Beet Root Tomato Soup (बीट रूट टोमॅटो सूप) – A Tasty and Healthy Soup with No Corn Starch
Tomato is a favorite candidate for making Soup. But instead of using only Tomato, when you add some Beet Root to it, it makes a super healthy, tasty and thick soup with vibrant colour. No corn starch (corn flour) is added in this soup. It’s an easy recipe to make a delicious soup.
Ingredients (Serves 4-5)
Beet Root 1 medium
Tomatoes 4 medium
Cloves 2
Black Pepper Powder to taste
Sugar 1 teaspoon (adjust as per taste)
Salt to taste
Instructions
1. Wash and chop Beet Root and Tomatoes in 2 halves. Transfer all to a pan, add 2 cloves, add 2 tablespoon of water and pressure cook till properly cook. I turn the gas flame to simmer after 1 whistle and cook for 15 minutes. Beet Root takes long to cook.
2. Allow Beet Root and Tomatoes to cool. Once it comes to room temperature, remove the cloves. Peel Beet Root and Tomatoes.
3. Roughly chop Beet root and transfer it to a blender. Add tomatoes to the blender and blend into a smooth paste. Add little water if required.
4. Transfer the paste to a pan. Add sugar, salt and black pepper powder and boil the mixture for 5 minutes. Add water as per required consistency.
5. Delicious, thick Beet Root and Tomato soup is ready. Serve hot.
==================================================================================
बीट रूट टोमॅटो सूप – चविष्ट आणि पौष्टिक सूप- कॉर्न फ्लोअर न घालता
टोमॅटोचं सूप खूप लोकप्रिय आहे. पण टोमॅटोसोबत बीट रूट घालून सूप केलं की ते जास्त पौष्टिक, चविष्ट आणि दाट होतं. ह्यात कॉर्न फ्लोअर घातलेलं नाही. बीट रूट मुळे सुपाला रंग ही छान येतो. रेसिपी अगदी सोपी आहे.
साहित्य (४–५ जणांसाठी)
बीट रूट १ मध्यम
टोमॅटो ४ मध्यम
लवंग २
काळी मिरी पावडर चवीनुसार
साखर १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
मीठ चवीनुसार
कृती
१. बीट रूट आणि टोमॅटो धुवून त्यांचे २–२ तुकडे करा आणि प्रेशर कुकर च्या भांड्यात ठेवा. भांड्यात २ लवंगा घाला आणि २ टेबलस्पून पाणी घाला. बीट रूट शिजेपर्यंत प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. बीट रूट शिजायला वेळ लागतो. मी कुकरची १ शिटी झाल्यावर गॅस बारीक करून १५ मिनिटं शिजवते.
२. बीट रूट, टोमॅटो गार झाल्यावर सोलून घ्या. लवंग काढून टाका.
३. बीट रूटचे मध्यम आकाराचे तुकडे करून बीट रूट आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्या. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.
४. वाटलेलं मिश्रण एका पातेल्यात काढून घ्या. त्यात साखर, मीठ आणि मिरी पावडर घालून ५ मिनिटं उकळून घ्या. सूप पातळ हवं असेल तर उकळताना पाणी घाला.
५. बीट रूट आणि टोमॅटोचं स्वादिष्ट सूप तयार आहे. गरम गरम सूप सर्व्ह करा.
Your comments / feedback will help improve the recipes