Mishr Dalinchi Idli (मिश्र डाळींची इडली) – Idli without Rice
People who can’t eat rice have to refrain themselves from eating Idlis. Check this Idli recipe that does not contain rice. It has Urad Daal (Split Black Gram) and Moong Daal (Split Petite Yellow Lentil). I used Chhilkewali Moong Daal (Yellow Lentil with husk) to make it more healthy. These tasty Idlis are very soft and fluffy. Try them out.
Ingredients (1 cup = 250ml)
Urad Daal (Split Black Gram) 1 cup
Chhilkewali Moong Daal (Split Yellow lentil with Husk) 1 cup (moong daal with husk)
Salt to taste
Optional ingredients
Ginger paste 1 teaspoon
Chilly paste ½ teaspoon
Instructions
1. Wash and soak Urad Daal and Moong Daal separately for 7-8 hours.
2. Drain water grind them separately. Grind Moong Daal coarse and Urad Daal fine.
3. Mix both Daals in a bigger bowl. Cover it and keep for fermentation for 5-6 hours.
4. After it is fermented, add salt.
5. If you want to add ginger and chilly paste, do it now.
6. Boil water in Idli steamer. Apply some oil to idli moulds. Add batter in each mould.
7. When water in the steamer starts boiling, keep idli stand in the steamer and Steam idlis for 20-25 minutes.
8. Serve hot with your choice of Chutney / Sambar.
Note
1. This Batter ferments faster than normal Idli batter. If you are keeping it for fermentation overnight, make sure you grind Daal and prepare the batter as late as possible.
====================================================================================
मिश्र डाळींची इडली – तांदूळ न घालता
जे कोणी तांदूळ खाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी खास तांदुळाशिवाय इडली. जे तांदूळ खातात त्यांनाही जरा वेगळा प्रकार म्हणून ही इडली आवडेल. ह्यात उडीद डाळ आणि मूग डाळ घालतात. म्हणजे अगदी प्रोटीन पॅक्ड नाश्ता. मी ही इडली आणखी पौष्टिक बनवण्यासाठी सालाची मूग डाळ घालते.
ह्या रेसिपी त लक्षात ठेवायची एकच गोष्ट म्हणजे हे इडलीचं पीठ ५–६ तासात छान आंबते. म्हणून सकाळी इडलीचा बेत असेल तर आदल्या रात्री उशिरा डाळ वाटून ठेवा. नाहीतर पीठ आंबट होईल.
साहित्य (१ कप = २५० मिली )
उडीद डाळ १ कप
सालाची मूग डाळ १ कप
मीठ चवीनुसार
वाटलेलं आलं १ चमचा ऐच्छिक
वाटलेली हिरवी मिरची अर्धा चमचा ऐच्छिक
कृती
१. उडीद डाळ आणि मुगाची डाळ धुवून वेगवेगळी ७–८ तास पाण्यात भिजवा.
२. पाणी निथळून डाळी वेगवेगळ्या वाटून घ्या. मुगाची डाळ जाडसर वाटा आणि उडीद डाळ बारीक वाटा.
३. दोन्ही पिठं एकत्र करून मिसळून घ्या आणि झाकण ठेवून ५–६ तास पीठ आंबण्यासाठी ठेवा.
४. पिठात मीठ घाला. मिरची, आलं घालायचं असेल तर घाला.
५. इडली पात्रात / मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून घ्या.
६. साच्यात थोडं थोडं पीठ घालून पात्रातलं पाणी उकळलं की इडली साचा पात्रात ठेवा आणि झाकण ठेवून २०–२५ मिनिटं वाफवून घ्या.
७. गरम गरम इडल्या चटणी / सांबार बरोबर सर्व्ह करा.
टीप
१. हे इडलीचं पीठ ५–६ तासात छान आंबते. म्हणून सकाळी इडलीचा बेत असेल तर आदल्या रात्री उशिरा डाळ वाटून ठेवा. नाहीतर पीठ आंबट होईल.
Your comments / feedback will help improve the recipes