Rava Dosa (रवा डोसा) – Semolina Crepe
रवा डोसा मराठी
This is a popular South Indian Dosa that does not require any grinding. It is a thin, crisp Dosa made using Semolina. You can make it plain or add Onions to it. It is served with Chutney and Sambar. You should remember a few things to master this art of Perfect Dosa. 1. Dosa Batter should be watery. 2. Use a non stick Flat Griddle. 3. Before pouring batter on griddle, make sure griddle is steaming hot. 4. Do not sprinkle water before you pour the batter (like we do for normal Dosa). 5. Do not cover the dosa while cooking. With little practice, you will be able to make Perfect Thin Crisp Dosa.
Process of roasting Rava Dosa is similar to that of roasting Ghavan. The only difference is that Rava Dosa is roasted without placing a lid. I’m attaching my video of roasting Ghavan.
Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)
Fine Semolina 1 cup
Rice Flour 1 cup
Wheat Flour ¼ cup
Onions 2 medium finely chopped (optional)
Green Chilies 2 finely chopped
Ginger 1 inch piece finely chopped
Coriander Leaves 2-3 teaspoon finely chopped
Cumin Seeds ½ teaspoon
Buttermilk 1 cup
Salt to taste
Ghee (Clarified Butter) / Oil to be used while roasting
Instructions
1. Mix all ingredients except Ghee / Oil. Add required amount of water to make batter of watery consistency. Rest the batter for 30 minutes.
2. Heat a flat non stick Griddle (Tava). Turn gas to high flame. Do not sprinkle water as we do for Dosa. Griddle should be steaming hot. Take a small cup full of batter and pour it on griddle to form a thin uniform layer. Spread some oil / Ghee on the Dosa.
3. Do not cover. Cook till the batter get dried.
4. If you want, you can flip the dosa and cook other side. Else serve it with only one side cooked. I cook both sides.
5. Serve hot with choice of Chutney and Sambar.
===============================================================================
खमंग कुरकुरीत रवा डोसा
कुरकुरीत पातळ रवा डोसा सगळ्यांनाच आवडतो. ह्या डोशासाठी काही वाटावं लागत नाही. अगदी सोपी रेसिपी आहे. काही गोष्टी नीट केल्या की छान कुरकुरीत डोसे करणं जमतं. १. डोश्याचं पीठ अगदी पातळ भिजवावं. २. सपाट नॉन स्टिक तवा / किंवा बिडाचा तवा वापरावा. ३. डोसे घालायच्या आधी तवा वाफ येईपर्यंत गरम करावा. ४. गॅस मोठा ठेवून तव्यावर पाणी न मारता पीठ तव्यावर घालावे. ५. झाकण न ठेवता डोसा भाजावा. रवा डोश्याचं पीठ तव्यावर घालायची पद्धत आपल्या घावनासारखी आहे. पीठ ही तेवढंच पातळ असावं. फक्त एकच फरक म्हणजे रवा डोसा झाकण न ठेवता भाजतात. मी घावनाचा एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक इथे देतेय.
२–३ वेळा प्रयत्न केला की नक्कीच छान डोसे बनवता येतील.
साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
बारीक रवा १ कप
तांदुळाचं पीठ १ कप
गव्हाचं पीठ पाव कप
कांदे २ मध्यम आकाराचे बारीक चिरून (ऐच्छिक)
हिरव्या मिरच्या २ बारीक चिरून
आलं १ इंच बारीक चिरून
कोथिंबीर २–३ चमचे बारीक चिरून
ताक १ कप
जिरं अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
तूप / तेल डोसे भाजताना घालायला
कृती
१. तूप / तेल वगळून सगळं साहित्य एका बाउल मध्ये मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी पातळ पीठ भिजवा. अर्धा तास पीठ झाकून ठेवा.
२. एक सपाट नॉन स्टिक तवा गरम करून, गॅस मोठा ठेवून, एक पळीभर पीठ तव्यावर ओता. हे पीठ तव्यावर नंतर पसरता येत नाही. पीठ तव्यावर घालतानाच पळी गोलाकार फिरवा म्हणजे गोल डोसा बनेल.
३. गॅस बारीक करून डोश्यावर थोडं तूप/तेल घाला. झाकण न ठेवता डोसा भाजून घ्या.
४. पीठ सुकले की पाहिजे असल्यास डोसा परतून दुसरी बाजू भाजून घ्या. नाहीतर एक च बाजू भाजून डोसा काढा.
५. गरमागरम रवा डोसा चटणी, सांबार बरोबर खायला द्या.
Can u please share neer dosa receipe.. I tried but either it was not spreading properly and it tasted rice raw taste ..
Sure Sarika. Will share soon.\nSudha