Malai Kulfi (मलई कुल्फी) – Delicious and Creamy Indian Ice Cream

Malai Kulfi (मलई कुल्फी)

Malai Kulfi (मलई कुल्फी) – Delicious and Creamy Indian Ice Cream

मलई कुल्फी मराठी

Everyone loves Malai Kulfi. And when you can make it at home, one can enjoy it more – as and when one wants it. You are sure of the quality of ingredients. It’s not difficult to make Kulfi at home. I did not have Kulfi Moulds with me. So I used silicone Muffin Moulds. Kulfi was set properly in these moulds and it was easy to unmould it as Silicone Moulds are flexible. If you don’t have any moulds, you can set Kulfi in any bowl and then scoop it out while serving. Don’t forget to set the refrigerator on ‘Maximum cool’ setting when you keep Kulfi in the freezer. It takes 8-10 hours for Kulfi to set. So don’t keep opening the freezer to check if Kulfi is set. It will delay the process of setting.

Ingredients (Serves 4)

Full Fat Milk ½ litre + 2 Tablespoon

Milk Powder 2 Tablespoon

Condensed Milk (Milkmaid) 2 Tablespoon

Sugar 2 Tablespoon (adjust as per required sweetness)

Saffron 3-4 strings

Cardamom Powder ¼ teaspoon

Dry fruit Powder 1 Tablespoon

Instructions

1. Soak Saffron in 1 teaspoon warm milk.

2. Add 2 tablespoon of warm milk to milk powder and make a smooth paste. Ensure there are no lumps.

3. In a deep Pan, add Milk and bring it to boil. Keep boiling the milk and reduce it to half. Keep stirring all the time.

4. Add Milk powder paste to the pan and boil the mixture. Boil for 2-3 minutes.

5. Add condensed milk to the pan and boil the mixture for 2-3 minutes.

6. Add Sugar and boil the mixture for 2-3 minutes.

7. Add dry fruit powder, soaked saffron and boil the mixture for 2-3 minutes.

8. Consistency of the mixture should be like condensed milk. Keep boiling the mixture till you get this consistency.

9. Switch off the gas. Add Cardamom powder and mix.

10. Leave the mixture to come to room temperature. Initially for 15 minutes, Keep stirring after every 2-3 minutes to avoid forming a layer of cream on the top.

11. When the mixture is totally cold, pour in moulds. Deep freeze the mixture for 10 hours. Ensure refrigerator is set on maximum cool setting before you freeze the moulds.

Malai Kulfi (मलई कुल्फी) – ready for setting (फ्रिजर मध्ये ठेवण्यापूर्वी)

12. Once the Kulfi is set properly, demould and enjoy delicious Malai Kulfi.

13. You can store this Kulfi in deep freezer for 2 weeks.

Malai Kulfi (मलई कुल्फी)
Malai Kulfi (मलई कुल्फी)
Malai Kulfi (मलई कुल्फी)
 ===================================================================================

मलई कुल्फी

कुल्फी सगळ्यांना आवडते. आणि ती जर घरी बनवलेली असेल तर सोने पे सुहागा. म्हणजे काय आणि कशा प्रकारचे जिन्नस त्यात घातलेत याची चिंता नको. रेसिपी सोपी आहे.

माझ्याकडे कुल्फीचे साचे नाहीत. म्हणून मी सिलिकॉन च्या मफिन च्या साच्यामध्ये कुल्फी सेट केली. छान सेट झाली आणि साचे फ्लेक्सिबल असल्यामुळे कुल्फी सहज काढता ही आली. तुमच्याकडे साचे नसतील तर कुठल्याही बाउल मध्ये कुल्फी सेट करू शकताकुल्फी फ्रिजर मध्ये ठेवल्यावर फ्रिजचं सेटिंग बदलून सगळ्यात जास्त थंडकरायला विसरू नकाकुल्फी सेट व्हायला ८१० तास लागतातम्हणून पुन्हा पुन्हा फ्रिज उघडून बघू नकात्यामुळे कुल्फी सेट व्हायला आणखी वेळ लागेल.

साहित्य (४ जणांसाठी)

म्हशीचं दूध अर्धा लिटर + २ टेबलस्पून

दुधाची पावडर २ टेबलस्पून 

कंडेन्सड मिल्क (मिल्कमेड) २ टेबलस्पून

साखर २ टेबलस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

केशर ३४ काड्या

सुक्या मेव्याची पूड १ टेबलस्पून बदाम / काजू / पिस्ते मिक्सरमध्ये फिरवून बारीक करा

वेलची पूड पाव चमचा

कृती

. केशर १ चमचा कोमट दुधात भिजत घाला.

. दुधाच्या पावडर मध्ये २ टेबलस्पून कोमट दूध घालून मिश्रण एकजीव करा. गुठळी होऊ देऊ नका.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळून आटवा. दूध पाव लिटर होईपर्यंत आटवा.

. पातेल्यात दुध्याच्या पावडरीचं मिश्रण घाला. मिक्स करून २३ मिनिटं उकळवा.

. पातेल्यात कंडेन्सड मिल्क घालामिक्स करून २३ मिनिटं उकळवा.

. पातेल्यात साखर घाला. मिक्स करून २३ मिनिटं उकळवा.  

. पातेल्यात केशर आणि सुक्या मेव्याची पूड घाला. मिक्स करून २३ मिनिटं उकळवा. गुठळी होऊ देऊ नका.

. मिश्रण कंडेन्सड मिल्क सारखं घट्ट करायचं आहे. पातळ असेल तर आणखी उकळवा.

. गॅस बंद करा. वेलची पूड घालून ढवळून घ्या.

१०. मिश्रण थंड करून घ्या. सुरुवातीला १५ मिनिटं २२ मिनिटांनी ढवळा म्हणजे साय येणार नाही.

११. मिश्रण पूर्ण थंड झाले की साच्यामध्ये घालून साचे फ्रिजर मध्ये ठेवा. फ्रिजचं सेटिंग बदलून सगळ्यात जास्त थंडकरा.

१२. १० तासांनी कुल्फी सेट होईल. साच्यामधून काढून स्वादिष्ट कुल्फीचा आस्वाद घ्या.

१३. कुल्फी फ्रिजर मध्ये २ आठवडे चांगली राहते.

Malai Kulfi (मलई कुल्फी)
Malai Kulfi (मलई कुल्फी)
Malai Kulfi (मलई कुल्फी)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes