Muskmelon Halwa (खरबूज / चिबूडाचा हलवा)
Till about a year back, I used to use both names Kharbuj and Tarbuj for Muskmelon. But my Fruitwala told me Tarbuj is Watermelon!! Later I read somewhere that even in some parts of Maharashtra Watermelon is called Tarbuj!! Anyway, this is Muskmelon Halwa – Kharbuj. You can also make it using Chibud (a variant of Muskmelon that is available in Coastal Maharashtra).
I created my own recipe for making Halwa. Muskmelon and Jaggery is a good combination. So I add Jaggery instead of Sugar; so a healthier recipe. I add little Semolina for texture and some Milk powder for richness (You can add fresh cream instead). I also add some Dry Ginger powder to it that gives a different flavour to the sweet Halwa. Alternatively you can add Cinnamon powder and / or Cardamom Powder. It’s an easy recipe.
You can also add 2-3 tablespoon Honey to this Halwa. Reduce the quantity of Jaggery accordingly.
Ingredients (Serves 4-5) (1 cup = 250 ml)
Musk melon / Kharbuj Pulp 2 cups (Use a blender to make a smooth Pulp)
Coarse Semolina 2 tablespoon
Jaggery ¾ to 1 cup (adjust as per taste; quantity also depends on sweetness of Muskmelon)
Milk Powder 2 tablespoon
Ghee 3 Tablespoon
Salt ¼ teaspoon (optional)
Dry Ginger Powder 2 Tablespoon Or
Cardamom Powder and Cinnamon Powder ¼ teaspoon each
Dry fruits as required
Instructions
1. In a Pan, heat 1 teaspoon of Ghee. Add Dry Ginger powder and roast on low flame for 2 minutes. Take it out in a plate.
2. In the same pan, dry roast semolina till it changes colour to pink.
3. Add ¾ cup of boiling water to semolina, cover the pan and cook for 2 minutes.
4. Add muskmelon pulp and mix well. Cover the pan. Cook on low flame till mixture starts thickening.
5. Add Jaggery and salt. Keep cooking on medium flame stirring in between.
6. When mixture starts thickening, add milk powder and one teaspoon of ghee.
7. Keep cooking till mixture starts coming together.
8. Add Roasted Dry Ginger Powder (Or Cinnamon and Cardamom Powder) and remaining Ghee. Mix Well.
9. Add dry fruits, mix.
10. Rich and Delicious Muskmelon Halwa is ready. You can serve this hot or cold. This Halwa needs to be stored in refrigerator.
Note
1. Colour of Halwa will depend on the colour of Muskmelon.
==================================================================================
खरबूज / चिबूडाचा हलवा
मी हल्ली हल्ली पर्यंत खरबूज, टरबूज एकच फळ आहे असं समजत होते. एकदा माझ्या फळवाल्यानं मला सांगितलं की कलिंगडाला टरबूज (त्याच्या भाषेत ‘तरबुजा’) म्हणतात. मग नंतर थोडी माहिती वाचली तेव्हा कळलं की महाराष्ट्राच्या काही भागातही कलिंगडाला टरबूज म्हणतात. असो.
तर हा हलवा खरबूजाचा आहे. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. कोकणात चिबूड मिळतं ते घालून सुद्धा हा हलवा करू शकता. खरबूज / चिबूड आणि गूळ हे एकत्र छान लागतं. त्यामुळे ह्या हलव्यात मी साखर न घालता गूळ घालते. रवाळ टेक्सचर साठी थोडा रवा घालते. हलवा क्रिमी होण्यासाठी थोडी दुधाची पावडर घालते. त्याऐवजी तुम्ही दुधाची साय सुद्धा घालू शकता. स्वादासाठी यात मी एक वेगळाच जिन्नस घालते – सुंठीची पावडर. त्याने हलव्याला छान चव येते. तुम्ही सुंठीऐवजी दालचिनी आणि वेलची पूड घालू शकता. खूप स्वादिष्ट होतो हा हलवा. आणि रेसिपी अगदी सोपी आहे.
ह्यात तुम्ही मध घालू शकता. २–३ टेबलस्पून मध घाला आणि गुळाचं प्रमाण थोडं कमी करा.
साहित्य (४–५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
खरबूजाचा रस २ कप (गर मिक्सर मध्ये फिरवून रस काढा)
जाडा रवा २ टेबलस्पून
चिरलेला गूळ पाऊण ते १ कप (चवीनुसार कमी / जास्त करा; खरबूज गोड असेल तर गूळ कमी लागेल)
दुधाची पावडर २ टेबलस्पून
साजूक तूप ३ टेबलस्पून
मीठ पाव चमचा (ऐच्छिक )
सुंठ पावडर २ टेबलस्पून (किंवा दालचिनी आणि वेलची पूड प्रत्येकी पाव चमचा)
सुका मेवा आवडीनुसार
कृती
१. एका कढईत १ टीस्पून तूप घालून सुंठीची पावडर घाला. मंद आचेवर २ मिनिटं परतून घ्या आणि एका ताटलीत काढून ठेवा.
२. त्याच कढईत जाडा रवा घालून मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या.
३. पाऊण कप पाणी उकळून घ्या आणि रव्यात घालून झाकण ठेवून रवा शिजवून घ्या.
४. कढईत खरबुजाचा रस घालून मिश्रण एकजीव करा. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
५. मिश्रण दाट होत आलं की त्यात गूळ आणि मीठ घाला. मिश्रण ढवळून झाकण ठेवून शिजवा. मध्ये मध्ये ढवळून घ्या.
६. मिश्रण घट्ट होत आलं की दुधाची पावडर घाला. १ टीस्पून तूप घाला.
७. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
८. सुंठीची पावडर (किंवा दालचिनी, वेलची पावडर) घाला आणि उरलेलं तूप घालून ढवळून घ्या.
९. सुका मेवा घालून ढवळा.
१०. खरबूजाचा स्वादिष्ट हलवा तयार आहे. गरम किंवा गार कसाही छान लागतो. हा हलवा फ्रिजमध्ये ठेवावा लागतो.
टीप
१. हलव्याचा रंग खरबूज / चिबूडाच्या रंगानुसार बदलेल.
Your comments / feedback will help improve the recipes