
Palak Moong Dal Bhaaji (पालक मूग डाळ भाजी) – Spinach with Split Petite Yellow Lentil
Generally everyone likes Palak. If you want a different subji than the standard spicy Palak Paneer, Alu Palak, try this recipe with no spices except Ginger. This no Onion, Garlic Subji is very easy to make. Needs only 5 ingredients and is very delicious.
Ingredients
Palak (Spinach) 1 bunch
Yellow Moong Dal (Split Petite Yellow Lentil) 3 tablespoon
Butter (Preferably home made) 1 teaspoon
Ginger crushed ½ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Soak Moong Dal for 6 hours.
2. Wash and Clean Palak and chop it fine.
3. In a pan, heat butter on low flame; add crushed ginger.
4. Add palak and Moong dal. Mix well.
5. Cook covered till Moong Dal is cooked; Generally Palak releases water when it starts getting cooked; but if it does not and subji gets too dry then sprinkle a tablespoon of water while cooking
6. Add salt.
7. Serve hot with Roti/ Paratha / Bhakari (Any Indian Bread); It tastes delicious with earthy taste of Palak and aroma of Butter and Ginger.
पालक मूग डाळ भाजी – स्वादिष्ट भाजी पण कांदा, लसूण, मसाला न घालता
पालक भाजी बऱ्याच प्रकारे बनवतात. ही एक वेगळीच रेसिपी आहे. फक्त ५ गोष्टी लागतात ह्या रेसिपी ला. आलं सोडून काहीही मसाले न घालता बनवलेली ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते. ही माझ्या आईची रेसिपी आहे. नक्की करून बघा.
साहित्य
पालक १ जुडी
मूग डाळ ३ मोठे चमचे
लोणी / बटर १ चमचा (शक्यतो लोणी घाला )
ठेचलेलं आलं अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. मूग डाळ धुवून ६ तास पाण्यात भिजवून ठेवा.
२. पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. कोवळे देठ असतील तर तेही बारीक चिरून घ्या.
३. एका कढईत लोणी घालून बारीक गॅस वर वितळवून घ्या.
४. त्यात आलं घालून परता. किंचित रंग बदलला की पालक आणि मूग डाळ घाला. पाणी घालू नका. मिक्स करून झाकण ठेवून शिजवा. पालकाला पाणी सुटतं. पण जर भाजी सुकी होऊ लागली तरच थोडं पाणी शिंपडा.
५. भाजी शिजली की मीठ घालून मिक्स करा.
६. स्वादिष्ट पालक ची भाजी तयार आहे. पोळी, भाकरी, भाताबरोबर सर्व्ह करा. आवडत असेल तर सर्व्ह करताना थोडं लोणी भाजीवर घाला.

Always waiting for your best, simple and traditional recipes…thank you..
Thank you for you kind words Rohini. It would be good if you follow my blog to get intimation for new posts. I’ll send you a mail for the same. Please accept it.