Keerle Bhaaji (किर्ल भाजी) – Bamboo Shoot Subji

Keerle Bhaaji (किर्ल भाजी) - Bamboo Shoot Subji

Keerle Bhaaji (किर्ल भाजी) – Bamboo Shoot Subji

किर्ल भाजी मराठी

Tender Bamboo Shoots are called Keerle (किर्ल) in Konkani. This is a seasonal vegetable that is available around end of monsoon. They look like Sugarcane pieces. This recipe is from Goa / Mangalore region. Chopped Bamboo shoots are dipped in water and are stored in fridge for 2-3 days; water is changed every day. This process removes the bitterness of Bamboo shoots. So you need to plan at least 4 days in advance for making this subji. Once this is done, the remaining process is very easy. It requires ingredients generally available in Indian kitchen. Subji is very tasty.

Ingredients (Serves 4)

Finely Chopped Keerle (Tender Bamboo Shoots) 2 cups

Coriander Seeds 1 tablespoon

Fresh Scrapped Coconut ¾ cup

Split Black Gram (Urad Dal) 1 tablespoon + ¼ teaspoon

Dry Red Chillies 4-5

Tamarind Pulp 1 teaspoon

Crushed Jaggery ½ – ¾ teaspoon (adjust as per taste)

Oil 3 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida 2 pinch

Curry Leaves 8-10

Salt to taste

Instructions

1. Peel Bamboo Shoots to remove the dark brown cover. The inner white portion is soft and tender. This is used for the subji. Chop it fine and transfer it to a bowl.

2. Add water to the bowl to cover the Bamboo Shoots completely; cover the bowl and store it in refrigerator for 3 days. Every morning, drain the water and fill fresh water. This process removes the bitterness of Bamboo Shoots.

3. On 4th Day, drain the water; add fresh water to cover chopped bamboo shoots and pressure cook it for 2 whistles. Tender Bamboo shoots will be soft after 2 whistles but they will not be mushy. It retains its shape. Drain the water.

4. In a pan, add 1 teaspoon of oil. Heat on low flame. Add 1 tablespoon of Split Black gram, coriander seeds, red chillies and ½ cup fresh grated coconut. Roast on low heat till you get nice aroma of roasted Black gram and coriander seeds. Transfer to a plate and leave to cool. On cooling, grind it into a fine powder.

5. In the same pan, heat remaining oil. Add mustard seeds; wait for splutter. Add cumin seeds; wait for splutter. Add Asafoetida, curry leaves, ¼ teaspoon of Split Black Gram (Urad Dal); sauté till Black gram is light brown. Add cooked Bamboo Shoots and turmeric. Mix.

6. Add Ground powder, Tamarind Pulp, Jaggery, Salt and remaining fresh coconut. Mix and cook for 3-4 minutes.

7. Bamboo Shoot Subji (Keerle Bhaaji) is ready. Serve hot with Chapati / Roti (Indian Bread).

Keerle Bhaaji (किर्ल भाजी) – Bamboo Shoot Subji
Keerle Bhaaji (किर्ल भाजी) – Bamboo Shoot Subji

Note

1. You can add cooked Peanuts / Black Peas (काळे वाटाणे) to this subji. For this soak ¼ cup Peanuts / Black Peas for 6 hours. Pressure cook till peanuts are soft. Add to subji in step 6.

2. If the white portion of Bamboo Shoots is not tender, do not take it. It does not get cooked.

 ==================================================================================

किर्ल भाजी – गोवा / मंगलोर ची खास रेसिपी

कोकणी भाषेत बांबू च्या कोंबांना किर्ल म्हणतात. पावसाळा संपत आला की बांबूचे कोवळे कोंब बाजारात मिळायला लागतात. उसाच्या तुकड्यासारखे दिसतात. बांबूंच्या कोंबांचं वरचं तपकिरी रंगाचं साल काढून टाकायचं. आतमध्ये पांढऱ्या रंगाचा कोवळा भाग असतो तो काकडी चोचवतो तसा बारीक चोचवयाचा. चोचवणं जमत नसेल तर अगदी बारीक कापायचा. बाउल मध्ये चिरलेली भाजी ठेवून त्यात भाजी बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि ३ दिवस फ्रिज मध्ये झाकून ठेवायचं. रोज एकदा पाणी बदलायचं. असं केल्यानं बांबूचा कडवटपणा निघून जातो. चौथ्या दिवशी भाजी करायची. म्हणजे ही भाजी करण्यासाठी बरंच आधी ठरवावं लागतं; आयत्या वेळी नाही करता येत. एवढी तयारी केल्यावर भाजी करणं मात्र सोपं आहे. भाजी अतिशय टेस्टी होते.

साहित्य (४ जणांसाठी )

बारीक चिरलेले बांबूचे कोवळे कोंब २ कप

ताजा खवलेला नारळ पाऊण कप

लाल सुक्या मिरच्या ४

उडीद डाळ १ मोठा चमचा + पाव टीस्पून

धने १ मोठा चमचा

चिंचेचा कोळ १ चमचा

चिरलेला गूळ अर्धा ते पाऊण चमचा (चवीप्रमाणे कमी/जास्त करा)

तेल ३ चमचे

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग २ चिमूट

हळद पाव चमचा

कढीपत्ता ८१० पानं

मीठ चवीनुसार

कृती

. बांबूंच्या कोंबांचं वरचं तपकिरी रंगाचं साल काढून टाकायचं. आतमध्ये पांढऱ्या रंगाचा कोवळा भाग असतो तो काकडी चोचवतो तसा बारीक चोचवयाचा. चोचवणं जमत नसेल तर अगदी बारीक कापायचा. बाउल मध्ये चिरलेली भाजी ठेवून त्यात भाजी बुडेपर्यंत पाणी घालायचं आणि ३ दिवस फ्रिज मध्ये झाकून ठेवायचं. रोज एकदा पाणी बदलायचं. असं केल्यानं बांबूचा कडवटपणा निघून जातो. चौथ्या दिवशी भाजी करायची.

. चिरलेल्या भाजीतलं पाणी बदलून भाजी बुडेल एवढं पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये २ शिट्या होईपर्यंत शिजवून घ्या.

. कोवळे बांबू चे कोंब २ शिट्यात शिजतात. शिजलेल्या भाजीचं पीठ होत नाही ; तुकडे तसेच राहतात.

. एका कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात १ मोठा चमचा उडीद डाळ, धने, लाल मिरच्या आणि अर्धा कप खवलेला नारळ घाला. मंद आचेवर खमंग भाजून घ्या. ताटलीत गार करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.

. त्याच कढईत उरलेल्या तेलाची मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, पाव चमचा उडीद डाळ घालून फोडणी करा. शिजलेली भाजीचं पाणी काढून टाकून भाजी कढईत घाला. मिक्स करा.

. वाटलेला मसाला, उरलेला नारळ, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घालून मिक्स करा. एक वाफ आली की भाजी तयार.

. गरमागरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.

Keerle Bhaaji (किर्ल भाजी) – Bamboo Shoot Subji
Keerle Bhaaji (किर्ल भाजी) – Bamboo Shoot Subji

टीप

. ह्या भाजीत शेंगदाणे किंवा काळे वाटाणे ही घालू शकता. त्यासाठी पाव कप शेंगदाणे / काळे वाटाणे ६ तास भिजवून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. आणि वर लिहिलेल्या ६ व्या स्टेप मध्ये बाकी साहित्याबरोबर भाजीत घाला.

. कोंबांचा पांढरा भाग जून असेल तर तो घेऊ नका. तो शिजत नाही.

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes