Palak Moong Dal (पालक मूग डाळ भाजी) – Spinach with Split Petite Yellow Lentil
Generally everyone likes Spinach (Palak). If you want a different subji than the standard spicy Palak Paneer, Alu Palak, try this recipe with no spices except Ginger. This no Onion, Garlic Subji is very easy to make. Needs only 4 ingredients and is very delicious.
Ingredient (Serves 3) (1 cup = 250 ml)
Spinach (Palak) Finely chopped 2 cups
Split Petite Yellow Lentil (Yellow Moong Dal) 3 tablespoon
Butter (Preferably home made) 1 tablespoon
Ginger crushed ½ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Soak Split Yellow Lentil for 6 hours.
2. Wash and Clean Spinach and chop it fine. Chop tender stems, if any.
3. In a pan, heat butter on low flame; add crushed Ginger.
4. Add Spinach and Lentil. Mix well.
5. Cook covered till Lentils are cooked; Do not overcook. Generally Spinach releases water when it starts getting cooked; but if it does not and subji gets too dry then sprinkle a tablespoon of water while cooking.
6. Add salt.
7. Serve hot with Roti/ Bhakari (Indian Bread) or Rice. If you like, while serving add some butter on the subji. Subji tastes delicious with earthy taste of Spinach and aroma of Butter and Ginger.
===============================================================================
पालक मूगडाळ भाजी – स्वादिष्ट भाजी – कांदा, लसूण विरहित
पालक भाजी बऱ्याच प्रकारे बनवतात. ही एक वेगळीच रेसिपी आहे. फक्त ४ जिन्नस लागतात ह्या रेसिपीला. आलं सोडून काहीही मसाले न घालता केलेली ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. नक्की करून बघा.
साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
बारीक चिरलेला पालक २ कप
मूग डाळ ३ टेबलस्पून
लोणी / बटर १ टेबलस्पून (शक्यतो लोणी घाला )
ठेचलेलं आलं अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. मूग डाळ धुवून ६ तास पाण्यात भिजवून ठेवा.
२. पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. कोवळे देठ असतील तर तेही बारीक चिरून घ्या.
३. एका कढईत लोणी घालून बारीक गॅस वर वितळवून घ्या.
४. त्यात आलं घालून परता. किंचित रंग बदलला की पालक आणि मूग डाळ घाला. पाणी घालू नका. मिक्स करून झाकण ठेवून शिजवा. पालकाला पाणी सुटतं. पण जर भाजी सुकी होऊ लागली तरच थोडं पाणी शिंपडा.
५. भाजी शिजली की मीठ घालून मिक्स करा.मूग डाळ नरम होईपर्यंतच शिजवा. जास्त शिजवून मेण करू नका (ही माझ्या आईची सूचना आहे – तिच्याच भाषेत).
६. पालक मूगडाळीची स्वादिष्ट भाजी तयार आहे. पोळी, भाकरी, भातासोबत सर्व्ह करा. आवडत असेल तर सर्व्ह करताना थोडं लोणी भाजीवर घाला.
Always waiting for your best, simple and traditional recipes…thank you..
Thank you for you kind words Rohini. It would be good if you follow my blog to get intimation for new posts. I’ll send you a mail for the same. Please accept it.