Sheer Khurma (शीर खुर्मा)– Vermicelli Pudding with Dates and Dry Fruits
I always wanted to try out Sheer Khurma. I knew that the basic difference between Sheer Khurma and Sevai Kheer is dry fruits. In Sheer Khurma, lots of dry fruits are added. The recipes that I checked mentioned Dates to be added as small pieces. I thought it would give a better taste if I use Dates paste instead of Dates pieces. Because of the sweetness of Dates it would require less sugar. I made it this way and it was super delicious. Dates paste gave it a nice creamy nutty taste, thickness and nice brownish colour too.
Ingredients (serves 4)
Full Fat Milk ½ litre + 3 tablespoon
Ghee (Clarified butter) 1 tablespoon
Sugar 1 to 2 tablespoon if required
Sevai (Vermicelli) ¼ cup
Dates 10-12 deseeded
Almonds 10-12 chopped
Cashew Nuts 10-12 chopped
Pistachio 10-12 chopped
Cardamom Powder ¼ teaspoon
Salt a pinch (optional)
Instructions
1. Warm 3 tablespoon of milk and soak dates for 1 hour.
2. Add 1 teaspoon of ghee in a pan and roast Vermicelli till light brown. Transfer it to a plate.
3. In the same pan, fry almonds, cashew nuts and pistachios. Add remaining Ghee if required.
4. In a thick bottom pan, bring milk to boil. Boil it for 5 minutes. Since we are using Dates Paste, you don’t need to reduce milk. Dates will make Khurma thick.
5. Using a grinder, make a paste of soaked dates.
6. Take out ½ of the milk into another pan. Add Vermicelli to boiling milk. Boil on low flame till Sevai is cooked. Keep stirring all the time.
7. Add Dates paste to the milk that we have saved in step 6; mix well. Heat on low flame and bring to boil. Now add this mixture to the pan with Vermicelli.
8. Add dry fruits.
9. Check the sweetness. If required add some sugar.
10. Thickness of Sheer Khurma depends on one’s preference. Some like it thick; some like it fluid. When you get the desired thickness, add cardamom powder and switch off the gas. Note that Sheer Khurma will thicken when it gets cold. So boil it accordingly.
11. Yummy and Creamy Sheer Khurma is ready. Serve hot or cold. Both taste awesome.
12. If you want to add a pinch of salt, add it when Sheer Khurma comes to room temperature.
Note
1. You don’t need to add saffron as the dates paste gives it light brown colour. Still if you want, garnish with a few saffron strands while serving.
===================================================================================
शीर खुर्मा
शीर खुर्मा आणि आपली शेवयांची खीर यातला मुख्य फरक म्हणजे ड्राय फ्रुटस. शीर खुर्म्यात खूप जास्त ड्राय फ्रुटस घातले जातात – मुख्यतः खजूर, बदाम, पिस्ते, चारोळी. काही ठिकाणी बेदाणे, काजू ही घालतात. सगळे ड्राय फ्रुटस बारीक तुकडे करून तुपात तळून घातले जातात. शीर खुर्मा काही ठिकाणी खिरीसारखा पातळ बनवतात तर काही ठिकाणी थोडा दाट. पसंद अपनी अपनी हेच खरं !! मी शीर खुर्मा बनवताना खजूर दुधात भिजवून मिक्सर मध्ये बारीक करून घालते. त्यामुळे साखर खूप कमी लागते, दूध आठवावं लागत नाही – खजुरामुळे दाटपणा येतो, शीर खुर्म्याचं टेक्सचर छान क्रिमी होतं आणि रंगही लाईट ब्राऊन येतो कॅरॅमलाईज्ड साखर घातल्यासारखा. ही जरा वेगळी शीर खुर्म्याची रेसिपी नक्की करून बघा. खूप स्वादिष्ट लागते.
साहित्य (४ जणांसाठी)
म्हशीचं फुल फॅट दूध अर्धा लिटर + ३ टेबलस्पून
साजूक तूप १ टेबलस्पून
साखर १ – २ टेबलस्पून (चवीनुसार)
शेवया पाव कप
बिया काढलेले खजूर १०–१२ (मऊ खजूर घ्या)
बदाम १०–१२ बारीक तुकडे करून
काजू १०–१२ बारीक तुकडे करून
पिस्ते १०–१२ बारीक तुकडे करून
वेलची पूड पाव चमचा
मीठ चिमूटभर (ऐच्छिक)
कृती
१. ३ टेबलस्पून दूध गरम करून त्यात खजूर १ तास भिजवून ठेवा.
२. १ चमचा तूप गरम करून त्यात शेवया १–२ मिनिटं बारीक आचेवर परतून घ्या. ताटलीत काढून घ्या.
३. त्यात पातेल्यात बदाम, काजू आणि पिस्ते तळून घ्या. जरूर पडल्यास उरलेलं तूप घाला.
४. एका पातेल्यात दूध गरम करा आणि ५ मिनिटं उकळा. दूध आटवायची गरज नाही कारण खजुराच्या पेस्ट मुळे दुधाला दाटपणा येतो.
५. अर्ध दूध वेगळं काढून घ्या. आणि उरलेल्या अर्ध्या दुधात शेवया घालून बारीक गॅसवर शिजवून घ्या.
६. मिक्सरमध्ये खजुराची पेस्ट करून घ्या. जे दूध वेगळं काढून ठेवलंय त्यात खजुराची पेस्ट घालून एकजीव करा आणि बारीक गॅसवर उकळी काढा. सतत ढवळत रहा.
७. खजूर दुधाचं मिश्रण शेवयांच्या मिश्रणात घालून मिक्स करा. मंद गॅसवर शिजवत रहा.
८. ड्राय फ्रुटस घाला. थोडी ड्राय फ्रुटस सजावटीसाठी ठेवा. चव बघून हवी असल्यास साखर घाला.
९. मिश्रण जेवढं दाट हवं असेल तेवढं आटवा. लक्षात ठेवा की गार झाल्यावर शीर खुर्मा दाट होतो.
१०. वेलची पूड घाला आणि गॅस बंद करा.
११. स्वादिष्ट शीर खुर्मा तयार आहे. गरम / गार कसाही छान लागतो.
१२. मीठ घालायचं असेल तर शीर खुर्मा गार झाल्यावर घाला.
टीप
१. यात केशर घालायची गरज नाही कारण खजुराच्या पेस्ट मुळे छान लाईट ब्राऊन रंग येतो. तरीपण हवं असेल तर केशराच्या काड्या सजावटीसाठी वापरू शकता.
All receipies are nice…
Thank you Rinku.\nSudha