Shahalyachya Malaichi Bhaaji (शहाळ्याच्या मलईची भाजी) – Tender Coconut Subji

शहाळ्याच्या मलईची भाजी (Tender Coconut Subji)
शहाळ्याच्या मलईची भाजी (Tender Coconut Subji)

Shahalyachya Malaichi Bhaaji (शहाळ्याच्या मलईची भाजी) – Tender Coconut Subji

शहाळ्याच्या मलईची भाजी मराठी

This innovative subji is made using Tender Coconut. Soft Tender Coconut flesh along with Cashew nuts makes this subji yummy and creamy. It requires standard ingredients that are generally available in Indian kitchen. Try this easy recipe to make an unconventional subji.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250ml)

Tender Coconut flesh 1 cup

Onion 1 medium finely chopped

Tomato 1 medium finely chopped

Cashew Nuts 20

Chili Powder 1 Teaspoon

Garam Masala ½ teaspoon

Dried Fenugreek Leaves (Kasuri Methi) 1 teaspoon

Ghee / Butter 1 tablespoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida 1 pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Chopped Coriander 1 tablespoon

Salt to taste

Instructions

1. Chop Tender coconut flesh into medium size pieces.

2. Soak Cashew Nuts in ½ cup water for 15 minutes.

3. Heat Ghee / Butter in a wok. Add Cumin Seeds, Wait for splutter. Add Asafoetida. Add Onions and saute on low flame till translucent. Add turmeric powder and mix.

4. Add tomatoes and cook covered till tomatoes are soft.

5. Add 1 cup water. Add 10 cashew nuts, chili powder and salt. Mix and let the mixture boil. Switch off the gas and leave the mixture to cool.

6. Using a Blender, Blend the mixture into a smooth paste. Transfer the mixture to the wok.

7. Chop remaining Cashew Nuts each into 2 pieces. Add Tender Coconut Flesh, Cashew Nuts and boil the mixture.

8. Add Garam Masala and crushed dry Fenugreek Leaves (Kasuri Methi).

9. Adjust the consistency of Gravy by adding water/ reducing water.

10. Add chopped coriander and serve hot with Indian Bread / Roti / Paratha.

शहाळ्याच्या मलईची भाजी (Tender Coconut Subji)
शहाळ्याच्या मलईची भाजी (Tender Coconut Subji)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

शहाळ्याच्या मलईची भाजी (Tender Coconut Subji)नाविन्यपूर्ण चवदार क्रिमी भाजी

ही नाविन्यपूर्ण भाजी शहाळ्याची मलई (कोवळा नारळ) घालून करतात. शहाळं जून असेल तर भाजी चांगली लागणार नाही. भाजीसाठी नरम मलईचं शहाळं (मुंबईच्या भाषेत पतला मलई‘) वापरावंसाहित्य नेहमीचंच आणि रेसिपी अगदी सोपी आहे. ह्यात कांदा, टोमॅटो सोबत काजू घालतात काजूची पेस्ट आणि अक्खे काजू सुद्धा. त्याने भाजी छान क्रिमी होते.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

शहाळ्याची कोवळी मलई १ कप

कांदा १ मध्यम बारीक चिरून

टोमॅटो १ मध्यम बारीक चिरून

काजू २०

लाल तिखट १ टीस्पून

गरम मसाला अर्धा टीस्पून

कसुरी मेथी १  टीस्पून

साजूक तूप १ टेबलस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

हळद अर्धा टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून 

मीठ  चवीनुसार

कृती

. शहाळ्याच्या मलईचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या

. काजू अर्धा कप पाण्यात १५ मिनिटं भिजवून ठेवा.

. एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात जिरं, हिंगाची फोडणी करून घ्या. त्यात चिरलेला कांदा घालून मंद आचेवर पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. ळद घाला, ढवळून घ्या.

. कढईत टोमॅटो घालून ढवळून घ्या. झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

. कढईत १ कप पाणी घाला. त्यात १० काजू, लाल तिखट आणि मीठ घालून एक उकळी काढा. गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्या.

. मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि परत कढईत घाला.

. उरलेले काजूचे दोन दोन तुकडे कराकढईत मलईचे तुकडे, काजूचे तुकडे घालून मिश्रणाला उकळी काढा.

. गरम मसाला घाला. कसुरी मेथी हाताने चुरून घाला.

. भाजीचा रस जेवढा दाट/ पातळ हवा असेल त्यानुसार पाणी घालून उकळी काढा.

१०. चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम चवदार भाजी पराठा / पोळी सोबत खायला द्या.

शहाळ्याच्या मलईची भाजी (Tender Coconut Subji)
शहाळ्याच्या मलईची भाजी (Tender Coconut Subji)

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes