Ghosale (Gilki) Chana Dal Bhaaji ( घोसाळं – दोडका / गिलकी- चणा डाळ भाजी ) – Sponge Gourd Subji with Split Chickpeas

Ghosale (Gilki) Chana Dal Bhaaji ( घोसाळं - दोडका / गिलकी- चणा डाळ भाजी )

Ghosale (Gilki) Chana Dal Bhaaji ( घोसाळं दोडका / गिलकी चणा डाळ भाजी ) – Sponge Gourd Subji with Split Chickpeas

घोसाळं दोडका / गिलकी-  चणा डाळ भाजी मराठी

This is a traditional recipe of a subji using Sponge Gourd. Soaked Split Chickpeas are added to this subji. Onion, Garlic is not used in this subji. All other ingredients are always available in Indian kitchen. It’s an easy recipe that makes a tasty subji.

Marathi – Ghosale / DodkaKannada – TuppahirekaiHindi – Ghiatorui/Gilki

English – Sponge Gourd

Ingredients (Serves 3) (1 cup = 250ml)

Sponge Gourd (Ghosale) 3 medium size

Ghosale (घोसाळं) – Sponge Gourd

Split Chickpeas (Chana Dal) ½ cup soaked for 4-5 hours

Tamarind Pulp ½ teaspoon or Mango Powder ¼ teaspoon

Crushed Jaggery About 1 teaspoon (adjust as per taste)

Chili Powder ¾ to 1 teaspoon

Goda Masala 1 teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Peel and check both ends of Ghosale to confirm it’s not bitter. Chop Ghosale into medium size pieces.

2. In a bowl boil water. Add Soaked Split Chickpeas and cook on low flame till soft.

3. In a pan, heat oil, add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter; add a turmeric powder and asafoetida. Add chopped Ghosale. Sauté on medium flame for 3-4 minutes.

4. Add water just enough to cover Ghosale pieces and cook covered till Ghosale is cooked. Don’t overcook. Ghosale gets mushy when overcooked.

5. Add cooked Split Chickpeas, Chili powder, Tamarind pulp, Jaggery, Goda Masala, salt, scraped coconut and chopped coriander leaves.

6. Mix well. Let the mixture come to boil. Check the consistency of subji. Add water if required.Cook for 3-4 minutes.

7. Tasty Ghosale Chana Dal Subji is ready.

8. Enjoy with Roti, Bhakari (Indian Bread).

Note:

1. Instead of Split Chickpeas (Chana Dal), you can add boiled sweet corn (about ½ cup) and boiled peanuts (handful).

2. You can use the same recipe to make Subji using Snake Gourd.

Ghosale (Gilki) Chana Dal Bhaaji ( घोसाळं – दोडका / गिलकी- चणा डाळ भाजी )
Ghosale (Gilki) Chana Dal Bhaaji ( घोसाळं – दोडका / गिलकी- चणा डाळ भाजी )
       ===================================================================================

घोसाळं (दोडका / गिलकी) चणा डाळ भाजी

घोसाळं बऱ्याच लोकांना आवडत नाही कारण जास्त शिजलं तर त्याचं अगदी मेण होतं (माझ्या आईचा शब्दप्रयोग आहे). म्हणून घोसाळ्याची भाजी कधी जास्त शिजवायची नाही. भाजीचे तुकडे नीट राहिले पाहिजेत म्हणजे चव बिघडत नाही. ही पारंपारिक ब्राह्मणी पद्धतीची भाजी आहे ज्यात कांदा, लसूण घालत नाहीत. भिजवलेली चणा डाळ, चिंच, गूळ, लाल तिखट आणि गोडा मसाला घालून छान चविष्ट भाजी बनते. एकदा करून तर बघा.

अशीच पडवळाची भाजी पण बनवतात

ह्याच भाजीत मी कधी कधी चण्याच्या डाळीऐवजी मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न) आणि शेंगदाणे घालते. तशी भाजीसुद्धा छान लागते.

साहित्य (३ जणांसाठी)  (१ कप = २५० मिली )

घोसाळी  ३ मध्यम

Ghosale (घोसाळं) – Sponge Gourd

चणा डाळ अर्धा कप ४५ तास भिजवून

चिंचेचा कोळ अर्धा चमचा / आमचूर पाव चमचा

चिरलेला गूळ १ चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)

लाल तिखट पाऊण ते एक चमचा

गोडा मसाला १ चमचा

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग चिमूटभर

हळद अर्धा चमचा 

साखर अर्धा चमचा

खवलेला नारळ १ टेबलस्पून 

कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. घोसाळी सोलून कडू नाहीत ते बघून घ्या आणि घोसाळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा.

. एका छोट्या पातेल्यात पाणी गरम करून त्यात भिजलेली चणा डाळ घाला आणि मंद गॅस वर डाळ नरम होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.   

. एका कढईत तेल  घालून मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घालून फोडणी करा. त्यात घोसाळ्याचे तुकडे घाला

. मध्यम आचेवर ३४ मिनिटं परतून घ्या. आता घोसाळ्याचे तुकडे बुडतील एवढे पाणी घालून झाकण ठेवून घोसाळी नरम होतील एवढं शिजवून घ्या. जास्त शिजवू नका

. कढईत शिजलेली चणा डाळ घाला.   

. त्यात चिंचेचा कोळ, गूळ, लाल तिखट, गोडा मसाला, नारळ, कोथिंबीरमीठ घालून मिक्स करा. एक उकळी काढा. भाजीला रस हवा असेल त्याप्रमाणे पाणी घाला आणि उकळी काढा.   

. टेस्टी घोसाळं चणा डाळ भाजी तयार आहे

. पोळी, भाकरी बरोबर खायला छान लागते.

टीप

. ह्या भाजीत चणा डाळीऐवजी अर्धा कप शिजवलेले मक्याचे दाणे (स्वीट कॉर्न) आणि मूठभर शिजवलेले शेंगदाणे ही घालू शकता

Ghosale (Gilki) Chana Dal Bhaaji ( घोसाळं – दोडका / गिलकी- चणा डाळ भाजी )
Ghosale (Gilki) Chana Dal Bhaaji ( घोसाळं – दोडका / गिलकी- चणा डाळ भाजी )

   

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes