Rasmalai (रसमलाई) – Cottage Cheese Balls in Sweetened Milk – All time favorite Bengali sweet without artificial colour

Rasmalai (रसमलाई) - Cottage Cheese Balls in Sweetened Milk
Rasmalai (रसमलाई) - Cottage Cheese Balls in Sweetened Milk

Rasmalai (रसमलाई) Cottage Cheese Balls in Sweetened Milk – All time favorite Bengali sweet without artificial colour

रसमलाई लोकप्रिय बंगाली पदार्थ – मराठी

Rasagulla is a popular Bengali sweet. It is made from cottage cheese (Paneer). There are many Bengali Sweets made from Rasagulla. Once you master the recipe of Rasgulla, all these sweets are very easy. Rasmalai is one such most popular sweet where Rasgulla are dipped in Sweetened Milk. It’s a mild sweet but super delicious dessert.

I don’t use artificial food colours in my recipes. For Rasmalai also I use only Saffron and Cardamom for Colour and Aroma.

Ingredients (for 13-15 medium size Rasmalai) (1 cup = 250 ml)

For Rasgulla

Cow Milk 1 litre

Lemon juice/ White Vinegar 2 teaspoon mixed with 2 tablespoon water
Sugar 2 cups

Powdered Sugar 2 teaspoon

Water 6 cups

Ice Cubes 10-12

For Sweetened Milk

Full fat milk ½ litre

Sugar ½ cup

Saffron 2 pinch soaked in hot milk

Cardamom Powder 2 pinch

Chopped Dry fruits 1-2 teaspoons

Instructions

1. For Rasgulla Boil Cow milk. Slowly Add lemon juice/vinegar mixed with water and stir.

2. If milk does not cuddle, add 1 teaspoon of diluted vinegar (mixed with 2 teaspoon of water).

3. Pour cuddled milk on a muslin cloth. Pour fresh water on it to remove sourness. Press the cloth to remove all water from cottage cheese (Paneer). Hang the pouch for 30 minutes so that the water is fully removed.

4. While you wait for the Cottage cheese to be ready, make sweetened milk. For this, in a pan, boil Full Fat milk. Add sugar and stir till sugar is dissolved. Add saffron, cardamom powder and boil for 2-3 minutes. Sweetened milk should not be thick. Switch off the gas and let it cool.

5. Transfer Cottage Cheese to a grinder, add 2 teaspoon of powdered sugar and grind in pulse mode for a few seconds till you get a soft dough of Cottage Cheese.

6. Knead the mixture and Make small smooth balls and press them gently to make small discs.

7. In a pan add 2 cups of sugar and 6 cups of water. Boil the syrup for 2 minutes.

8. Slowly drop Cottage Cheese in the syrup. Cook for 15 minutes on high flame. Switch off the gas.

9. We have to cool the Rasgullas now. For this, add 10-12 ice cubes in a bowl. Transfer 3-4 ladle full of sugar syrup from Rasgulla pan to this bowl. Gently transfer Rasgullas to this bowl. And rest it for 30 minutes.

10. By now, sweetened milk also would have come to room temperature. Squeeze each Rasgulla to remove sugar syrup and slowly drop it in the sweetened milk. This way, transfer all Rasgullas to Sweetened milk. Garmish with dry fruits. Rasmalai is ready.

11. Keep it in refrigerator at least for 6 hours and serve chilled.

12. Rasmalai can stored in refrigerator for 2-3 days.

Rasmalai (रसमलाई) - Cottage Cheese Balls in Sweetened Milk
Rasmalai (रसमलाई) – Cottage Cheese Balls in Sweetened Milk
Rasmalai (रसमलाई) - Cottage Cheese Balls in Sweetened Milk
Rasmalai (रसमलाई) – Cottage Cheese Balls in Sweetened Milk

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

रसमलाई लोकप्रिय स्वादिष्ट बंगाली मिठाई कृत्रिम रंग न घालता

रसगुल्ला ही एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट बंगाली मिठाई आहे. रसगुल्ल्यापासून आणखी बऱ्याच प्रकारच्या मिठाया केल्या जातात. एकदा रसगुल्ला करता यायला लागला की ह्या मिठाया सोप्या असतात. रसमलाई ही अशीच एक मिठाई आहे. साधारणपणे रसगुल्ले न आवडणाऱ्या लोकांना सुद्धा रसमलाई आवडतेसोप्या भाषेत सांगायचं तर रसगुल्ले गोड दुधात बुडवले की रसमलाई होते. पण त्यासाठी रसगुल्ले छान नरम व्हायला हवेत तरच त्यात गोड दूध शोषलं जाईल नाहीतर रसमलाई खायला मजा येणार नाही.

