Nivagarya (निवगऱ्या) – Savory Rice Snack Steamed

Nivagarya (निवगऱ्या)

Nivagarya (निवगऱ्या) –  Savory Rice Snack Steamed

निवगऱ्या मराठी

Ukadiche Modak is a Maharashtrian specialty – sweet streamed rice dumplings. When we make Ukadiche Modak, we also make this savory snack using the dough of Ukadiche Modak. Fresh spices are mixed with steamed dough. We make different shapes of this dough and steam them. It takes super yummy with raw groundnut oil.

Yellow coloured Nivagarya in attached photos are make from steamed Cornmeal (Maize). Refer to my recipe ‘Makyache Modak’ for details of how to steam Cornmeal.

Ingredients (for 10-12 Nivagarya) (1 Cup = 250ml)

Rice flour 1 cup (use modak flour that is made using aromatic rice)

Home made butter / ghee ½ teaspoon

Fresh chopped coriander 2 tablespoon

Crushed Roasted Cumin ½ teaspoon

Crushed Green Chilies ½ teaspoon

Salt to taste

Oil for kneading the dough

Instructions

1. Heat 3/4 cup water in a pan. Add pinch of salt and butter/ghee.

2. Let water boil.

3. Pour in rice flour and mix.

4. Cook covered for 2 minutes and switch off the gas. Keep the pan covered.

5. After 10 minutes, take out the dough in a plate and knead well to get soft dough. Use water if required. Use little oil if the dough is sticky.

6. Add Crushed Roasted Cumin, Crushed Green Chilies, Crushed coriander and salt to the Dough. Mix well.

7. Make small balls of the dough and give them any shape you like. Simplest is to flatten the dough ball in a round shape.

Nivagarya ready to be steamed (कच्च्या निवगऱ्या वाफवण्यासाठी तयार)

8.Fill water in the steamer. Spread a wet cloth on the perforated plate. Dip each Nivagari in cold water and place it on the perforated plate. Steam them for 20-25 minutes.

Nivagarya ready to be steamed (कच्च्या निवगऱ्या वाफवण्यासाठी तयार)

9. Serve hot with Groundnut oil. It tastes super yummy when you have it dipped in oil.

Nivagarya (निवगऱ्या)
Nivagarya (निवगऱ्या)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

निवगऱ्या

उकडीचे मोदक करताना निवगऱ्या कराव्याच लागतात. शास्त्रच असतं ते!!!! लहानपणी घरी  गणपती असायचा. तेव्हा मोदकांची उकड काढताना आई निवगऱ्यांसाठी सुद्धा उकड काढायची. मोदकांच्या उकडीमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरंपूड, मीठ घालून हवा तो आकार देऊन निवगऱ्या करतात आणि उकडून घेतात. गरमगरम निवगऱ्या कच्च्या तेलात बुडवून मस्त लागतातच पण ते मसाले घातलेलं कच्चे पीठ सुद्धा छान लागतंआम्ही कच्चे पीठच जास्त खायचो आणि सोबत आईचा ओरडा ही खायचो (अगं, शिजवून खा नाहीतर बाधतील, कच्चे पीठ जास्त खाणं पोटाला बरं नाही, वगैरे वगैरे … ).

गेल्या आठवड्यात मोदकांसोबत निवगऱ्या केल्या. माझी सून मानसी गुजराती आहे. तिच्यासाठी हा प्रकार नवीन होता. मी तिला म्हटलं – ‘तुमच्या खीचू सारखं लागतं (खीचू म्हणजे आपली तांदळाची उकड), खाऊन बघ‘. तिला फार आवडल्या निवगऱ्या. भारतीय खाद्यसंस्कृतीत वेगवेगळ्या प्रांतात बनणारे बरेचसे पदार्थ थोडेफार सारखेच असतात.

फोटोत दिसणाऱ्या पिवळ्या निवगऱ्या मक्याच्या पिठाच्या आहेत. मी मक्याचे मोदक ही रेसिपी पोस्ट केली होती त्या उकडीच्या केल्या आहेत

साहित्य (१०१२ निवगऱ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

मोदकाचं पीठ १ कप (नसेल तर तांदुळाचं पीठ  वापरा )

लोणी / साजूक तूप अर्धा  टीस्पून

मीठ चवीनुसार

बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

भाजलेल्या जिऱ्याची जाडसर पूड अर्धा टीस्पून

तेल उकड मळायला

कृती

. उकडीसाठी एका पातेल्यात पाऊण  कप पाणी घ्या.

. पाण्यात चिमूटभर मीठ आणि लोणी / साजूक तूप घालून पाणी उकळा.

. पाणी उकळलं की त्यात मोदकाचं पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं वाफवा. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवा.

. १० मिनिटांनी उकड गरम असतानाच छान मळून घ्या.

. उकडीत वाटलेली कोथिंबीर, मिरची, जिरेपूड आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा.   

. उकडीचे लहान गोळे करून घ्या आणि त्यांना तुमच्या आवडीप्रमाणे आकार द्या. मी गोळ्याची पारी करून दिव्याचा आकार दिलाय. सगळ्यात सोपा आकार म्हणजे गोळा थापून पुरी करू शकता

Nivagarya ready to be steamed (कच्च्या निवगऱ्या वाफवण्यासाठी तयार)

. मोदक पात्रात / पातेल्यात पाणी उकळा. वाफवायच्या ताटलीत पातळ कपडा ओला करून पसरवा.

. प्रत्येक निवगरी पाण्यात बुडवून ताटलीत ठेवा.

. पाणी उकळलं की ताटली मोदक पात्रात / पातेल्यात ठेवून वाफवून घ्या. मध्यम आचेवर २०२५ मिनिटं लागतात.

Nivagarya ready to be steamed (कच्च्या निवगऱ्या वाफवण्यासाठी तयार)

१०. गरमगरम निवगऱ्या कच्च्या तेलासोबत खायला द्या.

Nivagarya (निवगऱ्या)
Nivagarya (निवगऱ्या)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes