Petha (पेठा) – Popular Indian Ash Gourd Candy
Petha is a famous sweet from Agra in North India. It is generally made in Winter as the cold weather does not make the sweet soggy and moist. Petha is made from Ash Gourd. In simple words it is just Ash Gourd pieces cooked in Sugar Syrup. The process is lengthy but not difficult. There is long resting time after each step. Apart from Ash Gourd and Sugar, the recipe uses a peculiar ingredient – Edible Slaked Lime (Chuna). Ash gourd pieces are soaked in slaked lime water to make them firm.
Ash Gourd is known by different names – Winter Gourd, White Gourd, Winter Melon, Ash Melon etc. Ash Gourd is light green from outside and white from inside. We need ripe Ash Gourd to make Petha. Adjacent to Peel there is hard fleshy portion. Next to that is soft fleshy portion and then the hard seeds. The hard fleshy portion is used for making Petha.
Petha is either dry or moist juicy. For making Moist Petha, just drop the last step in the recipe. Dry Petha has a longer shelf life.
Ingredients (1 cup = 250 ml)
Ash Gourd 1 kg
Sugar 3 cups
Slaked Lime (Chuna) 2 teaspoons
Instructions
1. Peel Ash Gourd, cut into 4 pieces. Remove seeds and the soft fleshy portion. Chop the hard fleshy portion into square or rectangular pieces.
2. Prick Ash Gourd Pieces with the help of a fork so that sugar syrup will be absorbed properly.
3. Wash the Ash Gourd Pieces properly. In a Stainless Steel Pan, add 1 liter of water and slaked lime. Dissolve slaked lime in the water. Transfer the Ash Gourd pieces to this water. Make sure all pieces are submerged in water. Add water if required. Leave the pan covered for 8-10 hours.
4. Take out Ash Gourd Pieces from slaked lime water and wash them properly with fresh water.
5. Take 1-1.25 liters of water in a pan and heat the pan. When the water comes to boil, add Ash Gourd pieces. Cook on high flame for 20-25 minutes, stirring regularly. When the Ash Gourd changes colour, switch off the gas.
6. Transfer the pieces to a sieve and drain water.
7. Take sugar in a heavy bottom pan. Add 2 cups of water. Heat the pan and stir continuously till sugar dissolves. Transfer Ash Gourd pieces to the pan. Keep cooking on high flame till the sugar syrup thickens. Make sure the syrup does not burn. When you drop the sugar syrup with a spoon, the last drop should fall as a string.
8. Take out the pan off the flame.
9. If you like moist juicy Petha, you can have it at this stage. This Petha lasts for 2-3 days.
10. For making Dry Petha, Allow the mixture to cool. Keep covered for 8-10 hours. Now the sugar syrup will be little liquidy due to Ash Gourd releasing water. Again cook the mixture till sugar syrup thickens.
11. Spread Ash Gourd pieces of a net stand keeping a plate underneath so that excess syrup is gathered in the plate. Leave it in shade to dry for 12 hours.
12. Delicious dry Petha is ready. It is dry from outside and little moist and juicy from inside.
13. Store Petha lasts for 8-10 days at room temperature.
Note
1. Add water to the left over sugar syrup, heat it to dissolve the sugar. Add lemon juice and salt to make Lemon Sharbat.
==================================================================================
पेठा – आग्र्याची लोकप्रिय मिठाई
आग्र्याचा पेठा खूप लोकप्रिय आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतमध्ये रसदार असा पेठा बहुतेक सगळ्यांना आवडतो. पेठा कोहळ्यापासून (Ash Gourd) करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर साखरेच्या पाकात शिजवलेला कोहळा म्हणजे पेठा. कोहळा आणि साखरेशिवाय आणखी एक महत्त्वाचा जिन्नस वापरतात; तो म्हणजे खायचा चुना (calcium hydroxide). चुन्यामुळे पेठा मऊ पडत नाही. रेसिपी सोपी आहे पण वेळकाढू आहे. पेठा करताना मध्ये मध्ये ८–१० तास थांबावं लागतं. घाई गडबड करून चालत नाही.
