Kanda Patiche Tonak ( कांदा पातीचे तोणाक) – Spicy Curry with Spring Onions – A Goan Specialty
कांदा पातीचे तोणाक – गोव्याची खास रेसिपी मराठी
Tonak (तोणाक) is any coconut based vegetarian spicy gravy. People relish this Tonak with Pav. Along with coconut, it uses different spices. Every family has their own recipe of this Tonak. This is my Mother-in-law’s recipe. This recipe uses Spring Onion and Split Chickpeas. This is one of the favorites for most Goans in vegetarian curries. Try it out.
Ingredients (serves 4) (1 cup = 250 ml)
Finely chopped Spring Onions 2 cups (Greens and bulbs)
Split Chickpeas (Chana Daal) 2 tablespoon
One Small onion sliced
Fresh Scraped Coconut ½ cup
Coriander seeds 1.5 teaspoon
Black pepper 4
Cloves 3
Red chili powder ¼ to ½ teaspoon
Turmeric powder ½ teaspoon
Jaggery ½ teaspoon
Tamarind ½ teaspoon ball
Salt to taste
Oil 1 teaspoon
Instructions
1. Soak Split Chickpeas in water for 4 hours.
2. Add ½ teaspoon oil in a wok. Roast Coriander Seeds,Black Pepper, Cloves together for 2 minutes. Take it out in a plate.
3. Add remaining oil and Onions to the wok. Saute for 3-4 minutes.
4. Add Coconut, saute till onions are translucent.
5. Add Chili Powder, Turmeric Powder and mix.
6. Upon cooling, transfer the roasted mixture to a grinder. Add roasted spices. Add Tamarind. Grind into a smooth paste. Add little water if required.
7. In a pan add 1.5 cup of water and boil it. Add soaked Split Chickpeas and cook on medium flame till chickpeas are half cooked.
8. Add chopped spring Onions. Cook covered till Spring Onions are cooked. Add some water if required.
9. Add ground mixture, salt and Jaggery.
10. Bring the mixture to boil.
11. Adjust consistency by adding / reducing water.
12. Serve hot with Pav / Bread / Roti / Rice.
==================================================================================
कांदा पातीचे तोणाक- गोव्याची खास रेसिपी
तोणाक म्हणजे नारळ घालून केलेली शाकाहारी मसालेदार रस्साभाजी. गोव्यात हे तोणाक पावासोबत खातात. नारळासोबत ह्या रश्श्यात वेगवेगळे मसाले घातले जातात. हे तोणाक करण्याची प्रत्येक कुटुंबाची एक खास रेसिपी असते. ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. हे तोणाक कांद्याच्या पातीचे आहे. चणा डाळ घालून केलेलं हे तोणाक हा गोवेकरांच्या आवडीचा शिवराक (शाकाहारी) पदार्थ आहे. एक वेगळा प्रकार म्हणून नक्की करून बघा.
साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)
बारीक चिरलेली कांद्याची पात २ कप (पातीसोबत कांदेही चिरून घ्या)
चणा डाळ २ टेबलस्पून
कांदा १ मध्यम उभ्या काचऱ्या चिरून
ताजा खवलेला नारळ अर्धा कप
धने दीड टीस्पून
काळी मिरी ४
लवंग ३
लाल तिखट पाव ते अर्धा टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
चिरलेला गूळ अर्धा टीस्पून
चिंच अर्धा टीस्पून गोळा
मीठ चवीनुसार
तेल १ टीस्पून
कृती
१. चणा डाळ धुवून ४ तास पाण्यात भिजवून ठेवा.
२. एका कढईत अर्धा टीस्पून तेल घालून त्यात धने, काळी मिरी, लवंग घालून मंद गॅसवर एकत्र २ मिनिटं भाजा. एका ताटलीत काढून घ्या.
३. त्याच कढईत उरलेलं तेल आणि कांदे घाला. मंद आचेवर ३–४ मिनिटं परता.
४. खवलेला नारळ घालून मिश्रण कांदा पारदर्शक होईपर्यंत परता.
५. लाल तिखट आणि हळद घालून ढवळून घ्या.
६. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात भाजलेले मसाले घाला. चिंच घाला आणि थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्या.
७. कढईत दीड कप पाणी गरम करून त्यात चणा डाळ घालून अर्धवट शिजवून घ्या.
८. त्याच कढईत कांद्याची पात घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.
९. कांद्याची पात शिजली की वाटलेला मसाला कढईत घाला. मीठ आणि गूळ घाला आणि मिश्रणाला उकळी काढा.
१०. रस्सा दाट / पातळ हवा असेल त्यानुसार पाणी घाला / आटवा.
११. चवदार तोणाक पाव / भाकरी / वडे / पोळीसोबत खायला द्या.
मस्त रेसिपी आहे.
Thank you.
Sudha