Poha Alsi Laadoo (पोहा अळशी (जवस) चे खमंग पौष्टिक लाडू) – Flattened Rice Flax Seeds Laddu – My Innovative Recipe
पोहा अळशी चे खमंग पौष्टिक लाडू मराठी
My efforts to make Poha Laddus more nutritious led to this innovative recipe. This is one more easy recipe of nutritious Laadoo using Poha (Flattened Rice), Flax Seeds, Sesame seeds, Peanuts and Dried Coconut. These laddus are very delicious. You can include this in your breakfast / mid- morning snack / evening snack / tiffin. It can also be offered as Prasad on auspicious occasions.
Ingredients (makes about 25-28 laddus) (1 cup = 250 ml)
Thick Poha (Flattened Rice) 2 cup
Flax Seeds ½ cup
Roasted Peanuts 1 cup
Grated Dried Coconut 1 cup
White Sesame Seeds ½ cup
Crushed Jaggery About 1 cup
Powdered Sugar About 1 cup (Jaggery and Sugar together about 2 – 2.25 cups)
Ghee (Clarified Butter) About ½ cup + 1 teaspoon
Dry Fruits of your choice
Cardamom (Eliachy) Powder ¼ teaspoon
Instructions
1. Dry roast Poha till light brown. Leave it to cool.
2. Dry roast Sesame Seeds till they start to splutter. Leave to cool.
3. Dry roast Flax Seeds till they splutter. Leave to cool.
4. Dry roast grated dried Coconut till light brown. Leave it to cool.
5. Peel roasted Peanuts.
6. Grind Poha into fine powder.
7. Grind Sesame seeds, Flax seeds, peanuts and dry coconut separately into fine powder.
8. Mix Powdered Poha, sesame seeds, peanuts and dried coconut.
9. In a pan, add 1 teaspoon of ghee; add crushed jaggery and heat till jaggery melts. Do not over cook.
10. Pour melted Jaggery into the mixture.
11. Add powdered Sugar, dry fruits and cardamom powder. Mix well.
12. Add ghee 1 teaspoon at a time and mix. You need not heat the ghee. Use it at room temperature.
13. Stop adding ghee when the mixture is moist enough to roll Laddus.
14. Roll bite size laddus and enjoy these delicious nutritious Laddus.
15. These laddus will last for 3 weeks without refrigeration.
Note:
You can change the proportion of Jaggery and Sugar asper your choice. If you add more Jaggery, you will need little more Ghee to bind mixture and roll Laddus.
================================================================================
पोहा अळशी (जवस) चे खमंग पौष्टिक लाडू – माझी नाविन्यपूर्ण रेसिपी
नेहमीच्या पोह्यांच्या लाडवात आणखी पौष्टिक काय घालता येईल असा विचार करताना ही रेसिपी सुचली. हे अगदी सोपे लाडू खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात. घरी नेहमी असणारं साहित्य वापरलं जातं आणि ह्यात पाक करावा लागत नाही. बेसनाच्या लाडवांसारखं खूप वेळ भाजावं लागत नाही आणि तुपाचं प्रमाण बरोबर असेल का याचं टेन्शन पण नाही.
हे लाडू पोटभरीचे आहेत. सकाळच्या नाश्त्याला, मधल्या वेळेला, मुलांना / मोठ्यांना डब्यात द्यायला अतिशय उपयुक्त आहेत. पूजेच्या प्रसादासाठी ही करु शकता.
साहित्य (२५–२८ लाडू होतील) (१ कप = २५० मिली )
जाडे पोहे २ कप
भाजलेले शेंगदाणे १ कप
किसलेलं सुकं खोबरं १ कप
तीळ अर्धा कप
अळशी / जवस अर्धा कप
चिरलेला गूळ अंदाजे १ कप
पिठीसाखर अंदाजे १ कप (गूळ आणि साखर मिळून २ ते सव्वा २ कप)
साजूक तूप अंदाजे अर्धा कप + १ चमचा
सुका मेवा आवडीनुसार
वेलची पूड पाव चमचा
कृती
१. पोहे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
२. किसलेलं सुकं खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या.
३. तीळ आणि अळशी (जवस) वेगवेगळं खमंग भाजून घ्या.
४. पोहे, खोबरं, तीळ, अळशी गार झाले की मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
५. भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढून शेंगदाणे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. एका परातीत सर्व पिठं एकत्र करा.
६. एका पातेल्यात १ चमचा तूप घालून मंद आचेवर गूळ वितळवून घ्या.
७. वितळलेला गूळ परातीत घाला आणि मिक्स करा.
८. पिठीसाखर घालून मिक्स करा. वेलची पूड आणि सुके मेवे घालून मिक्स करा.
९. आता १–१ चमचा गरम तूप घालून मिश्रण मिक्स करा. लाडू वळता येतील एवढं मऊ होईपर्यंत तूप घालत राहा. तूप जास्त लागत नाही.
१०. मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
११. हे पौष्टिक लाडू २–३ आठवडे टिकतात.
टीप
१. गूळ आणि पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही हवं तसं बदलू शकता. पण गूळ जास्त घातला तर तूप थोडं जास्त लागतं.
Your comments / feedback will help improve the recipes