Amyacho Halwo (आम्याचो हलवो – आंब्याचा आटवलेला रस  ) – Ripe Mango Jam

Amyacho Halwo (आम्याचो हलवो - आंब्याचा आटवलेला रस  )

Amyacho Halwo (आम्याचो हलवो आंब्याचा आटवलेला रस  ) – Ripe Mango Jam

आम्याचो हलवो – आंब्याचा आटवलेला रस  मराठी

Amyacho Halwo (आम्याचो हलवो) – Mango Halwa – When I first heard about it, I thought it is some special recipe from Goa. Later when I saw my Mother-in-law making it, I realised it is just a different name of a specialty from Konkan – Reduced Pulp of Ripe Mangoes (आब्याचा आटवलेला रस)!! The only difference is, in Konkan we used to make it very thick whereas in Goa, it is of Muramba consistency. We used to use any type of available Mangoes for it; but it takes awesome when you make it using Alphonso mangoes. In Goa, generally Musarad (मुसराद) type of Mangoes. Since it’s not available in Mumbai, I used Kesar Mangoes. This Halwa needs only two ingredients – Mangoes and Sugar. Recipe is easy but quite lengthy. One can have this Halwa with anything – Roti, Puri, Chilla, Bread Toast etc. Or mix it with Milk to make delicious Milk Shake.

Ingredients (1 cup = 250ml)

Ripe Mangoes 6 (I used Kesar; You can use any of your choice)

Sugar 1 cup (adjust as per taste)

Instructions

1. Wash Mangoes and squeeze Pulp by hand. Break lumps, if any, by hand. Do not use blender. It changes the texture of Mango Pulp.

2. In a big Pan / Wok, add Mango Pulp. Keep reducing it on medium flame stirring regularly.

3. When the Pulp reduces to ¼ th, add Sugar and keep cooking. Now you need to stir it continuously.

4. When the Halwa is of required consistency, switch off the flame. Leave it to cool completely and then transfer it to a container.

5. If you want to store the Halwa more than 2 weeks, store it in refrigerator.

6. You can have this Delicious Halwa with anything – Roti, Puri, Chilla, Bread Toast etc. Or mix it with Mix to make delicious Milk Shake.

Amyacho Halwo (आम्याचो हलवो – आंब्याचा आटवलेला रस  )
Amyacho Halwo (आम्याचो हलवो – आंब्याचा आटवलेला रस  )

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

आम्याचो हलवो आंब्याचा आटवलेला रस 

लग्न झाल्यावर सुरुवातीच्या दिवसात सासूबाई सांगायच्या की घरी सगळ्यांना आम्याचो हलवोआवडतो. घरी कोकणी बोलायचे आणि मला कोकणी येत नव्हतं. मला वाटायचं हा आम्याचो हलवोम्हणजे गोव्याचा काहीतरी स्पेशल पदार्थ आहे. मग एकदा सासूबाईंना हा प्रकार करताना पाहिलं. तेव्हा गंमत वाटली. हा तर कोकणातला आंब्याचा आटवलेला रस‘!!. फक्त कोकणात तो घट्ट गोळा करतात; गोव्यात जरा पातळ ठेवतात मुरंब्यासारखा. कोकणात जे आंबे जास्त असायचे त्याचा रस आटवला जायचा हापूस, गोड्या आंबा, मिक्स रायवळ आंबे वगैरे. गोव्यात शक्यतो मुसरादप्रकारच्या आंब्याचा हा हलवा करतात. हा आंबा आंबट गोड असतो त्यामुळे हलवा छान स्वादिष्ट होतो. इथे मुंबईत जे आंबे मिळतात त्याचा मी हलवा करते. ह्यावेळी केसर आंब्याचा केला. साहित्य म्हणजे फक्त आंबे आणि साखरबाकी काही घालायची गरजच नाही. आणि ज्यात त्यात ड्राय फ्रुटस घालायला मला आवडत नाही. रेसिपी सोपी आहे पण वेळकाढू प्रकरण आहे.

साहित्य (१ कप = २५० मिली)

पिकलेले आंबे ६ (मी केसर घेतले; तुम्ही कोणतेही घेऊ शकता)

साखर १ कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

कृती

. आंब्याचा पारंपारिक पद्धतीनं रस काढा. गुठळ्या हाताने मोडा. मिक्सर अजिबात वापरायचा नाही.

. मोठ्या पातेल्यात / कढईत रस आटवायला ठेवा. रस पातळ असतो तेव्हा मध्ये मध्ये ढवळून चालतं. पण हा रस उकळताना थेम्ब सगळीकडे उडतात. त्यामुळे ढवळायला लांब दांड्याचा कायलाथा घ्या.

. रस घट्ट होत आला की त्यात चवीनुसार साखर घाला. परत शिजवत राहा. आता मात्र एकसारखं ढवळा.

. हलवा हवा तेवढा घट्ट झाला की गॅस बंद करून हलवा थंड करा.

. हलवा डब्यात भरून ठेवा. २ आठवड्यात संपणार नसेल तर फ्रिजमध्ये ठेवा. हा स्वादिष्ट हलवा कशाही सोबत छान लागतो पोळी, पुरी, धिरडं, घावन, पाव, किंवा असाच खाऊ शकता. दुधात घालून मिल्क शेक करू शकता.

Amyacho Halwo (आम्याचो हलवो – आंब्याचा आटवलेला रस  )
Amyacho Halwo (आम्याचो हलवो – आंब्याचा आटवलेला रस  )

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes