder. Both variations taste good. It’s soft Dhokla but not spongy. It’s very tasty and healthy.

Ingredients (1 cup = 250 ml) (Serves 4)

Kuttu (कुट्टू) - Buckwheat
Kuttu (कुट्टू) – Buckwheat
Kuttu (कुट्टू) - Buckwheat
Kuttu Daro as available in grocery store

Kuttu Daro / Broken Buckwheat 1.5 cup

Sour Curd ½ cup

Green Chili, Ginger Paste 1 teaspoon

Chopped Coriander 2 teaspoon

Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Salt / Sea Salt to taste

Instructions

1. Wash Kuttu 2-3 times. Drain water. Grind it a bit to form a coarse powder.

2. Add Curd, Chili Ginger paste, salt to Kuttu and mix well. Make a Thick batter like Idli batter of dropping consistency. Keep it covered for 3-4 hours.

3. Heat water in a steamer. Grease a flat plate. Mix half of chopped coriander in the batter and Pour batter and level it.

4. Steam it for 15-20 minutes. Check by piercing a knife. Knife should come out clean.

5. Leave the plate to come to room temperature.

6. Heat Ghee in a small Ladle. Add Cumin seeds; wait for splutter. Spread ghee on Dhokla.

7. Cut Dhokla in pieces of desired shapes.

8. Garnish with Chopped coriander. Soft and tasty Kuttu Dhokla is ready. Serve with choice of chutney / tomato sauce. Dhokla tastes very good without any accompaniment also.

Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)
Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)
Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)
Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कुट्टू ढोकळा (Buckwheat Dhokla)- ग्लूटेन फ्री पौष्टिक रेसिपी

कुट्टू (Buckwheat) मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन असतात. आणि ग्लूटेन अजिबात नसतं. महाराष्ट्रात कुट्टू फार लोकप्रिय नाही. मी तर ह्याचं नाव ही ऐकलं नव्हतं. आणि कुट्टू हे नाव सुद्धा गुजराती आहे. ह्याला मराठी नाव मला सापडलं नाही. एका गुजराती मैत्रिणीकडून ह्या रेसिपीबद्दल कळलं. रेसिपी छान वाटली. म्हणून करून पाहिली. घरी सगळ्यांना आवडली. त्यामुळे कधी कधी घरी केली जाते. कुट्टू किराणा दुकानात कुट्टू दारोह्या नावाने मिळतं. हा कुट्टू चा जाड रवा असतो (broken buckwheat) – दलिया सारखा. हा असाच वापरून किंवा मिक्सरमध्ये थोडा बारीक करून ढोकळा करू शकता. दोन्ही प्रकार छान लागतात. ह्यात सोडा / इनो घालत नाहीत. त्यामुळे ढोकळा नरम होतो पण spongy होत नाही. टेक्सचर आपल्या सांदणासारखं असतं. गुजराती लोक हा ढोकळा उपासालाही खातात.

साहित्य (१ कप = २५० मिली) (४ जणांसाठी)

Kuttu (कुट्टू) - Buckwheat
Kuttu (कुट्टू) – Buckwheat
Kuttu (कुट्टू) - Buckwheat
Kuttu Daro as available in grocery store

कुट्टू दारो (broken buckwheat) दीड कप

आंबट दही अर्धा कप

आलं मिरची पेस्ट १ टीस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून

साजूक तूप १ टीस्पून

जिरं अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. कुट्टू २३ वेळा पाण्याने धुवून घ्या. मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्या.

. एका स्टीलच्या वाडग्यात कुट्टू, दही, आलं मिरची पेस्ट, मीठ घालून मिश्रण एकजीव करा. थोडं पाणी घालून इडलीच्या पिठासारखं मिश्रण भिजवून ३४ तास झाकून ठेवा.

. इडलीपात्रात पाणी गरम करा. मिश्रण तेल लाववेल्या ताटलीत घालून समतल करा.

. पाणी उकळलं की मिश्रणाची ताटली त्यात ठेवून झाकण लावून १५२० मिनिटं वाफवून घ्या.

. ताटली इडलीपात्रातून बाहेर काढून थंड करा.

. एका कढल्यात साजूक तूप आणि जिरं घालून फोडणी करा. फोडणी ढोकळ्यावर पसरवा.

. ढोकळ्याचे तुकडे करून कोथिंबीर पेरून चटणी / सॉस सोबत खायला द्या. हा ढोकळा असाच खायला पण छान लागतो.

Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)
Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)
Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)
Kuttu Dhokla (कुट्टू ढोकळा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes