Bread Pakoda (ब्रेड पकोडा) – Fried Stuffed Bread
Mumbai’s Vada Pav is very Popular. It’s also called Indian Burger. Maharashtrian specialty Batata Vada (A kind of Potato Patty) served in a Bun with Sweet n sour Tamarind chutney and Hot Garlic Chutney. It tastes super yummy. This Bread Pakoda is a variation of Vada Pav where bread pieces are stuffed with Batata Vada filling and deep fried after dipping in Gram Flour batter. Dish with similar ingredients tastes different if you change the sequence of steps. Bread Pakoda is also a popular street food in Mumbai.
Ingredients (Makes about 30-32 Pakoda) (1 cup = 250 ml)
Potatoes 12-14 medium size
Ginger Garlic Paste 2 teaspoon
Green Chili Paste 1 teaspoon
Curry leaves 15-16
Turmeric Powder ¼ to ½ teaspoon
Mango Powder ¼ teaspoon / Lemon Juice ½ teaspoon
Oil 1 teaspoon
Chopped coriander 1 tablespoon
Salt to taste
Bread Slices 16-18 (Big size bread – 400 gm )
For the cover
Bengal Gram Flour (Besan) 1 to 1.5 cup
Rice Flour 3 -4 tablespoon
Hot Oil 2 tablespoon
Salt to taste
Oil for deep frying Pakoda
Instructions
To make Stuffing
1. Boil Potatoes.
2. Peel Potatoes and mash them (or cut into small pieces).
3. In a Pan, heat oil. Add Ginger,Garlic, Chilies Paste. Sauté for 3 minutes. Add curry leaves (cut them into small pieces before dding them; so that they can be eaten easily).
4. Add Turmeric powder, Mix.
5. Add Mashed / chopped potatoes, Salt and Mango Powder / Lemon Juice. Mix well.
6. Add Chopped coriander. Mix.
7. Stuffing is ready. Spread it in a plate and leave to cool.
To make Bread Pakoda
1. Mix Bengal Gram Flour, Rice Flour and Salt. Add water to make a thick consistency but flowing batter. You can also add a pinch of Turmeric Powder to this. But I don’t add.
2. Heat 2 tablespoon of Oil. Pour it in the batter and mix.
3. Spread the stuffing between 2 bread slices to make a sandwich. Cut each Sandwich into 4 pieces.
4. In a wok, heat oil for deep frying Pakoda.
5. Dip each piece of the sandwich in the batter and slowly drop it in hot oil.
6. Fry on medium flame till the colour changes to golden brown.
7. Delicious Bread Pakoda are ready.
8. Serve Hot Bread Pakoda with chutney / sauce.
==================================================================================
ब्रेड पकोडा – चविष्ट चमचमीत नाश्ता
मुंबईचा चविष्ट वडा पाव खूपच लोकप्रिय आहे. ह्यात महाराष्ट्रीयन बटाटे वडे आणि चटण्या पावात घालून दिल्या जातात. ब्रेड पकोडा हा ही एक लोकप्रिय प्रकार आहे. ह्यात बटाटा वड्याची भाजी ब्रेडच्या २ तुकड्यांमध्ये घालून तुकडे बेसनात घोळवून तेलात तळतात. साहित्य तेच पण वडे तळायच्या ऐवजी ब्रेड तळतात. त्यामुळे चव वेगळी येते. अगदी चविष्ट लागतो हा प्रकार सुद्धा.
साहित्य (अंदाजे ३०–३२ पकोड्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )
मध्यम आकाराचे बटाटे १२–१४
आलं लसूण पेस्ट २ टीस्पून
हिरव्या मिरचीची पेस्ट १ टीस्पून
लिंबाचा रस अर्धा टीस्पून किंवा आमचूर पाव टीस्पून
कढीपत्ता १५–१६
हळद पाव ते अर्धा टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
तेल १ टीस्पून
ब्रेड स्लाइस १६–१८ (मोठा ब्रेड ४०० ग्राम चा)
तळण्यासाठी तेल
आवरणासाठी
बेसन एक – दीड कप
तांदुळाचं पीठ ३ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
कडकडीत तेल २ टेबलस्पून
कृती
१. बटाटे उकडून, गार करून, सोलून घ्या. बटाट्याचे बारीक तुकडे करा / मॅश करा.
२. एका कढईत तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची टेस्ट घाला. २–३ मिनिटं परता. कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून घाला. हळद घाला.
३. बटाटे घाला. मिक्स करा.
४. लिंबाचा रस / आमचूर, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करा.
५. वड्याची भाजी तयार आहे. ताटलीत काढून गार करा.
६. आवरणासाठी बेसन, तांदुळाचं पीठ, मीठ घालून मिक्स करा. पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा दाट पीठ भिजवा.
७. पिठात २ टेबलस्पून कडकडीत तेल घालून मिक्स करा.
८. ब्रेडच्या २ तुकड्यांमध्ये भाजीचा थर देऊन सँडविच बनवा. प्रत्येक सँडविच चे ४ तुकडे करा.
९. पकोडा तळण्यासाठी कढईत तेल गरम करून घ्या.
१०. प्रत्येक तुकडा पिठात बुडवून हलकेच गरम तेलात सोडा. मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
११. गरमागरम चविष्ट ब्रेड पकोडे चटणी / सॉस सोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes