Poha Gulkand Laadoo (पोहा गुलकंद लाडू) – Flattened Rice Laddus with Rose Petals Preserves – My Innovation
Nutritionists recommend to have Gulkand every day in hot Indian summer. I wanted to make Shahi Gulkand Laddus but since the weather is too hot, it would been too difficult to roll those laddus with Gulkand filling. So I tried something different with Gulkand. This is my own recipe that gives a delicious twist to a standard Laddu recipe. Poha laddus are very easy to make. It does not require long hours of roasting and no problematic Chasni (Sugar Syrup) preparation. Addition of Gulkand not only enhances the taste but also reduces the Ghee (Clarified Butter) requirement for Laddus. Try this recipe and let me know how you find it.
Ingredients (Makes 15-16 Laddus) (1 cup = 250 ml)
Jada Poha / Thick flattened rice 2 cups
Grated dry coconut 1 cup
Gulkand (Rose Petals Preserves) ¾ cup
Ghee (clarified Butter) 1 tablespoon
Almonds 15 chopped in small pieces
Puffed Amaranth (Rajgira Laahi) ½ cup
Instructions
1. Dry roast Poha till they are light brown in colour. Transfer to a plate and leave to cool.
2. Dry roast grated dry coconut till light brown. Transfer to another plate and leave to cool.
3. Dry roast almonds and allow to cool.
4. Grind dry coconut and tranfer to a bowl.
5. Grind Poha into a fine powder; transfer to the same bowl.
6. Add almonds to the bowl and mix it together.
7. Add Gulkand and mix.
8. Add Ghee and mix. Add Puffed Amaranth (Rajgira Laahi) and mix.
9. Roll Laddus of desired size.
10. Delicious, healthy Poha Gulkand Laddus are ready.
11. These Laddus can be stored at room temperature for 3 weeks.
Note
1. If required add ½ tablespoon of Ghee (Clarified Butter) to the mixture. But mostly you won’t require it.
===================================================================================
पोहा गुलकंद लाडू
उन्हाळ्यात गुलकंद खाल्लेला चांगला असतो. एकदा मला शाही गुलकंद लाडू करायचे होते . पण उन्हाळ्यात तापमान जास्त असताना ते लाडू करायला कठीण पडतं कारण गरम हवेमुळे गुलकंदाचं सारण अगदी चिकट होतं. म्हणून एक नवीन प्रयोग केला. पोहा आणि गुलकंद घालून लाडू केले. प्रयोग अगदी यशस्वी झाला. मस्त स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू झाले. हे लाडू करायला खूप सोपे आहेत. गुलकंदामुळे चव छान येते आणि तूप ही कमी लागते. ह्यात मी थोड्या राजगिऱ्याच्या लाह्या घातल्या. त्यामुळे लाडू जास्त पौष्टिक झाले आणि दिसले ही छान. हे लाडू पक्वान्न म्हणून किंवा नाश्ता म्हणून ही खाऊ शकता.
साहित्य (१५–१६ लाडवांसाठी ) (१ कप = २५० मिली )
जाडे पोहे २ कप (कांदे पोहे करायला वापरतो ते पोहे )
सुक्या खोबऱ्याचा कीस १ कप
गुलकंद पाऊण कप
तूप १ टेबलस्पून
बदाम १५ बारीक तुकडे करून
राजगिरा लाह्या अर्धा कप
कृती
१. पोहे सुकेच लालसर भाजून घ्या. ताटलीत पसरून गार करा.
२. सुक्या खोबऱ्याचा कीस लालसर भाजून घ्या. ताटलीत पसरून गार करा.
३. बदामाचे तुकडे सुकेच १ मिनिट भाजून घ्या.
३. मिक्सर मध्ये पोहे आणि खोबरं वेगवेगळं बारीक दळून घ्या.
४. एका परातीत दळलेले पोहे आणि खोबरं, गुलकंद आणि बदामाचे तुकडे एकत्र करा.
५. तूप घालून मिसळा.
६. राजगिरा लाह्या घालून एकत्र करा आणि लाडू वळा.
७. हे लाडू ३ आठवडे टिकतात.
टीप
१. जरूर पडल्यास आणखी अर्धा चमचा तूप घाला. पण बहुतेक लागणार नाही.
राजगिरा लाह्या नसतील तर साळीच्या चालतील का?
हो चालतील. पण मिक्सर मध्ये जाडसर पीठ करून घाला.
Mast mast
Thank you Jayshree