Rava Cake (रव्याचा केक) – Eggless Semolina Cake

Rava Cake (रव्याचा केक)

Rava Cake (रव्याचा केक) – Eggless Semolina Cake

रव्याचा केक मराठी

Rava Cake (Semolina Cake) is a popular eggless cake in most parts of India. Even when there were no electric ovens, this cake was baked using a regular pan or a special pan that was used for roasting cake. These are different recipes for making this cake. I use Semolina, Granular Sugar, Milk, Curd with little Pure Home made Ghee (Clarified Butter). This cake does not require rigorous beating. It’s an easy recipe to make a delicious and healthy cake. In case you do not have oven, you can also bake this cake in a Wok or a regular pan with a lid.

Ingredients (Makes about 25 pieces) (1 cup = 250 ml)

Fine Semolina 1.5 cups

Sugar 1 cup

Milk ¾ to 1 cup

Curd (Dahi / Yogurt) ¾ to 1 cup

Pure Ghee (Clarified Butter) 2 tablespoon + for greasing the tray

Baking powder ½ teaspoon

Baking soda ¼ teaspoon

Salt ¼ teaspoon

Cardimum Powder ¼ teaspoon

Saffron 7-8 strands (optional)

Instructions

1. Mix Semolina, Sugar, ¾ cup of Milk, ¾ cup of Curd, Ghee, Saffron together in a bowl. Keep stirring the mixture with a spoon till sugar dissolves. Check the consistency of batter. If it’s too thick, add remaining Milk and / Curd to get the cake consistency batter.

2. Keep the mixture covered for 2 hours.

3. Mix in Baking Powder, Baking Soda, Salt and Cardamom powder.

4. Grease a baking tray.

5. Pour the mixture in baking tray. Gently Tap the baking tray on kitchen platform so that the mixture levels and air bubbles are removed.

6. Bake at 210 degree centigrade (pre-heated for 10 minutes) for 25-30 minutes till mixture is cooked.

Rava Cake (रव्याचा केक)

7. On cooling cut in desired shape pieces and serve.

8. This cake can be stored for 2 days at room temperature. If you want to store longer, store in refrigerator.

Note

1. It will take 40-45 minutes to bake this cake in a pre-heated Pan. Check the cake after 45 minutes by inserting a toothpick. If not done, bake further and check after every 8-10 minutes.

2. Amount of Milk and Curd required depends on coarseness of Semolina. If Semolina is too fine, you would ¾ cup each of Milk and Curd will be sufficient.

3. You can add dry fruits of your choice. But this cake is so delicious as it is; you really don’t need any dry fruits.

Rava Cake (रव्याचा केक)
Rava Cake (रव्याचा केक)

===================================================================================

बिनअंड्याचा रव्याचा केक

रव्याचा केक भारतात बहुतेक सर्व ठिकाणी बनवला जातो. जेव्हा घरी इलेक्ट्रिक ओव्हन नव्हता तेव्हाही हा केक पातेल्यावर कोळसे ठेवून किंवा गॅसवर ठेवायच्या केक पात्रात बनवला जायचा. हा केक बनवण्याच्या रेसिपीज वेगवेगळ्या आहेत. मी ह्या केक मध्ये रवा, साधी साखर, दूध, दही आणि थोडं तूप घालते. मिश्रण फार फेटावं लागत नाही. अगदी सोपा असा हा बिनअंड्याचा केक अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. चहाबरोबर खायला किंवा मुलांना द्यायला ही उत्तम पदार्थ आहे.  

ओव्हन नसेल तर हा केक कढईत किंवा पातेल्यात भाजू शकता

साहित्य (अंदाजे २५ तुकडे बनतात) (१ कप = २५० मिली)

बारीक रवा दीड कप

साखर १ कप

दूध पाऊण ते कप

दही पाऊण ते कप 

साजूक तूप २ टेबलस्पून + बेकिंग ट्रे ला लावण्यासाठी

मीठ पाव चमचा 

बेकिंग सोडा पाव चमचा

बेकिंग पावडर अर्धा चमचा

वेलची पावडर पाव चमचा

केशर   ५६ काड्या (ऐच्छिक)

कृती

. एका वाडग्यात रवा, पाऊण कप दूध, साखर, पाऊण कप दही, केशर, तूप   मिक्स करून साखर विरघळेपर्यंत ढवळा. मिश्रण फार घट्ट असेल तर उरलेले दूध / दही घाला आणि मिक्स करा. २ तास झाकून ठेवा.

. मिश्रणात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.

. केक च्या ट्रे ला तूप लावून त्यात मिश्रण घाला. ट्रे ओट्यावर हलकेच आपटून घ्या म्हणजे पिठात हवेचे बुडबुडे असतील तर निघून जातील.

. ओव्हन २१० डिग्री सेन्टिग्रेड वर १० मिनिटं प्रीहीट करून केक २५३० मिनिटं भाजून घ्या. केक चा वरचा थर हलका गुलाबी झाला तर केक खमंग लागतोटूथपीक घालून चेक करा.

Rava Cake (रव्याचा केक)

. केक थंड झाला की आवडीच्या आकाराचे तुकडे कापून खायला द्या.

. हा केक फ्रिज बाहेर २ दिवस राहतो. जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रिज मध्ये ठेवा

टीप

कढईत/ पातेल्यात केक भाजायचा असेल तर प्री हीटेड कढईत/ पातेल्यात ४०४५ मिनिटं केक मंद आचेवर भाजा. ४० मिनिटानंतर चेक करा. केक भाजला नसेल तर आणखी थोडा वेळ भाजा आणि प्रत्येक १० मिनिटांनी चेक करा.  

. रवा जास्त बारीक असेल तर पाऊण कप दूध आणि पाऊण कप दही पुरेल. रवा जरा जाडसर असेल तर उरलेलं दूध / दही घालापीठ जास्त पातळ झालं तर केक चांगला फुगत नाही

. हवं असेल तर सुका मेवा घालू शकता. पण हा केक असाच एवढा स्वादिष्ट लागतो की सुक्या मेव्याची जरूर नाही

Rava Cake (रव्याचा केक)
Rava Cake (रव्याचा केक)

6 Comments

Your comments / feedback will help improve the recipes