Raw Banana (Plantain) Curry (कच्च्या केळ्याची भाजी)– Tasty Raw Banana Curry without Onion and Tomato

Raw Banana (Plantain) Curry (कच्च्या केळ्याची भाजी)

Raw Banana (Plantain) Curry (कच्च्या केळ्याची भाजी)– Tasty Raw Banana Curry without Onion and Tomato

कच्च्या केळ्याची भाजी मराठी

Generally we make dry subji using Raw Banana (Plantain) or make Kofta. This is my own recipe of tasty curry using Raw Banana. This does not use Onions and Tomatoes. Still it has nice texture and color.

Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)

Raw Bananas 4 medium

Tamarind Pulp 3/4 – 1 Teaspoon

Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Fresh Scraped Coconut ½ cup

Red Chilies 3-4

Coriander Seeds 2 Teaspoon

Cumin Seeds 1 Teaspoon

Curry Leaves 4-5

Turmeric Powder ¼ Teaspoon

Garlic 4-5 cloves

Kasuri Methi (Dried Fenugreek Leaves)1 tablespoon

Fresh Cream 2 tablespoon

Sugar to Taste

Salt to Taste

For TemperingGhee (Clarified Butter) 1 Tablespoon

Mustard ¼ Teaspoon

Asafoetida a pinch

Curry leaves 4-5

Instructions

1. Wash raw Bananas, remove the skin and cut into medium size pieces and soak in water (to avoid them from turning black).

2. In a Pan, roast Coriander Seeds, Cumin Seeds, whole Red chilies and 4-5 curry leaves together till you get nice aroma of roasted spices. Take it out in a plate and leave it to cool.

3. In the same pan, roast fresh scraped coconut on low flame till it changes colour. Take it out in a plate and leave to cool.

4. Upon cooling, transfer spices roasted in step 2, roasted coconut and Garlic cloves to a Grinder and dry grind into fine powder.

5. In a pan, add 1 tablespoon of Ghee. Add Banana pieces (don’t add water), a pinch of salt and saute on low flame for 2-3 minutes.

6. Add Tamarind pulp and 2 cups of hot water. Cook covered on low flame till Banana pieces are tender. Don’t overcook.

7. Add ground spices, Turmeric Powder and mix. Adjust consistency of curry as desired by adding water. Cook on low flame for 2-3 minutes.

8. Add Salt, Sugar and mix. Cook for 2 minutes.

9. In a ladle, heat 1 tablespoon of Ghee for Tempering. Add mustard seeds, wait for splutter. Add Asafoetida and Curry leaves.

10. Pour this tempering in the pan. Mix Gently.

11. Crush 1 teaspoon of Kasuri Methi and add to the pan. Beat Fresh Cream, add to the pan and mix.

12. Delicious Raw Banana Curry is ready. Serve hot with Roti / Rice.

Raw Banana (Plantain) Curry (कच्च्या केळ्याची भाजी)
Raw Banana (Plantain) Curry (कच्च्या केळ्याची भाजी)
     ==================================================================================

कच्च्या केळ्याची भाजी कांदा, टोमॅटो न वापरता

बरेचदा आपण कच्च्या केळ्याची सुकी भाजी किंवा कोफ्ते करतो. ही  वेगळ्या प्रकारची केळ्याच्या  भाजीची रेसिपी मी स्वतः तयार केली आहे. यात मी कांदा आणि टोमॅटो घालत नाही. तरीही छान लाल रंगाची चविष्ट भाजी बनते. ह्यात मी थोडी कसुरी मेथी आणि साय घालते. त्यामुळे चव छान येते. नक्की करून बघा

साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

कच्ची केळी ४ मध्यम आकाराची

चिंचेचा कोळ पाऊण ते १ चमचा

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

धने  २ चमचे

जिरं १ चमचा

सुक्या लाल मिरच्या ३

कढीपत्ता ४५ पानं

साजूक तूप १ टेबलस्पून

लसूण ४५ पाकळ्या

हळद पाव चमचा

कसुरी मेथी १ टेबलस्पून

मलई / साय २ टेबलस्पून

साखर चवीनुसार

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

साजूक तूप १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

हिंग चिमूटभर

कढीपत्ता ४५ पानं

कृती

. केळी धुवून सालं काढून टाका. केळ्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा आणि पाण्यात बुडवून ठेवा म्हणजे काळे पडणार नाहीत.

. एका कढईत धने, जिरं, सुक्या लाल मिरच्या आणि ४५ कढीपत्त्याची पानं सुकीच भाजून घ्या. भाजलेल्या मसाल्याचा सुगंध आला की एका ताटलीत काढून गार करून घ्या.

. त्याच कढईत नारळ मंद आचेवर गुलाबी रंगावर  भाजून घ्याताटलीत काढून गार करून घ्या.

. भाजलेले मसाले, नारळ आणि लसूण मिक्सरमध्ये सुकेच बारीक वाटून घ्या.

. कढईत १ टेबलस्पून साजूक तूप घालून त्यात केळ्याचे तुकडे घाला. पाणी घालू नका. किंचित मीठ घाला. ३ मिनिटं परतून घ्या.

. २ कप गरम पाणी आणि चिंचेचा कोळ घाला. झाकण ठेवून मंद आचेवर केळी नरम होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.

. कढईत वाटलेला मसाला घाला. एकजीव करा. जरुरीप्रमाणे पाणी घालून रस्सा हवा तेवढा पातळ करून घ्या. ३ मिनिटं मिश्रण उकळा.

. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून ढवळून घ्या. २ मिनिटं मंद आचेवर शिजवा

. एका कढल्यात १ टेबलस्पून साजूक तूप घालून मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करा. आणि कढईत घाला. मिश्रण ढवळून घ्या.

१०. कसुरी मेथी हाताने चुरडून भाजीत घाला. मलई / साय फेटून भाजीत घाला. हलक्या हाताने भाजी ढवळून घ्या.

११. कच्च्या केळ्याची चविष्ट भाजी तयार आहे. गरम गरम भाजी पोळी / भाताबरोबर खायला द्या.

Raw Banana (Plantain) Curry (कच्च्या केळ्याची भाजी)
Raw Banana (Plantain) Curry (कच्च्या केळ्याची भाजी)

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes