Moogdal Halwa (मूगडाळ हलवा) – Popular Indian Sweet

Moogdal Halwa (मूगडाळ हलवा)

Moogdal Halwa (मूगडाळ हलवा) – Popular Indian Sweet

मूगडाळ हलवा मराठी

This is a popular sweet dish originally from North India. But for last 15-18 years this is always a part of wedding / party menu. Earlier it was never made in Maharashtrian kitchens. But now it’s very common. It takes lot of time to prepare this – mainly for roasting the dal. But the result is awesome. Initially when the ground Dal is moist, it is difficult to saute the mixture. I did initial roasting in Microwave and then transferred it to a pan. The texture of the mixture was like semolina and it was very easy to roast it. You can add as much Ghee (clarified butter) to this Halwa. But the measure given in this recipe is the minimum amount required to make yummy Halwa.

Ingredients (1 cup = 250 ml) (serves 8)

Moog Dal (Split Petite Yellow lentil without husk) 1 cup

Ghee (Clarified Butter) 1 cup

Sugar ¾ cup

Warm Milk 1 cup + 1 teaspoon

Saffron 2 pinches

Cardamom Powder ¼ teaspoon

Salt a pinch

Almonds 15-20

Instructions

1. Wash and Soak Moogdal in water for 4-5 hours.

2. Drain water and grind into coarse paste.

3. Soak saffron in 1 teaspoon of warm milk. Soak almonds in hot water for about 30 min; peel and chop into thin slices.

4. In a Microwave safe Glass bowl, add ½ cup Ghee. Melt it on High power for 30 seconds. Add Moogdal paste and cook on High power for 4 minutes without a lid stirring after every minute.

5. If the mixture has lumps, break them with a spatula or an electric blender. The texture of the mixture will be like Semolina.

6. Transfer the mixture to a heavy bottom pan. Keep roasting on low flame. If you don’t want to use Microwave, roast ground Moogdal in the pan after adding Ghee.

7. After 10 minutes, add ¼ cup ghee and keep roasting till the mixture is light brown in colour and you get nice aroma; It will take 25 to 30 minutes to roast the mixture.

Roast the mixture till light brown (मिश्रण गुलाबी रंगावर भाजून घ्या )

8. This roasting is extremely important for making delicious Halwa. Initially, it will be difficult to roast as the mixture is moist; as you keep roasting it will become light and easy.

9. Now add 1 cup of warm milk and 1 cup warm water to the mixture, cover the pan and cook for 5 minutes.

10. Remove the lid and saute for another 5 minutes.

11. Add sugar and pinch of salt and mix well; saute for 10 minutes.

12. Add Saffron and cardamom powder and mix well.

13. Add remaining ¼ cup of ghee and mix well.

14. Add almond slices and mix.

Moogdal Halwa (मूगडाळ हलवा)

15. Serve this delicious Moogdal Halwa hot or warm. Or Store it in Refrigerator and heat it in Microwave before serving.

Moogdal Halwa (मूगडाळ हलवा)
Moogdal Halwa (मूगडाळ हलवा)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मूगडाळ हलवा

मूगडाळ हलवा हा एक उत्तर भारतीय लोकप्रिय पदार्थ आहे. गेली १५१८ वर्षे कुठलाही लग्नाचा / स्वागतसमारंभाचा मेन्यू ह्या हलव्याशिवाय पूर्ण होत नाही. पूर्वी मराठी कुटुंबात हा हलवा सहसा केला जात नसे. पण हल्ली बऱ्याच घरी हा हलवा केला जातो. मूगडाळ, तूप, साखर आणि दूध घातलेला हा हलवा करायला जरा वेळ लागतो. मुख्य वेळकाढू आणि कठीण कृती म्हणजे भिजवून वाटलेली मूगडाळ भाजणं. सुरुवातीला मिश्रण ओलसर असताना ते भाजायला खूप कठीण पडतं आणि न थांबता ढवळत राहावं लागतं नाहीतर कढईच्या तळाला चिकटते. मी ह्यावर एक सोपा पर्याय शोधलाय. मी सुरुवातीला मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये भाजून घेते. आणि नंतर कढईत भाजते. त्यामुळे रव्यासारखं सुकं मिश्रण कढईत भाजायला अगदी सोपं जातं. आणि एकसारखं ढवळायला ही लागत नाही. तुम्हाला मायक्रोवेव्ह वापरायचा नसेल तर पारंपरिक पद्धतीने मिश्रण कढईत भाजा.

मूगडाळ हलव्याच्या तुम्ही हवं तेवढं साजूक तूप घालू शकता. बाहेर मिळतो तो हलवा अगदी तुपात भिजलेला असतो. एवढं तूप घालायचं माझ्या जीवावर येतं. त्यामुळे मी डाळीएवढं तूप घालते (आपण गोड शिऱ्यात घालतो तसं). पण ह्यापेक्षा कमी तूप घालून चालणार नाही. मग हलवा सुका सुका लागेल.

हा हलवा जरा फिका (कमी गोड) असतो. त्यामुळे साखर जरा कमीच घाला. रेसिपीत दिलेल्या प्रमाणानुसार केलेला हलवा हवा तेवढाच गोड होतो.

साहित्य (८ जणांसाठी) (१ कप = २५०मिली)

मूगडाळ १ कप

साजूक तूप १ कप

साखर पाऊण कप

गरम दूध १ कप + १ टीस्पून

केशर २ चिमूट

वेलची पावडर पाव टीस्पून

मीठ चिमूटभर

बदाम १५२०

कृती

. मूगडाळ धुवून ४५ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. पाणी निथळून घ्या आणि डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

. केशर १ टीस्पून गरम दुधात भिजवून ठेवा. बदाम अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. नंतर बदाम सोलून पातळ चकत्या कापून घ्या

. मायक्रोवेव्ह च्या काचेच्या भांड्यात अर्धा कप साजूक तूप घ्या. हाय पॉवर वर ३० सेकंद मायक्रोवेव्ह चालू करून तूप वितळवून घ्या. वाटलेली डाळ काचेच्या भांड्यात घालून हाय पॉवर वर ४ मिनिटं झाकण न ठेवता भाजून घ्या. दर १ मिनिटाने मिश्रण ढवळून घ्या

. मिश्रणात गुठळ्या झाल्या असतील तर चमच्याने किंवा ब्लेंडर ने मोडून घ्या. मिश्रण रव्यासारखं दिसेल.

. मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घाला. मंद आचेवर भाजत राहा. मधे मधे ढवळा म्हणजे कढईच्या तळाला चिकटणार नाहीतुम्हाला जर मायक्रोवेव्ह वापरायचा नसेल तर सुरुवातीपासून वाटलेली डाळ आणि तूप कढईत घाला आणि मंद आचेवर भाजत राहा.   

. १० मिनिटांनंतर पाव कप तूप घाला. आणि मिश्रण गुलाबी रंग येईपर्यंत भाजत राहा. भाजलेल्या डाळीचा खमंग दरवळ यायला लागेल. मिश्रण भाजायला २५३० मिनिटं लागतात

Roast the mixture till light brown (मिश्रण गुलाबी रंगावर भाजून घ्या )

. वाटलेली डाळ खमंग भाजणं ही ह्या रेसिपीमधली खूप महत्त्वाची कृती आहे. डाळ कमी भाजली तर हलवा खमंग आणि स्वादिष्ट होणार नाही. वाटलेली डाळ ओली असताना ती भाजायला कठीण जाते (मायक्रोवेव्ह मध्ये भाजून ही पायरी सोपी होते). जसा जसा मिश्रणाचा ओलसरपणा कमी होतो तसे मिश्रण भाजायला हलके आणि सोपे जाते.

. कढईत १ कप गरम दूध आणि १ कप गरम पाणी घाला आणि झाकण ठेवून ५ मिनिटं शिजवा.

१०. झाकण काढून ५ मिनिटं मिश्रण परता

११. साखर आणि चिमूटभर मीठ घालून मिश्रण एकजीव करा आणि १० मिनिटं परता.

१२. केशर भिजवलेलं दूध आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करा

१३. उरलेलं पाव कप साजूक तूप घाला आणि मिश्रण एकजीव करा.

१४. बदामाचे तुकडे घालून मिश्रण ढवळून घ्या

Moogdal Halwa (मूगडाळ हलवा)

१५. स्वादिष्ट आणि खमंग मूगडाळ हलवा तयार आहे. गरम / कोमट हलवा खायला द्या. फ्रिजमध्ये ठेवलेला हलवा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून खायला द्या

Moogdal Halwa (मूगडाळ हलवा)
Moogdal Halwa (मूगडाळ हलवा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes