Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda – Gooseberry Sweet n Sour Pickle

Amla Chhunda
Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) - Amla Chhunda

Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda – Gooseberry Sweet n Sour Pickle

आवळ्याचा छुन्दा मराठी 

Awala – Amla – Indian Gooseberry is available in winter and is full of nutrients. It’s a great immunity booster. One can make different accompaniments using Awala. This Chhunda is sweet and sour pickle made using Awala. It’s an easy recipe to make a yummy accompaniment that goes well with Thepla, Roti, Chilla etc.

Ingredients (1 cup = 250 ml)

Grated Awala / Amla / Gooseberry 2 cups (about 250 grams Gooseberry)

Sugar 1.5 cups (add more if required)

Kashmiri Chili Powder ½ teaspoon (adjust as per taste)

Roasted Cumin Powder ½ teaspoon

Lemon Juice 1 teaspoon

Black Salt to taste

Instructions

1. Wash, wipe Gooseberry and grate it.

2. In a stainless Steel pan, mix grated Gooseberry and sugar. Keep covered for 4-5 hours.

3. Mixture will be watery due to Gooseberry releasing water.

4. Cook on medium flame till mixture thickens a bit. Stir regularly.

5. Add Kashmiri Chili Powder, Roasted cumin Powder, lemon juice and Black salt. Mix.

6. Keep cooking on medium flame till there is little water left in the mixture. Mixture thickens as it gets cool. So don’t make it too thick.

7. Switch off the gas. Let the mixture come to room temperature.

Amla Chhunda
Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda

8. Transfer Chhunda to a container with lid and store in a refrigerator.

9. Enjoy yummy Chhunda as an accompaniment with Thepla, Roti, Chilla.

Amla Chhunda
Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda
Amla Chhunda
Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

आवळ्याचा छुन्दा चविष्ट चटपटीत तोंडीलावणं

हिवाळ्यात छान आवळे मिळतात. आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तोंडाला चव येते. आवळ्याची वेगवेगळी तोंडीलावणी करतात मोरावळा, तिखट लोणचं, गोड लोणचं. ही रेसिपी आवळ्याच्या छुन्द्याची आहे. ह्यात मी साखर घातलीय. छुन्दा दोन प्रकारे करतात गॅसवर शिजवून किंवा उन्हात सुकवून. पण हल्ली मुंबईच्या बऱ्याच घरात कडक ऊन येत नाही. माझ्याकडेही तसंच. त्यामुळे हा गॅसवर शिजवून केलेला आहे. रेसिपी सोपी आहे. छुन्दा खूप चविष्ट लागतो. ठेपले, पोळी, घावन, धिरडी कशाही सोबत छान लागतो.

साहित्य (१ कप = २५० मिली)

आवळ्याचा कीस २ कप (साधारण पाव किलो आवळे लागतात)

साखर दीड कप (जरूर असेल तर थोडी जास्त)

लिंबाचा रस १ टीस्पून

काश्मिरी लाल तिखट अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा टीस्पून

काळं मीठ चवीनुसार

कृती

. आवळे धुवून कोरडे करून किसून घ्या.

. एका स्टील च्या पातेल्यात आवळ्याचा कीस आणि साखर एकत्र करून ४५ तास झाकून ठेवा.

. मिश्रण मध्यम आचेवर शिजवा. मधे मधे ढवळत राहा.

. मिश्रण जरा दाट व्हायला लागलं की त्यात लिंबाचा रस, लाल तिखट, जिरेपूड आणि काळं मीठ घालून एकत्र करा.

. मिश्रण शिजवत राहा. मिश्रणात थोडंसं पाणी राहिलं की गॅस बंद करा. सगळं पाणी आटवू नका कारण छुन्दा गार झाल्यावर घट्ट होतो.

Amla Chhunda
Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda

. छुन्दा गार झाला की झाकणाच्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.

. जेवणात, नाश्त्याला तोंडीलावणं म्हणून हा चविष्ट छुन्दा खायला द्या

Amla Chhunda
Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda
Amla Chhunda
Awalyacha Chhunda (आवळ्याचा छुन्दा ) – Amla Chhunda

 

 

 

 

8 Comments

  1. सुधाजी, काल हा छुंदा केला. छान चविष्ट झाला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गार होताना आळत गेला. पुढच्या वेळी करताना किती पातळ ठेवून आच बंद करावी याचा अंदाज आला आहे.
    रेसिपी साठी धन्यवाद.

  2. नमस्कार,
    मी लहानपणी अजोळी आवळ्याचे नाकात झणझणीत जाणारे मोहरीचे फेसलेलं लोणचं खाल्लं होतं. मी ती रेसेपी शोधत आहे, मला अजून ही रेसिपी कुठे मिळाली नाही, तसंच ह्या प्रकारचं लोणचं ही बाजारात कुठेच मिळालं नाही. आपल्या माहितीत असेल तर आपण कृपया देऊ शकाल का?

    • मला रेसिपी मिळाली तर करून बघेन आणि रेसिपी शेअर करेन.

Your comments / feedback will help improve the recipes