मी पदार्थात कृत्रिम रंग वापरत नाही. रसमलाईत सुद्धा स्वाद आणि रंगासाठी फक्त केशर आणि वेलची घालते. रसमलाई अतिशय स्वादिष्ट होते.

साहित्य (१३१५ मध्यम आकाराच्या रसमलाई साठी) (१ कप = २५० मिली)

रसगुल्ल्यांसाठी

गाईचं दूध १ लिटर

लिंबाचा रस / सफेद व्हिनेगर २ टेबलस्पून + २ टेबलस्पून पाणी

साखर २ कप

पिठीसाखर २ टीस्पून

पाणी ६ कप

बर्फाचे खडे १०१२

गोड दुधासाठी

म्हशीचं दूध अर्धा लिटर

साखर अर्धा कप

केशर २ चिमूट (गरम दुधात भिजवून)

वेलची पावडर २ चिमूट

सुका मेवा (बारीक तुकडे) २ टीस्पून

कृती

. रसगुल्ल्यांसाठी गाईचं दूध गरम करायला ठेवा. दूध उकळलं कि त्यात पाणी घातलेला लिंबाचा रस/ व्हिनेगर घाला आणि ढवळा. दूध फाटेल. दूध फाटलं नाही तर १ टीस्पून व्हिनेगर मध्ये २ टीस्पून पाणी घालून मिश्रण ढवळून घ्या आणि ते दुधात घाला. दूध फाटलं की गॅस बंद करा.

. फाटलेलं दूध मलमलच्या कपड्याने गाळून घ्या. वेगळं झालेल्या पनीरवर पाणी घाला म्हणजे पनीर चा आंबटपणा निघून जाईल.

. पनीर हलकेच दाबून पाणी काढून टाका.पनीरची पोटली बांधून अर्धा तास टांगून ठेवा म्हणजे सगळं पाणी निघून जाईल.

. पनीर तयार होतंय तोपर्यंत गोड दूध करून घेऊया. त्यासाठी एका कढईत म्हशीचं दूध गरम करा. उकळी आली की साखर घालून ढवळा. साखर विरघळली की दुधात भिजवलेलं केशर आणि वेलची पावडर घाला. दूध २३ मिनिटं उकळवा. हे दूध दाट नसतं. गॅस बंद करून दूध गार करायला ठेवा.

. मिक्सरच्या भांड्यामधे पनीर आणि पिठीसाखर घाला. मिक्सर पल्स मोड वर ७८ सेकंद फिरवा. पनीर नरम व्हायला हवं. नसेल तर अजून काही सेकंद मिक्सर फिरवा.

. पनीर ताटलीत काढून जरा मळून घ्या आणि छोटे गोळे करा. गोळे हातावर हलकेच दाबून गोल चकत्या करा.

. साखरेच्या पाकासाठी एका पातेल्यात २ कप साखर साखर आणि ६ कप पाणी घालून मिश्रण २ मिनिटं उकळा. हा साखरेचा कच्चा पाक आहे.

. पनीरच्या तयार चकत्या साखरेच्या पाकात सोडा आणि १५ मिनिटं मोठ्या आचेवर पाक उकळा. चकत्या आकाराने दुप्पट होतील. गॅस बंद करा. रसगुल्ले तयार झाले.

.रसगुल्ले गार करण्यासाठी, एका वाडग्यात बर्फाचे खडे आणि ४५ डाव रसगुल्ल्याचा पाक घाला. हलक्या हाताने रसगुल्ले ह्या वाडग्यात घाला आणि अर्धा तास ठेवून द्या.

१०.गोड दूध आता गार झालं असेल. एक एक रसगुल्ला हाताने हलकेच पिळून घ्या आणि गोड दुधात सोडा. सगळे रसगुल्ले गोड दुधात घातल्यावर वरून सुक्या मेव्याचे तुकडे घाला. आणि वाडगा फ्रिजमध्ये ठेवा. ६ तासानंतर थंडगार नरम स्वादिष्ट रसमलाई खायला तयार आहे.

Rasmalai (रसमलाई) - Cottage Cheese Balls in Sweetened Milk
Rasmalai (रसमलाई) – Cottage Cheese Balls in Sweetened Milk
Rasmalai (रसमलाई) - Cottage Cheese Balls in Sweetened Milk
Rasmalai (रसमलाई) – Cottage Cheese Balls in Sweetened Milk

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes