Falafel (फलाफल) – Popular Middle Eastern Snack

Falafel served with Hummus, Pickled Veggies and Pitta Bread (फलाफल, हम्मस, पिकल्ड भाज्या आणि पिट्टा ब्रेड)

Falafel (फलाफल) – Popular Middle Eastern Snack

फलाफल आखाती देशातला लोकप्रिय पदार्थ मराठी

Falafel is a popular Middle Eastern snack made from Chickpeas. There are various recipes of Falafel. Most of them use Soaked dry Chickpeas and they strictly mention not to use Cooked Chickpeas. With Cooked Chickpeas the texture of Falafel becomes mushy and you need to add All purpose flour for binding – that changes the taste of Falafel. On the other hand, Falafel made from soaked dry Chickpeas becomes little dry. So I tried a combination of both. I added soaked chickpeas and boiled chickpeas in equal quantity. I did not have to add any flour for binding. And the texture of Falafel was perfect – it wasn’t dry.

Falafel is generally served with Hummus, Pickled Vegetable and Pitta Bread (Flat bread).

Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)

Chickpeas 2 cups
Onions 2 Medium finely chopped
Garlic 7-8 cloves
Cumin seeds 1 Teaspoon
Coriander Seeds 1 Tablespoon
Coriander Leaves 1 cup (or Parsley ½ cup)
Black Pepper 8-10
Cardamom 2
Sesame seeds 2 Tablespoon
Olive oil 2 Tablespoon (Use any cooking oil if olive oil is not available)
Baking powder 3/4 Teaspoon
Oil for frying

Salt to taste

Instructions

1. Soak Chickpeas for 6-7 hours.

2. Pressure Cook ½ of the soaked chickpeas.

3. Dry roast Cumin Seeds for 1-2 minutes. Dry roast coriander seeds for 1-2 minutes. Dry roast Black Pepper for 2 minutes. Roughly Pound Black Pepper.

4. Grind Onions, Garlic, Cumin Seeds, Coriander Seeds, Coriander Leaves, Cardamom together without adding water. Take it out to a bowl. Add pound Black Pepper.

5. Drain water from soaked chickpeas. Grind it into little coarse paste. Transfer it to the bowl.

6. Drain water from cooked Chickpeas and grind it into coarse paste. Transfer it to the bowl.

7. Add Sesame seeds and salt to the bowl and mix together.

8. Keep the mixture in the refrigerator for 2 hours.

9. Add Olive Oil / any cooking oil and baking powder. Mix.

10. Make medium size balls of the mixture and deep fry in hot oil on low flame till the balls are brown from outside.

11. Generally mixture balls won’t spread in the oil. If they do, add 1-2 tablespoon of all purpose flour (Maida) to the mixture, mix and then make and fry dough balls.

12. This Falafel will be crispy from outside and little soft from inside. But it won’t be dry. It will have perfect texture.

13. Serve hot Falafel with Hummus, Pickled vegetables and Pita Bread.

14 For Pickled Vegetables, Peel and chop Carrots, Beet Roots into thin long pieces (like french fries). Cook them in water till little tender. I cook it in Microwave. Don’t overcook. Drain water. Add vinegar enough to dip the pieces and salt. Keep in the refrigerator for 2 hours. Pickled vegetable are ready.

Falafel served with Hummus, Pickled Veggies and Pitta Bread (फलाफल, हम्मस, पिकल्ड भाज्या आणि पिट्टा ब्रेड)
Falafel served with Hummus, Pickled Veggies and Pitta Bread (फलाफल, हम्मस, पिकल्ड भाज्या आणि पिट्टा ब्रेड)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

