Paneer Stuffed Paratha (पनीर स्टफ्ड पराठा) – Cottage Cheese Stuffed Paratha
Paneer (Cottage Cheese) is very nutritious (Protein rich) and generally liked by most people. Paratha with stuffed Panner filling is quite tasty and healthy option for breakfast / lunch / dinner. It’s not very difficult to make this paratha. If you have been making Stuffed Parathas, you will find this very easy. This is a No Onion Garlic recipe.
Ingredients (Makes 9-10 Parathas) (1 cup = 250 ml)
For Filling
Grated Paneer (Cottage Cheese) 2 cups
Red chilly Powder ½ teaspoon
Finely chopped Green Chilies 1-2
Cumin Powder ½ teaspoon
Coriander Powder ½ teaspoon
Mango Powder ½ teaspoon
Chopped Coriander 2 tablespoon
Garam Masala ½ teaspoon
Crushed Ginger ½ teaspoon
Salt to Taste
For Cover
Wheat Flour 2 cups
Salt 2 pinches
Oil 1 teaspoon
Wheat flour for dusting while rolling Parathas
Oil/ Ghee (Clarified Butter) for Pan Frying Parathas
Instructions
1. Add salt and 1 teaspoon oil to wheat flour. Add water gradually and bind a soft dough. Knead for 5 minutes and keep it covered for 30 minutes.
2. Make the filling just before rolling Parathas. In a Bowl, mix all ingredients for the filling. No cooking is required for the filling.
For Rolling Parathas
1. Knead the dough for 3-4 minutes. Make big lemon size balls of the dough.
2. Roll the dough ball into 4-5 inches diameter circle.
3. In the centre of the circle, spread little Ghee and place 2 tablespoons of filling over the ghee.
4. Gather the dough to make pleats, gently pull them together and seal the edges.
5. Dust the filled dough ball with dry wheat flour, gently pat it to make a circle 4-5 inches in diameter.
6. Now with the help of rolling pin, gently roll the dough ball into a medium thick circle (Paratha). Keep the sealed side touching the rolling board. Use dry wheat flour for dusting.
7. Heat a non stick Griddle. Transfer the Paratha to hot Griddle.
8. Roast it on medium flame for 2-3 minutes.
9. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast for 2-3 minutes.
10. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast till Paratha is nicely roasted and gets light brown colour on both sides.
11. Serve Hot Paratha with Chutney / Pickle / Butter / Curd / Yogurt.
=================================================================================
पनीर स्टफ्ड पराठा
पनीर खूप पौष्टिक (प्रोटीन रीच) असतं आणि बऱ्याच जणांना आवडतं. पनीर चे स्टफ्ड पराठे अतिशय चविष्ट आणि पोटभरीचे असतात. ज्यांना स्टफ्ड पराठे करायची सवय आहे त्यांच्यासाठी अगदी सोपे आणि नवीन प्रयत्न करणाऱ्यांनाही फार कठीण नाही असे हे पराठे कधीही खायला छान लागतात.
ह्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची. पराठे बनवायच्या वेळीच सारण बनवायचं. आधी बनवून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं.
साहित्य ( ९–१० पराठ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
सारणासाठी
किसलेलं पनीर २ कप
लाल तिखट अर्धा चमचा
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या १–२
जिरं पावडर अर्धा चमचा
धने पावडर अर्धा चमचा
आमचूर अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
ठेचलेलं आलं अर्धा चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
आवरणासाठी
कणिक २ कप
मीठ २ चिमूट
तेल १ चमचा
कणिक पराठे लाटताना लावण्यासाठी
तेल / तूप पराठे भाजताना लावण्यासाठी
कृती
१. कणकेत मीठ आणि १ चमचा तेल घालून सैलसर पीठ भिजवून घ्या. पीठ ५ मिनिटं मळून अर्धा तास झाकून ठेवा.
२. सारण पराठे बनवायच्या वेळी बनवा. आधी बनवून ठेवू नका. त्याला पाणी सुटतं. एका बाउल मध्ये सारणाचे सर्व साहित्य एकत्र करून नीट मिक्स करा. सारण तयार आहे.
पराठे बनवण्यासाठी
१. भिजवलेली कणिक छान मळून घ्या आणि त्याचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा.
२. पिठाची पुरी लाटून त्यावर मध्यभागी थोडं तूप गोलाकार पसरा.
३. पनीर चं २ टेबलस्पून सारण तूप लावलेल्या भागावर ठेवा. सारण मधे ठेवून पिठाच्या चुण्या घालत गोळा बंद करा. गोळ्याच्या वरचं ज्यादा पीठ गोळ्यावर दाबून टाका.
४. भरलेल्या गोळ्याला दोन्ही बाजूनी थोडं सुकं पीठ लावून हाताने थापून पुरी बनवा म्हणजे सारण नीट पसरलं जाईल.
५. आता गोळा बंद केलेली बाजू पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने जरा जाडसर पराठा लाटून घ्या. हवे असेल तर लाटताना सुकं पीठ लावा.
६. नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर पराठा टाका. मध्यम गॅस वर २–३ मिनिटं भाजून पराठा पलटून घ्या. पराठ्यावर थोडं तेल / तूप टाका आणि पसरून घ्या.
७. २–३ मिनिटांनी परत एकदा पलटून दुसऱ्या बाजूवर तेल / तूप घाला.
८. पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजला की गरमागरम पराठा लोणचं / चटणी / लोणी /दह्याबरोबर खायला द्या.
Nice n easy
Thank you Anagha.