Khoya Kaju (खोया काजू / पेढ्यांची शाही करी) – Delicious subji using Mava / Mawa / Khoya / Pedha

Khoya Kaju (खोया काजू / पेढ्यांची शाही करी)

Khoya Kaju (खोया काजू / पेढ्यांची शाही करी) – Delicious subji using Mava / Mawa / Khoya / Pedha

खोया काजू / पेढ्यांची शाही करी मराठी

You must have had this subji in restaurant, it’s very yummy. Have you ever tried this at home? If not, try this recipe. It’s very easy. As the name suggests, this subji is uses Mava / Khoya. But I made some Jugaad. I’d lot of Pedhas with me collected during Ganapati festival. I’d kept them in refrigerator. So instead of fresh Mava / Khoya, I used Pedhas to make this subji. This subji is not spicy, it’s sweetish. So using Pedhas was a good option. I think this is the best use of Pedhas that you collect during any festival.

Ingredients (serves 3)

Crumbled Pedhas / Mava / Khoya ¾ cup

Cashew nuts ½ cup split into halves

Curd 2 tablespoon

Black pepper 4-5 seeds

Cloves 4-5

Onion 1 medium size

Garlic cloves 3-4

Ginger ½ inch piece

Cinnamon (Dalchini) powder ¼ teaspoon (adjust as per taste)

Black Pepper powder ¼ teaspoon (adjust as per taste)

Chopped coriander 1 teaspoon

Sugar 1 teaspoon (If you are using Mava / Khoya)

Salt to taste

Ghee (Clarified butter) / Butter 1 teaspoon

Instructions

1. Give horizontal and vertical slits to onion and peel garlic.

2. Cook Onion and Garlic in microwave on high for 1 minutes. Onion should be little soft. If you don’t have microwave, you can pressure cook Onion and Garlic.

3. Leave it to cool.

4. Grind Onion, Garlic and Ginger into a smooth paste.

5. In a pan, heat Ghee (clarified butter) / butter on low flame.

6. Fry cashew nuts till they are light brown. Take them out in a plate.

7. In the same pan, add black pepper and cloves. Add onion paste and sauté till light brown.

8. Beat curd and add to the pan. Bring it to boil.

9. Add crumbled Pedhas / Mava, Cinnamon powder, Black Pepper powder and Salt. Add Sugar if you are using Mava. Mix well. Add water to adjust consistency.

10. Once the mixture comes to boil, add fried cashew nuts and chopped coriander. Bring to Boil.

11. Delicious Khoya Kaju subji is ready. Garnish with chopped coriander and serve hot.

12. You can have it with Roti / Rice. But it tastes yummy as it is. Enjoy.

Note

1. Instead of Cashew Nuts, you can add Green Peas and make Khoya Mutter; or you can add Sweet corn and make Khoya Corn. For this boil peas / sweet corn and add to gravy in step 10.

Khoya Kaju (खोया काजू / पेढ्यांची शाही करी)
       ================================================================================

खोया काजू / पेढ्यांची शाही करी

खोया काजू रेस्टॉरंट मध्ये नक्कीच खाल्लं असेल. अप्रतिम चवीची ही शाही भाजी आहे. कधी घरी बनवलीय का? नसेल तर नक्की बनवून बघा. सोपी रेसिपी आहे. नावानेच समजते ह्यात खोया / मावा / खवा असतो. मसाले असतात आणि काजूगर असतात. मी जरा जुगाड करते. सणासुदीच्या दिवसात घरी खूप पेढे जमतात. ते कसे संपवायचे हा मोठा पेच पडतो. मी ते फ्रिजमध्ये ठेवून देते. आणि माव्याऐवजी हे पेढे घालून ही भाजी करते. पेढ्याचा एवढा छान उपयोग तेही भाजीसाठी कसं वाटतंय ऐकून ? जराशी गोडसर भाजीची चव आवडणाऱ्या सर्वांना नक्की ही शाही भाजी आवडेल. लोकांना कळणारही नाही एवढी चविष्ट करी कसली बनवलीय ते.

साहित्य (३ जणांसाठी )

पेढ्यांचा चुरा / मावा / खवा पाऊण कप

काजू अर्धा कप अर्धे तुकडे केलेले

कांदा १ मध्यम

आलं अर्धा इंच

लसूण ३४ पाकळ्या दही २ मोठे चमचे

काळी मिरी ४५दाणे

लवंग ४

दालचिनी पावडर पाव ते अर्धा चमचा (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

मिरी पावडर पाव ते अर्धा चमचा (चवीप्रमाणे कमी / जास्त करा )

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

साखर १ चमचा (जर मावा / खवा वापरला असेल तर)

मीठ चवीनुसार

तूप १ चमचा

कृती

. कांद्याला वरच्या बाजूला काटकोनात २ चिरा मारून कांदा व लसूण मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये एक मिनिट भाजून घ्या . कांदा नरम झाला पाहिजे. मायक्रोवेव्ह नसेल तर कांदा प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. कांदा व लसूण सोलून घ्या. मिक्सर मध्ये कांदा , लसूण व आलं घालून पेस्ट करून घ्या.

. एका कढईत तूप घालून त्यात काजू तळून घ्या.

. त्याच कढईत काळी मिरी, लवंग घाला आणि कांद्याची पेस्ट घाला व परतून घ्या.. कांदा लालसर झाला की त्यात दही फेटून घाला. आणि मिश्रण उकळून घ्या.

. त्यात पेढ्यांचा चुरा , दालचिनी पावडर, मिरी पावडर आणि मीठ घाला. हवे असल्यास पाणी घालून ग्रेव्ही हवी तशी पातळ बनवा.

. मिश्रणाला उकळी आली कि त्यात तळलेले काजू घाला.

. मिश्रण उकळले कि कोथिंबीर घालून सर्व करा.

. ही शाही करी कशाबरोबर ही छान लागते.

टीप

. ह्यात काजूऐवजी मटार / स्वीट कॉर्न घालून खोया मटर / खोया कॉर्न बनवू शकता. त्यासाठी मटार / कॉर्न शिजवून घ्या आणि स्टेप ७ मध्ये मिश्रणात घाला

Khoya Kaju (खोया काजू / पेढ्यांची शाही करी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes