Methi Corn Malai (मेथी कॉर्न मलई) – Fenugreek Corn Subji with Fresh Cream

Methi Corn Malai (मेथी कॉर्न मलई)

Methi Corn Malai (मेथी कॉर्न मलई) – Fenugreek Corn Subji with Fresh Cream

मेथी कॉर्न मलई मराठी

Everyone likes Methi Matar Malai that we get in restaurants. This is little variation by replacing Matar (Green Peas) with Sweet Corn. It’s fairly easy to make this delicious subji. This subji is little sweet. There may be different ways to make this but this is the recipe that I use.

I don’t add Turmeric Powder to this subji. If you want, add it after cumin seeds in the Ghee.

Ingredients (Serves 4)

Chopped Fenugreek (Methi) leaves 2 cups

Sweet corn ¾ cup (Use American Sweet Corn)

Onions 2 medium size

Tomatoes 2 medium size

Ginger Garlic paste 1 teaspoon

Crushed Green Chillies ½ teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Sugar 1 tablespoon (Adjust as per taste)

Cashew Nuts 10-12

Almonds 10-12

Fresh Cream (Malai) 2 tablespoon (or more if you like)

Butter / Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and chop Fenugreek leaves. Soak cashew nuts and almonds in hot water for 30 minutes.

2. Boil sweet corn.

3. Chop and grind onions into a coarse paste.

4. Boil water; add tomatoes; cook for 2 minutes; drain water and add cold water and leave to cool. Upon cooling Peel tomatoes and make tomato puree in a blender.

5. In a pan, heat ghee; add cumin seeds, wait for splutter; add Asafoetida.

6. Add onion paste and sauté on low flame till light brown; add ginger garlic paste and sauté for 2 minutes.

8. Add chopped fenugreek leaves, sauté and cook covered for 5-6 minutes stirring after 2-3 minutes. Do not add water.

9. When Fenugreek leaves are cooked, Add tomato puree to the pan; stir well.

10. Cook covered for 2-3 minutes.

11. Add sweet corn, salt, chilly paste, sugar and mix.

12. Add Garam Masala to the pan and mix.

13. Peel almonds. Grind cashew nuts and almonds together into a coarse paste.

14. Add cashew, almond paste to the pan and mix. Add little water if subji is too dry. Cook covered for 2 minutes.

15. Beat 1 tablespoon of fresh cream using a spoon. Add it to the subji, Mix and switch off the gas.

16. Add remaining 1 tablespoon of fresh cream in the serving plate. Serve Hot with roti or paratha.

Methi Corn Malai (मेथी कॉर्न मलई)

Note:

1. To make Methi Matar Malai add Fresh Green Peas instead if Sweet corn. Boil Green Peas and add in step 11.

=================================================================================

मेथी कॉर्न मलई

तुम्ही रेस्टॉरंट मध्ये मेथी मटर मलई नक्कीच खाल्ली असेल. तशीच मेथी कॉर्न मलई पण बनवतात. ही पंचतारांकीत  शाही भाजी थोडीशी गोडसर चवीची असते. बदाम काजूची पेस्ट आणि मलई घातल्यामुळे खूप रीच आणि स्वादिष्ट बनते. रेसिपी सोपी आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की भाजीचं चोथा पाणी होऊ नये. तसं झाले तर भाजी चांगली लागत नाही. त्यासाठी कांदा वाटून छान परतून घ्या; टोमॅटोची प्युरी घाला आणि मेथी बारीक चिरून चांगली शिजू द्यामग मस्त रेस्टॉरंट सारख्या चवीची होईल ही भाजी.

मी ह्या भाजीत हळद घालत नाही. तुम्हाला हवी असेल तर फोडणीत घालू शकता

साहित्य (४ जणांसाठी )

बारीक चिरलेली मेथीची पानं २ कप

मक्याचे दाणे पाऊण कप (अमेरिकन स्वीट कॉर्न )

कांदे २ मध्यम

टोमॅटो २ मध्यम

आलं लसूण पेस्ट १ टीस्पून

ठेचलेली मिरची अर्धा टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

साखर १ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

काजू १०१२

बदाम १०१२

दुधाची साय (फ्रेश क्रिम) २ टेबलस्पून (आवडत असेल तर जास्त घालू शकता )

साजूक तूप / बटर १ टीस्पून 

जिरं पाव चमचा

हिंग चिमूटभर

मीठ चवीनुसार

कृती

. मेथीची पानं धुवून बारीक चिरून घ्या. काजू आणि बदाम गरम पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा.

. मक्याचे दाणे शिजवून घ्या.

. कांद्याचे तुकडे करून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.

. टोमॅटो उकळत्या पाण्यात २ मिनिटं शिजवून पाणी ओतून टाका आणि गार पाण्यात बुडवून ठेवा. टोमॅटो गार झाल्यावर सालं काढून टाका आणि टोमॅटोची  मिक्सर मध्ये वाटून घ्या.

. एका कढईत तूप गरम करून त्यात जिरं आणि हिंग घाला.

. वाटलेला कांदा घालून मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परताआलं लसूण पेस्ट घाला ; २ मिनिटं परता.

. चिरलेली मेथीची पानं घालून परता. झाकण ठेवून मंद आचेवर ५६ मिनिटं वाफ काढाप्रत्येक २३ मिनिटांनी झाकण काढून ढवळापाणी घालू नका.

. मेथी शिजल्यावर वाटलेले टोमॅटो घाला; ढवळून २३ मिनिटं झाकण ठेवून शिजवा.

. मक्याचे दाणे, मीठ, गरम मसाला आणि साखर घालून मिक्स करा.   

१०. बदामाची सालं काढून घ्या. मिक्सर मध्ये काजू, बदाम जाडसर वाटून घ्या.

११. काजू बदामाची पेस्ट भाजीत घाला. भाजी ढवळून घ्या. जास्त सुकी झाली असेल तर थोडं पाणी घाला. ही भाजी दाट असते.

१२. एक चमचा दुधाची साय चमच्यानं फेटून घ्या आणि भाजीत घाला. भाजीला उकळी आली की गॅस बंद करा.

१३. उरलेली १ चमचा साय सर्व्ह करताना भाजीवर घाला. स्वादिष्ट मेथी कॉर्न मलई पोळी / भाकरी बरोबर सर्व्ह करा

Methi Corn Malai (मेथी कॉर्न मलई)

टीप

. मेथी मटर मलई बनवण्यासाठी कॉर्न ऐवजी मटारचे दाणे उकडून घ्या आणि स्टेप ९ मध्ये भाजीत घाला

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes