Mangane (मणगणे) – Bengal Gram Pudding
मणगणे (गोवा / कारवार चा पारंपारिक गोड पदार्थ) मराठी
Mangane (मणगणे) is a Goan / Karwar Specialty. You can call it Chana Daal Kheer. Main ingredients in Mangane are Chana Dal (Bengal Gram), Jaggery, Coconut Milk and Sabudana (Tapioca Perls). Coconut Milk and Jaggery are used in most of the sweets in Goa. There is no milk product used in this recipe; it’s a Vegan recipe. Mangane is made for auspicious occasions as a part of Offering. I’d first tasted Mangane in Shrigeri Math. It was a part of the Prasad meal that is served to all visitors. It tasted awesome. It’s easy to make Mangane. The only time consuming part is to extract Coconut Milk. Try this mild sweet and delicious Goan delicacy.
No Milk Product is used in Mangane. It’s a Vegan Recipe.
Ingredients (serves 10) (1 cup = 250 ml)
Chana Daal (Bengal Gram) 1 cup
Sabudana (Sago / Tapioca Pearls) ¼ cup
Crushed Jaggery 1.5 cup (adjust as per taste)
Fresh scraped coconut 2 cups or Coconut Milk about 4 cups
Cashew Nuts chopped 2-3 tablespoons
Cardamom Powder ¼ teaspoon
Salt 2 pinch (to taste)
Instructions
1. Wash and Soak Chana Daal (Bengal Gram) in water for 3-4 hours. Wash and Soak Sabudana. Add water just enough to cover Sabudana. Do not add more water.
2. Cook Chana Daal on low flame till it’s soft. Don’t overcook. It should not be mushy. That is why it is recommended not to use Pressure cooker for cooking Chana Daal.
3. Grind Fresh scraped coconut along with little water and using a strainer separate coconut milk. This will be of thicker consistency. Keep it aside. This Thick coconut milk is call Aap Ros () in Konkani. Grind same coconut again by adding some more water and strain out coconut milk. This milk will be thin. This is called Dool Ros () in Konkani.
4. Transfer cooked Chana Daal to a deep pan along with the stock.
5. Add crushed Jaggery. Mix. Cook on medium flame stirring regularly.
6. When mixture starts boiling, Add soaked Sabudana and Cashew Nuts. Mix and keep cooking on medium flame stirring regularly.
7. After 10 minutes, add Thin coconut Milk. Bring the mixture to boil.
8. Keep cooking on medium flame till Sabudana is cooked. If the mixture is too thick, add some water. Mangane thickens as it cools. So don’t make it too thick when you cook it.
9. Add Thick coconut milk. Bring the mixture to boil. Switch off the gas.
10. Add cardamom powder and Salt. Mix.
11. Delicious Mangane is ready. Serve hot or cold. Both taste yummy. If you want to store Mangane for more than a day, store in refrigerator.
Note :
1. You can also add small pieces of fresh coconut to Mangane. Add it in step 6.
==================================================================================
मणगणे (गोवा / कारवार चा पारंपारिक गोड पदार्थ)
मणगणे हा गोवा / कारवार चा पारंपारिक गोड पदार्थ आहे. देवकार्याला प्रसाद म्हणून मणगणे केले जाते. मणगणे मी पहिल्यांदा शृंगेरीच्या मठात खाल्लं होतं. भाविकांसाठी प्रसादाचं जेवण असतं त्यात मणगणे होतं. अतिशय स्वादिष्ट झालं होतं. मणगणेत मुख्य जिन्नस म्हणजे चणा डाळ, गूळ, नारळाचं दूध आणि साबुदाणे. गोव्यात नारळ आणि गूळ बहुतेक पक्वान्नात घालतात. त्यामुळे पदार्थ फार गोड न होता स्वादिष्ट होतात. मणगणे करायला सोपं आहे. कृतीत फक्त एक वेळखाऊ पायरी म्हणजे नारळाचं दूध काढणं. तुम्ही तयार coconut milk वापरू शकता. पण नेहमी ताजा नारळ खाणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना तयार दूध आवडत नाही. एक प्रकारचा कृत्रिम वास येतो त्याला. मणगणेत चणा डाळ असल्यामुळे आळण लावावं लागत नाही.
ह्यात अजिबात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वापरले जात नाही. ही एक व्हेगन पाककृती आहे.
साहित्य (१० जणांसाठी ) (१ कप = २५० मिली)
चणा डाळ १ कप
साबुदाणा पाव कप
ताजा खवलेला नारळ २ कप
चिरलेला गूळ दीड कप (आवडीनुसार कमी /जास्त करा )
काजूचे तुकडे २–३ टेबलस्पून
वेलची पूड पाव चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. चणा डाळ धुवून पाण्यात ४–५ तास भिजवून ठेवा. साबुदाणा धुवून ४–५ तास भिजत ठेवा. साबुदाणे बुडतील एवढंच पाणी घाला.
२. चणा डाळ गॅसवर शिजवून घ्या. डाळ नरम होईपर्यंतच शिजवा. जास्त शिजवू नका. मणगण्यामध्ये शिजलेली डाळ अख्खीच दिसली पाहिजे. म्हणून डाळ शक्यतो प्रेशर कुकर मध्ये शिजवू नका.
३. नारळ मिक्सर मध्ये वाटून पहिलं दाट दूध वेगळं ठेवा. ह्याला कोंकणीत ‘आप रोस‘ म्हणतात. दुसऱ्यांदा पाणी घालून नारळ वाटून दूध काढाल ते वेगळं ठेवा. ह्याला कोंकणीत ‘दूळ रोस‘ म्हणतात. दोन्ही मिळून अंदाजे ४ कप दूध लागेल.
४. शिजलेली चणा डाळ पाण्यासकट मोठ्या पातेल्यात काढून घ्या. पातेलं गॅसवर ठेवून त्यात चिरलेला गूळ घालून ढवळून घ्या. मध्यम आचेवर मिश्रणाला उकळी येईपर्यंत शिजवा. मध्ये मध्ये ढवळत रहा.
५. आता त्यात भिजवलेले साबुदाणे आणि काजूचे तुकडे घाला. मध्यम आचेवर शिजवा.
६. १० मिनिटांनी नारळाचे पातळ दूध घाला. मध्यम आचेवर साबुदाणे शिजेपर्यंत शिजवा. मणगणे थंड झाल्यावर दाट होते म्हणून शिजवताना दाट करू नका. पाहिजे असल्यास थोडं पाणी घालून उकळा.
७. मिश्रणात नारळाचे दाट दूध घाला. परत एकदा उकळवा.
८. गॅस बंद करून मिश्रणात वेलची पूड आणि मीठ घालून ढवळून घ्या.
९. स्वादिष्ट मणगणे तयार आहे. गरम किंवा गार, कसेही छान लागते.
१०. १ दिवसापेक्षा जास्त ठेवायचं असेल तर फ्रिजमध्ये ठेवा.
टीप
१. ह्यात तुम्ही नारळाच्या कातलीचे तुकडे घालू शकता. ५ व्या पायरीमध्ये तुकडे मिश्रणात घाला.
Your comments / feedback will help improve the recipes