पेठ्याचे दोन प्रकार असतात. पहिला रसाळ पेठा ज्यात साखरेचा पाक दिसतो. आणि दुसरा सुका पेठा ज्यात साखरेचा पाक आटवल्यामुळे झालेले साखरेचे स्फटिक दिसतात. रसाळ पेठा फार दिवस टिकत नाही. सुका पेठा ८–१० दिवस टिकतो. विकतच्या पेठ्यावर लिहिलेलं असतं – ३–४ आठवडे टिकेल. पण आम्ही आग्र्याहून मुंबईला आणलेला एका लोकप्रिय ब्रॅण्डचा सुका पेठा ४ दिवसात खराब झाला (expiry date ३ आठवड्यानंतरची होती).
पेठा करायला जून कोहळा लागतो. खायचा चुना पानवाल्याकडे मिळतो. छोट्या पांढऱ्या ट्यूब्स मिळतात. एक ट्यूब म्हणजे साधारण एक टीस्पून चुना.
साहित्य (१ कप = २५० मिली)
कोहळा १ किलो
साखर ३ कप
खायचा चुना २ टीस्पून
कृती
१. कोहळा धुवून सोलून ४ तुकडे करा. बिया आणि बियांलगतचा मऊ गर काढून टाका. बाकीच्या घट्ट गराचे चौकोनी तुकडे करा.
२. प्रत्येक तुकड्याला खायच्या काट्याने टोचे मारा म्हणजे साखरेचा पाक नीट मुरेल.
३. कोहळ्याचे तुकडे धुवून घ्या. स्टीलच्या पातेल्यात १ लिटर पाणी घाला आणि चुना घालून नीट मिसळून घ्या. कोहळ्याचे तुकडे चुन्याच्या पाण्यात घाला. तुकडे पूर्णपणे पाण्यात बुडले पाहिजेत. जरूर असेल तर आणखी थोडं पाणी घाला. पातेलं ८–१० तास झाकून ठेवा.
४. कोहळ्याचे तुकडे चुनाच्या पाण्यातून काढून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
५. एका पातेल्यात एक – सव्वा लिटर पाणी घेऊन गरम करा. पाणी उकळलं की त्यात कोहळ्याचे तुकडे घाला. मोठ्या आचेवर २०–२५ मिनिटं शिजवा. मधे मधे ढवळत राहा. कोहळ्याचा रंग बदलला की गॅस बंद करा.
६. तुकडे चाळणीवर काढून जास्तीचं पाणी काढून टाका.
७. एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर घेऊन त्यात २ कप पाणी घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवून साखर पाण्यात विरघळवून घ्या. एकसारखं ढवळत राहा म्हणजे साखर जळणार नाही. साखर विरघळली की त्यात कोहळ्याचे तुकडे घाला. मोठ्या आचेवर शिजवा. मधे मधे ढवळा. साखरेचा पाक घट्ट झाला पाहिजे. चमच्याने पाक ओतताना शेवटचा थेम्ब तारेसारखा पडला की गॅस बंद करा.
८. तुम्हाला ओलसर रसाळ पेठा हवा असेल तर हा पेठा खाऊ शकता. हा पेठा २–३ दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही.
९. सुका पेठा करण्यासाठी पातेलं थंड झालं की झाकण ठेवून ८–१० तास तसंच ठेवा.
१०. कोहळा पाणी सोडतो त्यामुळे आता साखरेचा पाक थोडा पातळ झाला असेल. परत मिश्रण मोठ्या आचेवर साखरेचा पाक घट्ट होईपर्यंत शिजवा.
११. तयार पेठा एका जाळीच्या स्टॅण्डवर पसरून ठेवा. जाळीखाली एक ताटली ठेवा. पेठा १२ तास सावलीत सुकवा.
१२. स्वादिष्ट सुका पेठा तयार आहे. हा बाहेरून सुका असतो आणि आत रसाळ असतो.
१३. सुका पेठा फ्रिजबाहेर ८–१० दिवस टिकतो.
टीप
१. उरलेल्या साखरेच्या पाकाचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. त्या पाकात पाणी घालून गाळून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून सरबत करा.
व्वा मस्तच
Thank you Jayshree