Patichya Kandyachi Puri ( पातीच्या कांद्याची पुरी) – Spring Onion Puri

Patichya Kandyachi Puri ( पातीच्या कांद्याची पुरी)

Patichya Kandyachi Puri ( पातीच्या कांद्याची पुरी) – Spring Onion Puri

पातीच्या कांद्याची पुरी मराठी

Paticha Kanda (Spring Onion) is very tasty vegetable. It can be used in different recipes and it takes the taste of the dish to a different level. I make Puri (Fried Indian Bread) with Spring Onions. These are savory Puris that can be a very good option for Breakfast or it can be a part of a meal instead of Indian Roti. It’s an easy recipe. These Puris don’t puff much like other Puris. But Puris are very crispy (खुसखुशीत).

One tip to make perfect Puri is that don’t rest the dough for more than 10 minutes. If you rest it longer, spring onions will release water making the dough very soft. You won’t be able to roll the Puris then.

Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 25-30 Puri)

Wheat Flour 1.5 Cups

Fine Semolina 1 Tablespoon

Finely Chopped Spring Onion Greens 1 cup (Do not add the bulbs)

Carom Seeds ½ teaspoon

Chili Powder ½ to ¾ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Oil 1 Teaspoon

Salt ¼ teaspoon

Oil for Deep Frying

Instructions

1. In a flat pan, add Wheat flour, Semolina, Salt, Chili Powder, Turmeric Powder, Carom Seeds and Mix well. Add finely chopped Spring Onions and 1 teaspoon Oil. Keep adding small amount of water and knead a stiff consistency dough.

2. Let the dough rest for 10 minutes.

3. Knead the dough for 2-3 minutes. Makes small round balls and roll little thick Puris.

4. Deep fry Puri in hot Oil / Ghee on medium flame. When you slide in Puri, gently press it with the help of Skimmer (Zara). These Puris don’t puff much. Once one side is light brown, flip it and fry the other side.

5. Take out Puris on a kitchen tissue.

6. Serve Hot Puris with Potato Subji or Chutney/ Sauce.

Patichya Kandyachi Puri ( पातीच्या कांद्याची पुरी)
Patichya Kandyachi Puri ( पातीच्या कांद्याची पुरी)
           ==================================================================================

पातीच्या कांद्याची पुरी खमंग खुसखुशीत पुरी

पातीचा कांदा ही अशी भाजी आहे जी कशातही वापरता येते. पदार्थाला छान चव येते त्याने. मी पातीचा कांदा घालून पुऱ्या करते. ह्या पुऱ्या फार फुलत नाहीत पण छान खुसखुशीत होतात. नाश्त्याला किंवा जेवणात पुरी / पोळीऐवजी हा एक छान चविष्ट पर्याय आहे. ह्यात साहित्य नेहमीचंच आहे आणि रेसिपी अगदी सोपी आहे.

नेहमीप्रमाणे माझी टीप हे पीठ खूप घट्ट भिजवा आणि पुऱ्या १० मिनिटांत  करायला घ्या. जास्त वेळ लावलात तर कांद्याला पाणी सुटतं आणि पीठ सैल होतं. सैल पिठाच्या पुऱ्या नीट लाटता येत नाहीत.

साहित्य (१ कप = २५० मिली) (२५३० पुऱ्यांसाठी)

कणिक दीड कप

बारीक रवा १ टेबलस्पून

बारीक चिरलेली कांद्याची पात १ कप (फक्त पात घ्या; कांदे घेऊ नका)

ओवा अर्धा टीस्पून

लाल तिखट अर्धा ते पाऊण टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

तेल १ टीस्पून

मीठ पाव टीस्पून

तेल पुऱ्या तळण्यासाठी

कृती

. एका परातीत कणिक, रवा, लाल तिखट, हळद, ओवा, मीठ घालून एकजीव करा.

. त्यात चिरलेली कांद्याची पात आणि तेल घालून एकजीव करा. थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ भिजवा.

. पीठ १० मिनिटं झाकून ठेवा.

. पीठ चांगलं मळून घ्या. छोटे छोटे गोळे करून जाडसर पुऱ्या लाटून गरम तेलात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्या. ह्या पुऱ्या जास्त फुलत नाहीत. पण छान खुसखुशीत होतात.

. गरम गरम पुऱ्या बटाटा भाजी किंवा चटणी / सॉस सोबत खायला द्या.   

Patichya Kandyachi Puri ( पातीच्या कांद्याची पुरी)
Patichya Kandyachi Puri ( पातीच्या कांद्याची पुरी)
 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes