Nachani Aambil (नाचणीची आंबील ) – Healthy Summer Drink using Ragi / Finger Millet

Nachani Aambil (नाचणीची आंबील )

Nachani Aambil (नाचणीची आंबील ) – Healthy Summer Drink using Ragi / Finger Millet

नाचणीची आंबील मराठी

Nachani (Ragi / Finger Millet) is very nutritious. This is an easy recipe of a nutritious summer drink using Nachani. It only requires ingredients that are generally available in your kitchen. Try this out. It’s very tasty.

Ingredients (Makes 5-6 Glasses of Aambil)

Nachani Flour (Ragi / Finger Millet Flour) ¼ cup

Green Chilly 1

Garlic Cloves 2

Buttermilk as required

Salt / Rock Salt to taste

Instructions

1. Add ¼ cup water to Nachani Flour and make a smooth paste.

2. Heat about ½ ltr water in a pan.

3. Crush green chilly and garlic. Add to the water. Add Salt.

4. When water starts boiling, add Nachani Paste to the pan and cook on low flame stirring continuously so that no lumps are formed.

5. Cook the flour. It will take 7-8 minutes to cook it.

6. Switch off the flame. Allow the mixture to cool.

7. Upon cooling keep it in refrigerator for chilling.

8. While serving add Nachani mixture and buttermilk in a glass. Mix it. Garnish with fresh coriander or roasted cumin powder. Serve chilled.

9. You can have this healthy drink anytime you want.

Note:

1. You can skip Garlic if you don’t like. Add roasted cumin powder instead.

Nachani Aambil
Nachani Aambil
      ===================================================================================

नाचणीची आंबील

नाचणीची आंबील उन्हाळ्यात पिण्यासाठी अगदी योग्य आहे. नाचणी खूप पौष्टीक आणि थंड असते. नेहमी घरी असणारे जिन्नस नाचणीचं पीठ, हिरवी मिरची, लसूण आणि ताक घालून अगदी सहज बनणारी ही आंबील आहे. लसूण आवडत नसेल फक्त जिऱ्याची पूड घालून सुद्धा आंबील छान लागते.थंडगार आंबील पिऊन उन्हाळ्याचा त्रास कमी करा.

साहित्य (६ ग्लास साठी)

नाचणीचं पीठ पाव कप

हिरवी मिरची १

लसूण २ पाकळ्या

ताक आवश्यकतेनुसार

मीठ / काळं मीठ चवीनुसार

कृती

. नाचणीच्या पिठात पाव कप पाणी घालून पेस्ट बनवा. गुठळ्या मोडून घ्या.

. एका पातेल्यात अर्धा लिटर पाणी गरम करा.

. हिरवी मिरची आणि लसूण ठेचून ह्या पाण्यात घाला. मीठ घाला.

. पाण्याला उकळी आली की त्यात नाचणीची पेस्ट घाला. मिक्स करून मंद आचेवर शिजवून घ्या. सारखं ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.

. ८ मिनिटं पीठ शिजवा. गॅस बंद करून मिश्रण गार करून घ्या.

. गार झाल्यावर मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा.

. सर्व्ह करताना नाचणी चं मिश्रण आणि ताक एकत्र करा. तुम्हाला आंबील जेव्हढी पातळ हवी असेल त्यानुसार ताक घालाग्लासमध्ये घालून वरून भाजलेल्या जिऱ्याची पूड भुरभुरवा किंवा किंचित कोथिंबीर घाला. आणि थंडगार आंबील चा आनंद घ्या.

. ही आंबील तुम्ही कधीही पिऊ शकता

Nachani Aambil (नाचणीची आंबील )
Nachani Aambil (नाचणीची आंबील )

टीप

. लसूण आवडत नसेल तर घालू नका. फक्त जिऱ्याची पूड घालून सुद्धा आंबील छान लागते.

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes