Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) – Potato Stuffed Paratha – All time favorite

Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) - Potato Stuffed Paratha
Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) - Potato Stuffed Paratha

Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) – Potato Stuffed Paratha – All time favorite

आलू पराठा / बटाट्याचा पराठा मराठी

Alu Paratha is one of the most popular breakfast / any time snack in India. It’s very tasty and quite filling. Also one can relish it along with pickle, chutney or butter. So no need to cook a subji with it. The process is little lengthy but the end product justifies all the hard work. Some like less filling in the Paratha whereas some like it more. We like more filling and less of wheat flour. I bind soft dough for the cover. This is why the Paratha is very soft and more tasty.

The only tricky part is what to do if the Potatoes are sticky. Please read the recipe below to figure out how to handle this situation.

Ingredients (Makes 9-10 Parathas) (1 cup = 250 ml)

For Filling

Medium size Potatoes 10

Onions Medium size 2 finely chopped

Crushed / Finely chopped Green Chilies 3-4

Crushed Ginger ½ teaspoon

Mango Powder ½ teaspoon

Coriander Powder ½ teaspoon

Cumin Powder ½ teaspoon

Chopped Coriander 2 tablespoon

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to Taste

Oil 1 teaspoon

For Cover

Wheat Flour 2 cups

Salt 2 pinches

Oil 1 teaspoon

Wheat flour for dusting while rolling Parathas

Oil/ Ghee (Clarified Butter) for Pan Frying Parathas

Instructions

1. Add salt and 1 teaspoon oil to wheat flour. Add water gradually and bind a soft dough. Knead for 5 minutes and keep it covered for 30 minutes.

2. Boil Potatoes. Upon cooling Peel and grate Potatoes.

3. In a pan, heat 1 teaspoon oil. Add chopped Onions and saute on low flame till onions are translucent. Add Turmeric Powder. Mix.

4. Add crushed Ginger, saute for 2 minutes.

5. Add Grated Potatoes, Cumin Powder, Coriander powder, Mango Powder, Green Chilies and Salt. Mix well and keep Sauteing till mixture is dry.

6. Sometimes Potatoes are sticky and the mixture does not dry. In such a case, take out the mixture into a plate and leave it to cool. Grind 1 cup of thick Poha (Flattened rice) or 2 cups Kurmura (Puffed Rice) into a fine powder and gradually mix it into the Potato mixture. Add some more Poha if the mixture is still moist. Adjust the taste by adding more spices.

7. Mix chopped coriander in the mixture. The filling is ready.

For Rolling Parathas

1. Knead the dough for 3-4 minutes. Make big lemon size balls of the dough. Make sure the filling is at room temperature.

2. Roll the dough ball into 4-5 inches diameter circle.

3. Take similar size filling ball. Place it on the dough circle.

4. Gather the dough to make pleats, gently pull them together and seal the edges.

5. Dust the filled dough ball with dry wheat flour, gently pat it to make a circle 4-5 inches in diameter.

6. Now with the help of rolling pin, gently roll the dough ball into a medium thick circle (Paratha). Keep the sealed side facing the rolling board. Use dry wheat flour for dusting.

7. Heat a non stick/ Iron Griddle. Transfer the Paratha onto hot Griddle.

8. Roast it on medium flame for 2-3 minutes.

9. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast for 2-3 minutes.

10. Flip the Paratha and drop some oil / ghee on the Paratha; spread it. Roast till Paratha is nicely roasted and gets light brown colour on both sides.

11. Serve Hot Paratha with Chutney / Pickle / Butter / Curd / Yogurt.

Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) - Potato Stuffed Paratha
Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) – Potato Stuffed Paratha
Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) - Potato Stuffed Paratha
Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) – Potato Stuffed Paratha

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

आलू पराठा / बटाट्याचा पराठा

आलू पराठा / बटाट्याचा पराठा हा सगळ्यांना कधीही खायला आवडणारा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्याला, संध्याकाळी चहासोबत किंवा जेवणात सुद्धा तितक्याच आवडीनं खाल्ला जातो. कृती जरा वेळकाढू आहे पण छान लुसलुशीत पराठा खमंग भाजून तयार झाला की सगळ्या मेहनतीचं चीज होतं. काहीजणांना जाड पारीचा पराठा आवडतो तर काहींना पातळ पारीचा. आम्हाला पातळ पारीचा, भरपूर सारण घातलेला, कणकेची चव न येणारा मऊ लुसलुशीत पराठा आवडतो.