फलाफल आखाती देशातला लोकप्रिय पदार्थ

फलाफल हा आखाती देशातला अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. आपल्या भाषेत त्याला काबुली चण्याचे वडे म्हणू शकतो. फलाफलच्या बऱ्याच रेसिपीज आहेत आणि प्रत्येक रेसिपी तीच ऑथेन्टिक आहे असा दावा करते. बहुतेक रेसिपीमध्ये भिजवलेले काबुली चणे न शिजवता घालतात. आणि त्यात लिहिलेलं असतं की शिजवलेले काबुली चणे अजिबात वापरू नयेत कारण त्याने फलाफलचं टेक्सचर बदलतं तसंच बाइंडिंग साठी मैदा घालावा लागल्यामुळे चवही बदलते. पण कबुली चणे न शिजवता घालून केलेली फलाफल खाताना खूप सुकी (dry) लागते. यावर मी एक तोडगा काढला. खरं तर माझ्या चुकीमुळे तोडगा निघाला असं म्हणावं लागेल. फलाफल करायला भिजत घातलेले सगळे काबुली चणे मी चुकून शिजवले (खरं म्हणजे फक्त हम्मस बनवायला लागतील तेवढेच चणे शिजवायचे होते). मग मोठा प्रश्न पडला आता काय करायचे? तेव्हा विचार केला आणखी थोडे काबुली चणे भिजवून न शिजवता घालून बघूया. म्हणजे शिजवलेले आणि न शिजवलेले चणे अर्धे अर्धे. मिश्रण बनवून जरा घाबरतच २ गोळे करून तेलात घातले पसरतात का ते बघायलाआणि गोळे अजिबात पसरले नाहीत. तळून पाहिले तर टेक्सचर अगदी छान आलं होतं. अशी एका चुकीतून ही रेसिपी बनली गेली.

फलाफल हम्मस, पिकल्ड भाज्या आणि पिट्टा ब्रेड सोबत सर्व्ह करतात. हे सगळं घरी बनवलेलं आहे. पिकल्ड भाज्यांची रेसिपी खाली दिली आहे. बाकीच्या रेसिपिज नंतर देईन.

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

काबुली चणे (छोले) २ कप

कांदे २ मध्यम बारीक चिरून

लसूण ७८ पाकळ्या

जिरे १ टीस्पून

धने १ टेबलस्पून

कोथिंबीर १ कप (किंवा पार्सली अर्धा कप)

काळी मिरी ८१०

वेलची २

तीळ २ टेबलस्पून

ऑलिव्ह ऑईल २ टेबलस्पून (नसेल तर नेहमीचं तेल)

बेकिंग पावडर पाऊण टीस्पून

तेल तळण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. काबुली चणे ६७ तास पाण्यात भिजवून ठेवा.

. अर्धे काबुली चणे प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. जिरं, धने आणि काळी मिरी वेगवेगळे १२ मिनिटं भाजून घ्यामिरी जाडसर कुटून घ्या

. मिक्सरमध्ये कांदे, लसूण, जिरं, धने, कोथिंबीर, वेलची पाणी न घालता बारीक वाटून घ्या. एका वाडग्यात काढा. त्यात कुटलेली मिरी घाला.     

. भिजवलेल्या काबुली चण्यातलं पाणी काढून टाका. मिक्सरमध्ये जरा जाडसर वाटून घ्या. पाणी अजिबात घालू नका. मिश्रण वाडग्यात काढा

. शिजवलेल्या काबुली चण्यातलं पाणी काढून टाका. मिक्सरमध्ये जरा जाडसर वाटून घ्या. पाणी अजिबात घालू नका. मिश्रण वाडग्यात काढा.

. वाडग्यात तीळ आणि मीठ घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.

. मिश्रण २ तास फ्रिजमध्ये ठेवा.

. वाडग्यात ऑलिव्ह ऑईल किंवा नेहमीचं तेल घाला; बेकिंग पावडर घाला आणि मिश्रण ढवळून घ्या.

१०. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून गरम तेलात मंद आचेवर खरपूस तळून घ्या.

११. हे गोळे बहुतेक तेलात पसरत नाहीत. पण पसरले तर मिश्रणात २ टेबलस्पून मैदा घालून एकजीव करा आणि नंतर गोळे करून तळून घ्या

१२. फलाफल छान खुसखुशीत होतात आणि टेक्सचर पण अगदी हवं तसं असतं. अजिबात सुके(dry)  होत नाहीत

१३. गरमगरम फलाफल हम्मस, पिकल्ड भाज्या आणि पिट्टा ब्रेड सोबत सर्व्ह करा.

१४. पिकल्ड भाज्यांसाठी गाजर, बिट सोलून त्यांचे लांबट पातळ काप करा (फ्रेंच फ्राईज सारखे). पाण्यात भाज्या नरम होईपर्यंत शिजवून घ्या (मी मायक्रोवेव्ह मध्ये शिजवते). पाणी काढून टाका आणि भाज्या थोडं मीठ घालून व्हिनेगर मध्ये बुडवून दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. दोन तासानंतर पिकल्ड भाज्या खायला तयार असतील.   

Falafel served with Hummus, Pickled Veggies and Pitta Bread (फलाफल, हम्मस, पिकल्ड भाज्या आणि पिट्टा ब्रेड)
Falafel served with Hummus, Pickled Veggies and Pitta Bread (फलाफल, हम्मस, पिकल्ड भाज्या आणि पिट्टा ब्रेड)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes