Masala Paratha / Missi Paratha / Besan Paratha ( मसाला पराठा / मिस्सी पराठा / बेसन पराठा) – Gram Flour Paratha
मसाला पराठा / मिस्सी पराठा / बेसन पराठा मराठी
Masala Paratha is made with a filling of Gram Flour. Hence can be called Missi Paratha or Besan Paratha. It’s not a stuffed Paratha. It is layered and Crispy. It’s very tasty and can be a good option for Breakfast / Snack. In a meal this can substitute Roti and Subji. This recipe uses all common ingredients available in Indian kitchen.
Ingredients (for 8-9 Parathas) (1 cup = 250 ml)
Gram Flour (Besan) 4 tablespoon
Chili powder ½ teaspoon
Powdered Sugar 1 teaspoon (optional)
Mango Powder(Amchoor) ½ teaspoon
Cumin Powder ½ teaspoon
Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon
Garam Masala ½ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Oil 5-6 teaspoon for filling + 1 teaspoon for dough
Salt to taste
Wheat Flour 1.5 cups + for dusting
Ghee (Clarified Butter) / Oil for roasting Parathas
Instructions
1. Add salt and 1 teaspoon of oil to wheat flour. Gradually add water and bind a medium consistency dough. Allow it to rest for 30 minutes.
2. In a bowl, mix Gram Flour, Chili Powder, Powered Sugar, Mango Powder, Cumin Powder, Garam Masala, Carom Seeds, Turmeric Powder and Salt.
3. Add a teaspoon oil at a time and mix. Keep adding oil and mixing till the mixture is moist and of a spreadable consistency. Don’t make it too moist. This is the filling of Paratha.
4. Take a dough ball – little bigger than a big lemon. Roll it into a big round Puri – about 4-5 inch in diameter.
5. Apply a few drops of oil on Puri.
6. Spread about 1.5 teaspoon of Filling on the Puri evenly and gently press it with your fingers. Sprinkle some wheat flour over it.
7. Make a tight roll of this Puri and then make a spiral. Seal the side of the spiral.
8. Roll the spiral into a Paratha – thicker than Chapati.
9. Roast both sides on a non stick griddle using a few drops of oil / ghee.
10. Serve hot Masala Paratha with home made butter or curd.
==================================================================================
मसाला पराठा / मिस्सी पराठा / बेसन पराठा – खमंग, खुसखुशीत पराठा
मसाला पराठा बेसनाचं सारण घालून केला जातो. त्यामुळे त्याला मिस्सी पराठा / बेसन पराठा असंही नाव आहे. हा स्टफ्ड पराठा नाही. पराठा करण्याची कृती माझ्या बाकर पराठ्यासारखी आहे. कणकेच्या पुरीवर सारण पसरून, त्याची गुंडाळी, चक्र करून हा पराठा लाटतात. त्यामुळे पराठा छान खुसखुशीत होतो. हा पराठा एवढा चविष्ट असतो की त्यासोबत लोणी किंवा दही चालतं किंवा असाच खायला ही छान लागतो. नाश्त्यासाठी किंवा जेवणात पोळी, भाजी ऐवजी हा पराठा करू शकता.
साहित्य (८–९ पराठ्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )
बेसन ४ टेबलस्पून
लाल तिखट अर्धा टीस्पून
पिठी साखर १ टीस्पून (ऐच्छिक)
आमचूर अर्धा टीस्पून
जिरं पावडर अर्धा टीस्पून
गरम मसाला अर्धा टीस्पून
ओवा अर्धा टीस्पून
हळद अर्धा टीस्पूनतेल ५–६ टीस्पून सारणासाठी + १ टीस्पून कणिक भिजवण्यासाठी मीठ चवीनुसार कणिक दीड कप + सुकी कणिक पराठे बनवताना लावण्यासाठी तेल/ तूप पराठे भाजण्यासाठी
कृती
१. कणकेत मीठ आणि १ टीस्पून तेल घालून थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैल कणिक भिजवून घ्या. अर्धा तास झाकून ठेवा.
२. एका वाडग्यात बेसन, लाल तिखट, आमचूर, जिरेपूड, गरम मसाला, ओवा, हळद, पिठीसाखर आणि मीठ एकजीव करून घ्या.
३. मिश्रणात १–१ चमचा तेल घालून एकजीव करा. ओलसर, पसरता येईल असं सारण बनवा. जास्त तेल घालून सारण सैल करू नका.
४. कणकेचा लिंबाएवढा गोळा घ्या. त्याची जरा मोठी पुरी लाटा.
५. पुरीवर २–३ थेंब तेल पसरा. त्यावर दीड टीस्पून सारण पसरा. थोडी कणिक भुरभुरवा . सारण हलक्या हाताने पुरीवर दाबून घ्या.
६. ह्या पुरीची एक गुंडाळी (roll) बनवा. गुंडाळी परत गोलाकार फिरवून गोल चक्र (spiral) बनवा. कडा नीट बंद करा.
७. आता हे गोल चक्र जाडसर लाटून पराठा बनवा.
८. गरम तव्यावर तेल घालून पराठा दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या.
९. चविष्ट मसाला पराठा लोणी किंवा दह्यासोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes