Cheese Chili Toast (चीज चिली टोस्ट )

Cheese Chili Toast (चीज चिली टोस्ट )

Cheese Chili Toast (चीज चिली टोस्ट )

चीज चिली टोस्ट मराठी

Popular snack Cheese Chili Toast is a favorite snack for all age groups. This snack has become very popular in last 8-10 years. If you serve any soup with it, you can get a pleasure of a Cafe Style Dinner. I’ve used Home Made No-Knead bread for this. But you can use any bread. Mansi uses this recipe to make Cheese Chili Toast. It’s an easy and quick recipe. If you don’t have oven, you can make these toasts on a Griddle.

In the photo, Cheese Chili Toast is served with Roasted Tomato Soup.

Ingredients (Serves 4-5) (1 cup = 250 ml)

Bread Loaf 400 grams

Capsicum 1 medium

Onions 2 medium

Green Chili 1

Sweet corn ½ cup (optional)

Black Pepper Powder to taste

Oregano to taste

Cheese about 200-250 grams

Salt to taste

Butter as required

Instructions

1. Finely chop Capsicum, Onions, Green Chili.

2. Grate Cheese.

3. Boil Sweet Corn. Discard excess water.

4. In a bowl, mix Capsicum, Onions, Green Chili, Cheese, Salt, Black Pepper.

5. Apply butter to bread slices.

6. Place cheese mixture on each bread slice, add some sweet corn. Sprinkle Oregano.

7. Roast bread slices in a pre-heated oven on 190 degrees for 10-12 minutes. Alternatively, roast bread slices on a heated Griddle on low flame till cheese melts. Cover the Griddle while roasting.

8. Enjoy yummy Cheese Chili Toast with Sauce.

Cheese Chili Toast served with Roasted Tomato Soup (चीज चिली टोस्ट सोबत भाजलेल्या टोमॅटोचं सूप )
Cheese Chili Toast (चीज चिली टोस्ट )
        ==================================================================================

चीज चिली टोस्ट

सर्वांचा आवडता चविष्ट नाश्ता गेल्या ८१० वर्षात फारच लोकप्रिय झाला आहे. करायला अगदी सोपा आणि पटकन होणारा प्रकार आहे. ह्या टोस्टसोबत सूप केलं तर कॅफे स्टाईल डिनर केल्याचा आनंद मिळतो. मी ह्यात घरी केलेला No-Knead पाव वापरला आहे. पण तुम्ही कोणताही पाव वापरू शकता. हा प्रकार ओव्हन मध्ये किंवा तव्यावर करू शकता. माझी सून मानसी ही रेसिपी वापरून हे टोस्ट करते. रेसिपी अगदी सोपी आहे. अतिशय यम्मी होतात हे टोस्ट.

फोटोत टोस्टसोबत भाजलेल्या टोमॅटोचं सूप (roasted टोमॅटो सूप) आहे

साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

पाव ४०० ग्राम

चीज अंदाजे २०० २५० ग्राम

ढोबळी मिरची १

कांदा २ मध्यम

हिरवी मिरची १

मक्याचे दाणे अर्धा कप (ऐच्छिक)

मिरपूड चवीनुसार

ओरिगानो चवीनुसार

बटर पावाला लावायला

मीठ चवीनुसार

कृती

. ढोबळी मिरची, कांदे, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

. चीज किसून घ्या.

. मक्याचे दाणे शिजवून घ्या. जास्तीचं पाणी काढून टाका.

. एका वाडग्यामध्ये ढोबळी मिरची, कांदे, हिरवी मिरची, चीज, मीठ, मिरपूड घालून एकजीव करून घ्या.

. पावाच्या स्लाइसना बटर लावून घ्या.

. पावाच्या स्लाइसवर वर केलेलं मिश्रण पसरा. त्यावर मक्याचे दाणे घाला आणि ओरिगानो भुरभुरवा

. प्रीहीटेड ओव्हन मध्ये १९० डिग्री वर १०१२ मिनिटं बेक करून घ्या. ओव्हन नसेल तर गरम तव्यावर पावाचे स्लाइस ठेवून झाकण ठेवून मंद आचेवर चीज वितळेपर्यंत भाजून घ्या.

. गरम गरम चीज चिली टोस्ट सॉस सोबत खायला द्या

Cheese Chili Toast served with Roasted Tomato Soup (चीज चिली टोस्ट सोबत भाजलेल्या टोमॅटोचं सूप )
Cheese Chili Toast (चीज चिली टोस्ट )