ह्यात कधी कधी एकच त्रासदायक भाग येतो जेव्हा सारणाचे बटाटे चिकट निघतात. पण माझ्याकडे त्याचंही उत्तर आहे. रेसिपी पूर्ण वाचा म्हणजे कळेल हा प्रश्न कसा सोडवायचा ते.

साहित्य ( १० पराठ्यांसाठी) (१ कप = २५० मिली )

सारणासाठी

मध्यम आकाराचे बटाटे १०

मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून

ठेचलेल्या / बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

ठेचलेलं आलं अर्धा चमचा

जिरं पावडर अर्धा चमचा

धने पावडर अर्धा चमचा

आमचूर अर्धा चमचा

बारीक चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

हळद अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल १ टीस्पून

आवरणासाठी

कणिक २ कप

मीठ २ चिमूट

तेल १ चमचा

कणिक पराठे लाटताना लावण्यासाठी

तेल / तूप पराठे भाजताना लावण्यासाठी

कृती

. कणकेत मीठ आणि १ चमचा तेल घालून सैलसर पीठ भिजवून घ्या. पीठ ५ मिनिटं मळून अर्धा तास झाकून ठेवा.

. बटाटे उकडून घ्या. गार झाले की सोलून किसून घ्या.

. एका कढईत टीस्पून तेल गरम करा. त्या चिरलेला कांदा घालून मंद आचेवर कांदा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्या. त्यात हळद घालून मिक्स करा.

. आलं घालून २ मिनिटं परता.

. कढईत किसलेले बटाटे, धने जिरे पावडर, आमचूर, हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. मंद आचेवर मिश्रण सुकं होईपर्यंत परता.

. कधी कधी बटाटे चिकट असतात आणि मिश्रण सुकत नाही. अशा वेळी मिश्रण ताटलीत घालून गार करा१ कप जाडे पोहे किंवा २ कप कुरमुरे मिक्सरमध्ये बारीक करून बटाट्याच्या मिश्रणात घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण अजूनही सुकलं नसेल तर आणखी पोहे / कुरमुरे घाला. चव बघून तिखट मीठ घाला.

. चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करा.

पराठे बनवण्यासाठी

. भिजवलेली कणिक छान मळून घ्या आणि त्याचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करा. सारण गार करून घ्या.

. पिठाची पुरी लाटून त्यावर कणकेच्या गोळ्याएवढा सारणाचा गोळा ठेवा.

. सारण मधे  ठेवून पिठाच्या चुण्या घालत गोळा बंद करा. गोळ्याच्या वरचं ज्यादा पीठ गोळ्यावर दाबून टाका.

. भरलेल्या गोळ्याला दोन्ही बाजूनी थोडं सुकं पीठ लावून हाताने थापून पुरी बनवा म्हणजे सारण नीट पसरलं जाईल.

. आता गोळा बंद केलेली बाजू पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने जरा जाडसर पराठा लाटून घ्या. हवे असेल तर लाटताना सुकं पीठ लावा.

. नॉन स्टिक/ लोखंडी तवा गरम करून त्यावर पराठा घाला. मध्यम गॅस वर मिनिटं भाजून पराठा पलटून घ्या. पराठ्यावर थोडं तेल / तूप घाला आणि पसरून घ्या.

. मिनिटांनी परत एकदा पलटून दुसऱ्या बाजूवर तेल / तूप घाला.

. पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाजला की गरमागरम पराठा लोणचं / चटणी / लोणी /दह्यासोबत खायला द्या.

Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) - Potato Stuffed Paratha
Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) – Potato Stuffed Paratha
Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) - Potato Stuffed Paratha
Alu Paratha (आलू पराठा / बटाट्याचा पराठा ) – Potato Stuffed Paratha

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes