Gobi Musallam (गोबी मुसल्लम) – Baked Cauliflower in a Yummy Gravy – A Hyderabadi Specialty

Gobi Musallam
Gobi Musallam (गोबी मुसल्लम)

Gobi Musallam (गोबी मुसल्लम)Baked Cauliflower in a Yummy Gravy – A Hyderabadi Specialty

गोबी मुसल्लम हैदराबादी स्पेशालिटी 

Last week when I saw nice and fresh baby Cauliflower in the market I thought of this Hyderabadi Specialty – Gobi Musallam. In the traditional recipe a big Cauliflower is cooked whole and baked in Gravy. Instead I decided to use small Baby Cauliflowers. Cauliflower is par boiled, Marinated in Spice before baking. I checked a few recipes for this but most of them used specific spice mixture like “Musallam Masala”, “Kadhai Masala” etc. I was not sure if these were easily available and also I did not want to buy a full packet just for using in this subji once / twice. Hence combined 2-3 recipes to create my own recipe. The subji turned out very yummy. Everyone loved it.

You need an Oven for baking this subji. In my opinion there is no option.

The gravy of this Musallam is so tasty that it will go well with Baby Potato, Paneer (Cottage Cheese) also.

Ingredients (Serves 5)

Cauliflower 1 big or 2-3 small (about 500 gms with leaves)

Turmeric Powder ¼ teaspoon

For Yogurt Marination

Thick Curd/Yogurt 1.5 cups (Don’t take sour curd)

Ginger Garlic Paste 2 teaspoon

Green Chili Paste ½ teaspoon

Kashmiri Chili Powder ½ teaspoon

Garam Masala 1 teaspoon

Sugar ½ teaspoon

Salt ½ teaspoon

For the Gravy

Tomatoes Medium size 5

Onions medium size 3 finely chopped

Ginger Garlic Paste 2 teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Kashmiri Chili Powder ½- ¾ teaspoon

Coriander Powder ¾ teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Cashew Nuts 15

Green Cardamom 1

Kasuri Methi (Dried Fenugreek Leaves) 1 tablespoon

Chopped coriander 2 tablespoon

Saffron 7-8 strands soaked in ¼ cup hot milk

Fresh Cream 2 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Oil 1 tablespoon

Ghee (Clarified Butter) 1 tablespoon

Salt to taste

Instructions

1. Discard Leaves of Cauliflower. Keep some part of stem along with the Cauliflower. Cut the stem in such a way that the Cauliflower sits well.

2. Soak the cauliflower in salted water for 15-20 minutes.

3. Heat enough water in a big pan such that cauliflower will fully immerse in the water.

4. Add ¼ teaspoon salt and turmeric powder to water.

5. Place the cauliflower in the boiling water, head up. Allow it to boil for 5 minutes on medium flame. If you are using baby (small) cauliflower, boil them for 4 minutes.

6. Turn the cauliflower carefully, this time with the stem facing up. Allow it to boil for 3-4 minutes. If you are using baby (small) cauliflower, boil them for 3 minutes.

7. Remove the parboiled cauliflower from the water and keep it in a bowl to cool.

Gobi Musallam
Par Boiled Cauliflower (पाण्यात अर्धवट शिजवलेले कॉलीफ्लॉवर)

For Yogurt Marination

1. Hang Curd / Yogurt in a Muslin cloth for 30 minutes. This way excess water from curd will be drained away.

2. Transfer Hung curd to a bowl. Add all the ingredients mentioned for “Yogurt Marination” and mix well.

Yogurt Marination (दह्याचा मसाला)

3. Coat the parboiled cauliflower with the marination mixture properly.

3. Cover the bowl and leave it for minimum 1 hour.

For the Gravy

1. Soak cashew nuts in hot water for 15 -20 minutes.

2. Using a blender, Blend tomatoes into fine Puree.

3. Heat oil and ghee together in a pan on medium flame.

4. Add cumin seeds. Wait for splutter. Add Asafoetida, Cardamom.

5. Add chopped onion and saute till light brown.

6. Add Ginger Garlic Paste. Stir for a minute. Add turmeric, Kashmiri red chili powder, coriander powder and cumin powder. Mix.

7. Add Tomato Puree and Salt. Cook on medium flame till puree becomes little thick.

8. Allow the mixture to cool.

9. Transfer the mixture to a blender along with cashew nuts and ¼ cup water. Blend into a smooth Puree.

10. Pour the Puree back in the pan. Add Kasuri methi, chopped coriander and saffron milk. Mix well and bring the mixture to boil.

11. Preheat the oven to 180°C. Place the marinated cauliflower upright in a baking tray.

12. Add any excess Marination mixture to the Gravy. Mix well and boil for 1 minute and switch off the gas.

13. Pour the Gravy over the cauliflower.

Gobi Musallam before baking (गोबी मुसल्लम बेक करायच्या आधी)

14. Bake the cauliflower for 25-30 minutes until the Gravy starts getting brown on top.

15. Insert a fork to check whether the cauliflower is cooked properly. Fork should easily pierce in the Cauliflower but it should not be overcooked. If Cauliflower is not cooked, bake for 5 more minutes. Take the baking tray out from the oven.

Gobi Musallam (गोबी मुसल्लम)

16. Yummy Gobi Musallam is ready. Garnish with fresh cream and Serve hot with naan, paratha or roti.

Gobi Musallam
Gobi Musallam (गोबी मुसल्लम)
Gobi Musallam
Gobi Musallam (गोबी मुसल्लम)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

गोबी मुसल्लम हैदराबादी स्पेशालिटी 

गेल्या आठवड्यात बाजारात छोटे छोटे फ्लॉवर चे गड्डे दिसले तेव्हा गोबी मुसल्लम ही डिश आठवली. ह्या हैदराबादी भाजीत फ्लॉवर अख्खा शिजवून मसाल्यात मुरवतात आणि नंतर रश्यासोबत ओव्हनमध्ये भाजतात. पारंपरिक रेसिपीत फ्लॉवरचा मोठा गड्डा वापरतात. मी छोटे छोटे गड्डे वापरले. गूगल वर रेसिपीज शोधल्या तर बऱ्याच रेसिपींमध्ये नवे नवे मसाले वापरलेले दिसले मुसल्लम मसाला, कढई मसाला वगैरे. मला असा कोणताही मसाला विकत आणायचा नव्हता कारण एकदा वापरून ते मसाले फ्रिजमध्ये पडून राहतात आणि नंतर जुने झाले म्हणून टाकून द्यावे लागतात. मला काहीही वाया गेलेलं चालत नाही. मग २३ रेसिपीज एकत्र करून माझी नवीन रेसिपी बनवली आणि गोबी मुसल्लम केलं. ही डिश फारच छान झाली आणि सगळ्यांना खूप आवडली.

ह्याचा रस्सा तर एवढा चविष्ट झाला की ह्यात छोटे बटाटे, पनीर घालूनही छान लागेल

साहित्य (५ जणांसाठी)

कॉलीफ्लॉवर १ मोठा गड्डा किंवा २३ छोटे गड्डे (पानांसकट अंदाजे अर्धा किलो)

हळद पाव चमचा

दह्याच्या मसाल्यासाठी

घट्ट गोड दही दीड कप

आलं लसूण पेस्ट २ टीस्पून

हिरव्या मिरचीची पेस्ट अर्धा टीस्पून

काश्मिरी  लाल तिखट अर्धा टीस्पून

गरम मसाला १ टीस्पून

साखर अर्धा टीस्पून

मीठ अर्धा टीस्पून

रस्श्यासाठी

टोमॅटो ५ मध्यम

कांदे ३ मध्यम बारीक चिरून

आलं लसूण पेस्ट २ टीस्पून

हळद पाव टीस्पून

काश्मिरी लाल तिखट अर्धा पाऊण टीस्पून

धने पूड पाऊण टीस्पून

जिरेपूड अर्धा टीस्पून

काजू १५

हिरवी वेलची १

कसुरी मेथी १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

केशर ७८ काड्या पाव कप गरम दुधात भिजवून

मलई / साय २ टेबलस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग चिमूटभर

तेल १ टेबलस्पून

साजूक तूप १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. कॉलीफ्लॉवर ची पानं काढून टाका. थोडा देठ फ्लॉवरला ठेवा. त्या देठावर फ्लॉवर नीट उभा राहिला पाहिजे.

. फ्लॉवर १५ मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा.

. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा. त्यात हळद आणि अर्धा चमचा मीठ घाला. फ्लॉवर देठाची बाजू खाली करून पाण्यात घालात्या पाण्यात पूर्ण बुडला पाहिजेफ्लॉवर ५ मिनिटं मध्यम आचेवर पाण्यात उकळू द्या (फ्लॉवर चे छोटे गड्डे असतील तर ४ मिनिटं उकळा). 

. फ्लॉवरचा गड्डा उलटा करा. आता देठ वर असेल. आता परत ३४ मिनिटं मध्यम आचेवर पाण्यात उकळू द्या (फ्लॉवर चे छोटे गड्डे असतील तर ३ मिनिटं उकळा). 

. फ्लॉवरचे गड्डे एका वाडग्यात काढून ठेवा.

Gobi Musallam
Par Boiled Cauliflower (पाण्यात अर्धवट शिजवलेले कॉलीफ्लॉवर)

दह्याच्या मसाल्याची कृती

. दही एका पातळ कपड्यात बांधून अर्धा तास टांगून ठेवा म्हणजे दह्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईलचक्का एका वाडग्यात काढून घ्या

. वर दह्याच्या मसाल्यासाठीदिलेलं सर्व साहित्य ह्या  चक्क्यात घाला आणि मिश्रण एकजीव करा.

Yogurt Marination (दह्याचा मसाला)

. फ्लॉवरच्या गड्ड्यांना हे मिश्रण सर्व बाजूनी लावून घ्या. आणि कमीत कमी तासभर झाकून ठेवा

रस्श्याची कृती

. काजू १५२० मिनिटं गरम पाण्यात भिजवून ठेवा.

. टोमॅटो कच्चेच मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या.

. एका कढईत तेल आणि साजूक तूप घालून गरम करा.

. गॅस मध्यम ठेवा. जिरं घालून तडतडले की हिंग आणि हिरवी वेलची घाला

. कांदा घालून मंद आचेवर गुलाबी रंगावर परतून घ्या.

. कढईत आलं लसूण पेस्ट घालून एक मिनिट परता. हळद, काश्मिरी लाल तिखट, धने पूड, जिरे पूड घालून मिश्रण ढवळून घ्या.

. बारीक केलेला टोमॅटो घाला, मीठ घाला. मध्यम आचेवर टोमॅटोचा रस जरा दाट होईपर्यंत शिजवा.

. गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्या.

. मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घाला. काजू आणि पाव कप पाणी घाला आणि मिश्रण बारीक वाटून घ्या.

१०. मिश्रण परत कढईत घाला. आणि एक उकळी काढा.

११. कसुरी मेथी, कोथिंबीर आणि केशराचं दूध घाला. मिश्रण ढवळून घ्या.

१२. ओव्हन १८० डिग्री ला प्रीहीट करून घ्या.

१३. दही लावलेला फ्लॉवर बेकिंग ट्रे मध्ये ठेवा. देठ खालच्या बाजूला येईल असा ठेवा

१४. जास्तीचा दह्याचा मसाला असेल तर तोही कढईतल्या मिश्रणात घाला. मिश्रण एकजीव करा आणि एक मिनिट उकळा. गॅस बंद करा. रस्सा तयार आहे

१५. फ्लॉवर वर रस्सा ओता. फ्लॉवर वर सर्व बाजूने रस्सा आला पाहिजे.

Gobi Musallam before baking (गोबी मुसल्लम बेक करायच्या आधी)

१६. बेकिंग ट्रे ओव्हन मध्ये ठेवून २५३० मिनिटं बेक करा. रस्सा वरून गडद रंगाचा व्हायला लागेलफ्लॉवरला फोर्क ने टोचून शिजलाय का ते बघा. फ्लॉवर शिजला पाहिजे पण अगदी मेण होऊ नये. कमी शिजला असेल तर आणखी ५ मिनिटं बेक करा. बेकिंग ट्रे ओव्हन मधून बाहेर काढा

Gobi Musallam (गोबी मुसल्लम)

१७. चविष्ट गोबी मुसल्लम तयार आहे. वरून फेटलेली साय घालून गरमगरम गोबी मुसल्लम नान, पराठा किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

Gobi Musallam
Gobi Musallam (गोबी मुसल्लम)
Gobi Musallam
Gobi Musallam (गोबी मुसल्लम)

 

 

 

4 Comments

  1. खुपच टेस्टी..
    इन्ग्रीदीयएंट वरुन अंदाज येतो.
    नक्की करणार.
    थैंक्स.

Your comments / feedback will help improve the recipes