Masale Bhaat / Masale Bhat (मसाले भात) – Maharashtrian Specialty Spiced Rice

Masale Bhaat (मसाले भात)
Masale Bhaat (मसाले भात)

Masale Bhaat / Masale Bhat (मसाले भात) – Maharashtrian Specialty Spiced Rice

मसाले भात मराठी

Spiced Rice made with Goda Masala is a Maharashtrian Specialty. In Maharashtra different vegetables like Brinjal, Carrots, Green Peas, Cabbage, Cauli Flower are added to Spiced Rice. The basic recipe of Spiced Rice is the same. But these vegetables give a different taste to rice. I add whole spices – Black Pepper, Cloves, Cardamom, Cinnamon and Bay Leaf along with Goda Masala. This makes the rice very tasty. My mother used to add a spoonful of Pure Ghee at the end after cooking the rice. That gives a nice aroma to the rice.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Raw Rice 1 cup (Use short grain rice like Kolam / Ambemohor)

Cauli Flower Florets 1 cup

Goda Masala 2 teaspoon

Black Pepper 8-10

Cloves 6-7

Bay leaf 1

Cinnamon 1 inch stick

Green Cardamom 2

Chili Powder ½ to 1 teaspoon (adjust as per taste)

Curry Leaves 10-12 leaves

Lemon Juice 1 teaspoon

Fresh Scraped coconut 3 tablespoon

Chopped coriander 2 tablespoon

Cashew Nut Pieces 2 tablespoon

Oil 2 tablespoon

Mustard Seeds ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida 2 pinch

Pure Ghee (Clarified butter) 1 tablespoon

Salt to taste

Instructions

1. Wash Raw Rice and leave it for 30 minutes.

2. Wash Cauli Flower, chop it as florets and soak in salt water for 10 minutes.

3. In a pan, heat oil.

4. Add Mustard seeds, wait for sputter; Add cumin seeds, wait for splutter; Add Turmeric Powder, Asafoetida; Add Black Pepper, Cloves, Cinnamon, Green Cardamom and Bay leaf; Add curry leaves and cashew nuts.

5. Add Cauli Flower and saute for 2 minutes.

6. Add Rice and saute the mixture till rice is dry. Simultaneously boil 2.5 cups of water.

7. When Rice is dry, add boiling water to it.

8. Add Salt, Chili Powder, Lemon Juice and Goda Masala. Mix.

9. Cover the pan and cook the mixture till rice is cooked. While cooking add more water if required.

10. Add Fresh scraped coconut and coriander. Mix.

11. Add Pure Ghee and mix. Switch off the gas.

12. Serve Masale Bhaat hot with Kadhi and Papad / Bajiya.

Note

1. If you have Rice cooker, then you can transfer the mixture to Rice cooker after step 8; add coconut and coriander and cook rice in Rice Cooker. When the rice is cooked, add Pure Ghee and mix.

Masale Bhaat (मसाले भात)
Masale Bhaat (मसाले भात)
Masale Bhaat (मसाले भात)
Masale Bhaat (मसाले भात)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मसाले भात

आपला महाराष्ट्रीयन मसालेभात कोणत्याही भाज्या घालून करू शकतो वांगी, गाजर, मटार, कोबी, फ्लॉवर, तोंडली. मूळ मसालेभाताची कृती एकच असली तरी भाज्यांमुळे वेगळी चव येते. मी मसालेभातात गोडा मसाला घालते आणि मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, तमालपत्र अख्खेच घालते. भात पटकन होतो आणि छान लागतो. माझ्या आईची एक टीप आहे भात शिजला की त्यात चमचाभर साजूक तूप घालायचं त्यामुळे भाताला छान सुगंध येतो.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

तांदूळ १ कप (मी कोलम / आंबेमोहोर वापरते; कोणताही बारीक तांदूळ वापरू शकता)

फ्लॉवरचे तुरे १ कप 

गोडा मसाला २ चमचे

काळी मिरी ८१०

लवंग ६

दालचिनी १ इंच तुकडा

हिरवी वेलची २

तमालपत्र १

लाल तिखट अर्धा ते १ चमचा

कढीपत्ता १०१२ पानं

लिंबाचा रस १ चमचा

ताजा खवलेला नारळ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

काजूचे तुकडे २ टेबलस्पून

तेल २ टेबलस्पून

मोहरी अर्धा चमचा

जिरं अर्धा चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग २ चिमूट

साजूक तूप १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. तांदूळ धुवून अर्धा तास ठेवून द्या.

. फ्लॉवर धुवून त्याचे तुरे काढून घ्या. पाण्यात थोडं मीठ घालून त्यात फ्लॉवरचे तुरे १० मिनिटं बुडवून ठेवा.   

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची फोडणी करा.

. फोडणीत काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, तमालपत्र घालाकाजूचे तुकडे आणि कढीपत्ता घाला.

. फ्लॉवरचे तुरे घालून २ मिनिटं परतून घ्या.

. तांदूळ घालून ढवळून घ्या आणि तांदूळ सुके होईपर्यंत मिश्रण मंद आचेवर परतून घ्या. एका गॅसवर अडीच कप पाणी गरम करायला ठेवा.

. तांदूळ सुके झाले की त्यात उकळतं पाणी घाला.

. मीठ, लाल तिखट, लिंबाचा रस आणि गोडा मसाला घालून ढवळून घ्या.

. झाकण ठेवून मंद आचेवर भात शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळा.

१०. भात शिजला की त्यात नारळ, कोथींबीर घालून ढवळून घ्या.

११. शेवटी साजूक तूप घालून हलकेच ढवळा आणि गॅस बंद करा.

१२. गरम गरम मसाले भात कढी आणि पापड / भज्यांसोबत खायला द्या.

टीप

. तुमच्याकडे राईस कुकर असेल तर वर दिलेल्या ८ व्या स्टेप नंतर मिश्रण राईस कुकर मध्ये काढा. त्यात नारळ, कोथिंबीर घाला. एकदा ढवळून राईस कुकरमध्ये भात शिजवून घ्या. नंतर साजूक तूप घालून हलकेच ढवळा.

Masale Bhaat (मसाले भात)
Masale Bhaat (मसाले भात)
Masale Bhaat (मसाले भात)
Masale Bhaat (मसाले भात)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes