Apple Halwa (सफरचंदाचा हलवा)
Fresh fruit Halwa is full of flavor. I make Halwa using Musk Melon, Apples, Papaya. Each one has a different taste but all are delicious. You can make Apple Halwa with ingredients readily available in the kitchen. I add Milk Powder instead of Mava (Milk Solids). Hence the Halwa is soft and creamy. If you don’t want Halwa very soft, add Mava (Milk Solids) instead of Milk Powder.
Ingredients (Serves 2-3)
Apples Big 2
Milk About ½ cup
Sugar 2-3 tablespoon (adjust as per taste; quantity depends on sweetness of Apples)
Milk Powder 2-3 tablespoon (or .25 cup Mava) – You can add more if you like
Ghee (Clarified butter) 2 teaspoon
Salt 2 pinch (optional)
Cinnamon (Dalchini) powder ¼ teaspoon
Cardamom Powder ¼ teaspoon
Dry fruits as required
Instructions
1. Wash and Grate Apples without peeling. Immediately start cooking; else it will turn brown. If you don’t want to cook it immediately then add water to the bowl to cover grated apple. Before cooking, drain water and use grated Apples.
2. Heat a thick bottom pan. Add 1 teaspoon Ghee and Grated Apple. Sauté for 4-5 minutes.
3. Add Milk. Keep cooking for on low flame for 2-3 minutes stirring in between.
4. Add Sugar. Mix. Keep cooking.
5. When mixture starts thickening Add Milk Powder / Mava.
6. Keep cooking till mixture starts coming together.
7. Add Cinnamon powder, Cardamom powder, salt and one teaspoon ghee. Mix together.
8. Add dry fruits, mix and transfer the mixture to a greased bowl. Leave it to cool. You can either use a mould (cookie cutter) to give desired shape or serve it as it is.
9. Rich and Delicious Apple Halwa is ready.
Note
1. Store this Halwa in refrigerator.
2. Instead of using grated apples you can use pieces of Apple to make Halwa. For this peel and core apples and chop in medium size pieces. For cooking, you may need some more milk.
3. I’ve served Apple Halwa with caramelized Apple. For this chop ½ apple in medium size pieces. caramelize 2 tablespoon of sugar. Add apple pieces and cook for 2 minutes.
================================================================================
सफरचंदाचा हलवा
ताज्या फळांचा हलवा खूप छान लागतो. मी सफरचंद, खरबूज, पपई चा हलवा बनवते. हे सगळे हलवे अतिशय स्वादिष्ट लागतात. घरी नेहमी असणारं साहित्य वापरून बनवले जाणारे हे हलवे बनवायला अगदी सोपी असतात. मी ह्या हलव्यात दुधाची पावडर घालते. तुम्हाला आवडत असेल तर मावा घालू शकता.
साहित्य (२–३ जणांसाठी)
सफरचंद २ मोठी
दूध अंदाजे अर्धा कप
साखर २–३ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )
दुधाची पावडर २–३ टेबलस्पून (किंवा पाव कप मावा ) – आवडत असेल तर जास्त घालू शकता
साजूक तूप २ टीस्पून
मीठ २ चिमूट (ऐच्छिक)
दालचिनी पावडर पाव चमचा
वेलची पावडर पाव चमचा
सुके मेवे आवडीप्रमाणे
कृती
१. सफरचंद धुवून सालासकट किसून घ्या. किसून लगेच हलवा करायला घ्या नाहीतर कीस काळा पडेल. सफरचंद किसल्यावर लगेच हलवा करायचा नसेल तर कीस पाण्यात घालून ठेवा. आणि हलवा करताना पाणी निथळून घ्या.
२. एका जाड बुडाच्या पातेल्यात १ चमचा तूप घालून सफरचंदाचा कीस घालून ४–५ मिनिटे परतून घ्या.
३. दूध घालून मंद आचेवर २–३ मिनिटे शिजवा.
४. साखर घालून शिजवत राहा.
५. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की दुधाची पावडर / मावा घाला. मिक्स करा.
६. मिश्रण कडेनी सुटेपर्यंत शिजवा.
७. दालचिनी पावडर, वेलची पावडर, मीठ आणि एक चमचा तूप घालून मिक्स करा.
८. सुके मेवे घाला. मिक्स करून मिश्रण तूप लावलेल्या बाउल मध्ये काढा. थंड झाल्यावर साचे वापरून हवे त्या आकाराचे तुकडे बनवा किंवा हलवा तुकडे न करता असाच खायला द्या.
टीप
१. हलवा फ्रिजमध्ये ठेवा.
२. सफरचंदाचा कीस न करता सफरचंदाचे तुकडे करून ही हलवा बनवू शकता. त्यासाठी सफरचंदाचीसालं काढून तुकडे करा. असा हलवा शिजायला थोडं जास्त दूध लागू शकतं.
३. मी हा हलवा कॅरॅमलईज्ड सफरचंदाबरोबर सर्व्ह केला. त्यासाठी २ टेबलस्पून साखर कॅरॅमलाईझ करून त्यात सफरचंदाचे छोटे तुकडे २ मिनिटं शिजवले.