Basundi Puri (बासुंदी पुरी) – Traditional Maharashtrian Sweet

Basundi Puri (बासुंदी पुरी)

Basundi Puri (बासुंदी पुरी) – Traditional Maharashtrian Sweet

बासुंदी पुरी मराठी

Basundi is a traditional Maharashtrian sweet generally made during festive season. I don’t add condensed milk or Milk powder in Basundi. It’s plain milk reduced to half. Just add Sugar, saffron and cardamom powder. And Delicious Basundi is ready. Reduce Milk on Medium to high flame. This way the colour of Basundi will remain white else it will be brownish.

Basundi tastes awesome with Puri. To make nice fluffy Puris, I add little fine semolina and some sugar while binding the dough. That makes perfect fluffy Puris.

Ingredients (1 cup = 250 ml)

For Basundi (Serves 4)

Full fat Milk 2 litre

Sugar about ½ cup (adjust as per taste)

Saffron 5-6 strands soaked in warm milk

Cardamom Powder ¼ teaspoon

For Puri (Makes 45-50 Puri) (1 cup = 250 ml)

Wheat Flour 2 Cups

Fine Semolina 2 Tablespoon

Sugar 2 Teaspoon

Oil / Ghee 1 Tablespoon

Salt ¼ teaspoon

Oil / Ghee for Deep Frying

Instructions for Basundi

1. In a thick bottom pan, Take 2 litre full cream milk. Keep boiling milk on medium to high flame stirring all the time to avoid spilling over. If you boil on low flame, colour of milk changes to brownish. On medium / high flame, it remains white.

2. When milk reduces to about 1 lit, add sugar. Boil for 4-5 minutes.

3. Add saffron and Cardamom powder. Stir well and remove from gas.

4. Keep stirring till lukewarm to avoid formation of cream layer on top.

5. You can serve hot Basundi with Puri. Or when Basundi comes to room temperature, store in refrigerator. Serve cold Basundi with Hot Puri. This combination also tastes nice.

Instructions for Puri

1. Mix all ingredients except Oil / Ghee for frying. Keep adding small amount of water and knead a stiff consistency dough.

2. Let the dough rest for at least 30 minutes.

3. Knead the dough for 2-3 minutes. Makes small round balls and roll Puri little thick than Chapati.

4. Deep fry Puri in hot Oil / Ghee on medium flame. When you slide in Puri, gently press it with the help of Skimmer (Zara). This way Puri will puff. Once it puffs, flip it and fry the other side.

5. Take out Puris on a kitchen tissue.

6. Serve Hot Puris with Basundi.

Basundi Puri (बासुंदी पुरी)
Basundi Puri (बासुंदी पुरी)
Basundi Puri (बासुंदी पुरी)
        ===================================================================================

बासुंदी पुरी

हे पारंपारिक महाराष्ट्रीयन पक्वान्न सणासुदीला केलं जातं. करायला तसं सोपं आणि सगळ्यांच्या आवडीचं. हल्ली बासुंदी स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवतात. मी अगदी पारंपारिक पद्धतीने दूध आटवून बासुंदी करते. कंडेन्सड मिल्क किंवा दुधाची पावडर असं काही घालत नाही. फक्त दुधाच्या बासुंदीची चव खूप छान लागते. दूध आटवताना मध्यम किंवा मोठ्या आचेवर आटवलं की बासुंदी पांढरी होते. मंद आचेवर बासुंदी लालसर होते. दूध आटवताना मी एक मोठी पातेली घेते आणि एका मध्यम आकाराची पातेली घेते. मोठया पातेल्यात थोडं थोडं दूध घालत आटवते आणि त्यावेळी दुसऱ्या पातेल्यात बाकीचं दूध उकळत ठेवते. अशा प्रकारे दूध पटकन आटते. हवं तेवढं आटलं की सगळं दूध एका पातेल्यात घालून बाकीचे जिन्नस घालते

मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्यासाठी कणिक भिजवताना थोडा रवा आणि साखर घालते. माझी आई अशा पुऱ्या करायची. कणिक घट्ट भिजवावी म्हणजे पुरी लाटताना सुकं पीठ लावावं लागणार नाही आणि ते पीठ तळणीत पडून जळणार नाही.

साहित्य (१ कप = २५० मिली)

बासुंदीसाठी (४ जणांसाठी )

म्हशीचं दूध २ लिटर

साखर अर्धा कप (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

केशर ५६ काड्या कोमट दुधात भिजवून

वेलची पूड पाव चमचा

पुऱ्यांसाठी (४५ ५० पुऱ्यांसाठी)

कणिक २ कप

बारीक रवा २ टेबलस्पून

साखर २ चमचा 

तेल / साजूक तूप  १ टेबलस्पून

मीठ पाव चमचा

तेल / तूप तळण्यासाठी

बासुंदी ची कृती

. एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घेऊन मध्य्म / मोठ्या आचेवर उकळा. एकसारखं ढवळत रहा.

. दूध साधारण १ लिटर झाले की त्यात साखर घाला. ५ मिनिटं उकळा.

. केशर आणि वेलची पूड घालून एक उकळी काढागॅस बंद करा.

. बासुंदी कोमट होईपर्यंत ढवळत रहा म्हणजे वर साय येणार नाही.

. बासुंदी गरम खाऊ शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवून गार करून खाऊ शकता. दोन्ही छान लागतात.

पुऱ्यांची कृती

. तळणीचे तेल / तूप वगळून सर्व जिन्नस एका परातीत घ्या. थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवा.

. अर्धा तास झाकून ठेवा.

. कणिक मळून घ्या. छोटे छोटे गोळे करून जरा जाडसर पुऱ्या लाटून घ्या.

. गरम तेल / तुपात मध्यम आचेवर पुऱ्या तळून घ्या. पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने जराशी दाबा. म्हणजे पुरी फुगेल. मग पुरी पलटून दुसरी बाजू तळून घ्या.

. तळलेल्या पुऱ्या टिश्यू पेपर वर काढून घ्या.

. गरम पुऱ्या बासुंदी बरोबर सर्व्ह करा

Basundi Puri (बासुंदी पुरी)
Basundi Puri (बासुंदी पुरी)
Basundi Puri (बासुंदी पुरी)
 

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes