Suranache Thalipeeth (सुरणाचे थालीपीठ) – Savory Pan Cake using Yam / Farali Chilla
सुरणाचे खमंग खुसखुशीत थालीपीठ मराठी
This Maharashtrian specialty Thalipeeth is generally eaten for Upwas / Fasting. But you can have it for breakfast / snack on non-upwas days as well. This is very simple, quick and healthy dish. I use Bolied Yam and 3 types of Flours in this Thalipeeth – Varai / Samo Flour, Sabudana / Tapioca Flour and Rajgira / Amaranth Flour. One can easily make these Flour at home. Roast these grains slightly and upon cooling grind them in a Grinder. Grinding Tapioca takes longer; so wait for 5-10 minutes when the grinder gets heated and then use it again. Suranache Thalipeeth is very tasty and has a nice texture.
Ingredients (makes 10-12 Thalipeeth) (1 cup = 250 ml)
Yam ¼ kg
Varai / Samo Flour 1 cup
Rajgira / Amaranth Flour ½ cup
Sabudana / Tapioca Flour ½ cup
Chili Powder / Green chili paste ½ teaspoon
Sugar 1 teaspoon
Roasted Peanut Powder 3 tablespoon
Cumin Seeds / Powder ½ teaspoon
Kokam 4-5
Salt to taste
Ghee (Clarified Butter) to be used while roasting
Home made butter on serving plate
Instructions
1. Wash, Peel and chop Yam into thin slices of about ¼ cm thick.
2. Wash the slices; transfer them to a bowl. Add kokam, ½ teaspoon salt and pressure cook Yam till soft.
3. Upon cooling discard kokam. using a grinder, grind Yam into a smooth paste.
4. Transfer Yam to a big bowl. Add Varai / Samo flour, Rajgira / Amaranth Flour, Sabudana / Tapoica Flour, Chili powder / Chili paste, Sugar, Roasted Peanut powder, Cumin seeds / powder and little Salt (remember we had added salt in Yam while cooking). Bind a medium consistency dough by adding little water at a time.
5. Take a plastic sheet or butter paper. Apply some Ghee.
6. Make round balls of dough bigger than a big lemon, keep it on the sheet, dip fingers in water and pat dough with fingers to make a circular shape (thalipeeth) of 3-4 mm thickness. Using a finger, make 3 holes in the thalipeeth.
7. Transfer Thalipeeth to a hot iron Griddle. Add few drops of ghee around Thalipeeth and in the holes.
8. Cover the Griddle and cook for 2 minutes.
9. Flip the Thalipeeth.
10. Add few drops of ghee and cook the other side.
11. Serve hot with Home made butter. It tastes awesome.
Tip
1. Instead of 3 flours, you can use ready made Upwas Bhajani. This is easily available in the market.
==================================================================================
सुरणाचे खमंग खुसखुशीत थालीपीठ
उपासाचं थालीपीठ करताना साधारणपणे बटाटा वापरला जातो. पण मी बरेचदा सुरण घालून थालीपीठ करते. माझ्याकडे वरी तांदूळ, राजगिरा आणि साबुदाण्याची पिठं केलेली असतात. ही धान्य जरा भाजून मिक्सरमध्ये पिठं छान होतात. साबुदाण्याच्या पिठासाठी मिक्सर मधेमधे १–२ दा थांबवून गार करावा लागतो. एव्हढं तंत्र सांभाळलं की पीठ छान होतं. सुरणाचे काप करून आमसूल, मीठ घालून कुकरमध्ये वाफवून घेते. सुरण कुस्करून त्यात ही पिठं, तिखट, दाण्याचं कूट, मीठ, साखर घालून पीठ भिजवते. सुरणामुळे हे थालीपीठ फारच खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट लागतं.
साहित्य (१०–१२ थालीपीठासाठी) (१ कप = २५० मिली)
सुरण पाव किलो
वरीचे पीठ १ कप
राजगिरा पीठ अर्धा कप
साबुदाणा पीठ अर्धा कप
लाल तिखट / ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
साखर १ टीस्पून
शेंगदाण्याचं कूट ३ टेबलस्पून
जिरं / जिऱ्याची पूड अर्धा टीस्पून
आमसूल ४–५
मीठ चवीनुसार
तेल / तूप थालीपीठ भाजताना लावण्यासाठी
कृती
१. सुरण धुवून, सोलून त्याचे पातळ काप करून घ्या.
२. एका पातेल्यात सुरणाचे काप, आमसूल (कोकम) आणि अर्धा टीस्पून मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या.
३. सुरण गार झाल्यावर कोकम काढून टाका. मिक्सरमध्ये सुरण बारीक करून घ्या.
४. एका परातीत सुरण, वरीचे पीठ, साबुदाणा पीठ, राजगिरा पीठ, लाल तिखट / ठेचलेली हिरवी मिरची, दाण्याचं कूट, जिरे, साखर आणि थोडं मीठ (सुरण शिजवताना मीठ घातलं आहे) घालून मिश्रण एकजीव करा. थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैल पीठ (पीठ थापता यायला पाहिजे) भिजवून घ्या.
५. एका प्लास्टिकच्या कागदाला / बटर पेपर ला थोडं तूप लावून घ्या.
६. पिठाचा छोट्या बॉल एवढा गोळा घेऊन त्या कागदावर ठेवून जरा जाडसर थालीपीठ थापून घ्या. मधे ३ भोकं करून घ्या.
७. नॉन स्टिक / लोखंडी तवा गरम करून त्यावर हे थालीपीठ घाला. बाजूने आणि भोकांमध्ये तूप घाला आणि झाकण ठेवून २ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या.
८. थालीपीठ परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. भाजताना थोडं तूप घाला.
९. गरम गरम थालीपीठ लोण्यासोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes