Neer Phanasachi Bhaaji (नीर फणसाची भाजी (काचऱ्या)) – Breadfruit Dry Subji – No Onion Garlic recipe
नीर फणसाची भाजी (काचऱ्या) मराठी
This is a Konkani style Subji using Neer Phanas (Breadfruit). Neer Phanas / Breadfruit is popular in Goa / Konkan. It is generally available around April / May. Neer Phanas Phodi / Kaap is a popular side dish in these regions. Other way to use Neer Phanas to make subji. This subji does not use Onion and Garlic and yet it is tasty. Recipe is similar to Batatyachya Kacharya (Subji using raw Potato slices). This is a very easy recipe and does not require too many ingredients. You can cook this subji using Coconut Oil also.
Ingredients (Serves 4)
Raw Neer Phanas (Bread Fruit) About half of a medium size fruit
Green Chilies 3-4 with a slit lengthwise
Curry leaves 7-8 (optional)
Fresh Scraped coconut 2 tablespoon
Chopped coriander 1 tablespoon
Lemon Juice ½ teaspoon / Dry Mango Powder (Aamchur) ¼ teaspoon
Sugar ½ teaspoon (adjust as per taste)
Salt to taste
For Tempering / Tadka
Oil 1 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida (Hing) 2 pinch
Instructions
1. Wash Neer Phanas. Cut into 4 halves. Remove the skin and the spongy middle portion.
2. Chop Neer Phanas into thin medium/ small size slices about 2-3 mm thick. Any shape is fine. Dip the pieces in water for 1 hour.
3. In a wok, heat oil on medium heat. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter.
4. Add Asafoetida, chilies, and curry leaves. (I always make small pieces of curry leaves so that one can easily eat them).
5. Add Neer Phanas slices (do not add water) and turmeric powder. Mix.
6. Saute for 2-3 minutes. Cook covered till Neer Phanas is soft. Regularly stir the subji. If Subji is too dry, sprinkle little water and then cook.
7. Add Sugar, Salt, Lemon juice / Aamchur, Scraped coconut, chopped coriander and mix.
8. Cook for 2 minutes. Tasty Neer Phanas Bhaaji are ready.
9. Serve hot with Puri or Roti (Indian Bread) or Curd Rice.
==================================================================================
नीर फणसाची भाजी (काचऱ्या) – खास कोकणी भाजी – कांदा लसूण विरहित
नीर फणस कोकण / गोव्यात मिळतो. ह्याच्या फोडी / काप हा सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. नीर फणसाची भाजीही छान होते. कच्च्या बटाट्याच्या काचऱ्यांसारखी कांदा लसूण न घालता केलेली ही भाजी अतिशय चविष्ट होते. साधी सोपी रेसिपी आणि साहित्य नेहमीचंच. ही भाजी कशाही सोबत छान लागते. ही भाजी खोबरेल तेलातही करू शकता.
साहित्य (४ जणांसाठी)
नीर फणस – मध्यम आकाराचा अर्धा फणस
हिरव्या मिरच्या उभ्या मधे कापून ३–४
कढीपत्ता ७–८ पानं (ऐच्छिक)
ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
लिंबाचा रस अर्धा टीस्पून/ आमचूर पाव टीस्पून
साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग २ चिमूट
हळद अर्धा टीस्पून
कृती
१. नीर फणस धुवून त्याचे ४ तुकडे करा. साल आणि मधला मऊ भाग काढून टाका. फणसाच्या २–३ मिमी जाडीच्या मध्यम / लहान आकाराच्या पातळ काचऱ्या (slices) करा. कोणत्याही आकाराच्या काचऱ्या चालतात.
२. फणसाच्या काचऱ्या १ तास पाण्यात बुडवून ठेवा.
३. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा. त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. मी कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून घालते म्हणजे खाल्ले जातात.
४. फणसाच्या काचऱ्या कढईत घाला. पाणी घालू नका. हळद घाला आणि २–३ मिनिटं परतून घ्या.
५. आता झाकण ठेवून वाफेवर फणस मऊ होईपर्यंत शिजवा. मधे मधे भाजी ढवळा. फार सुकी असेल तर थोडं पाणी शिंपडा.
६. आता मीठ, साखर, लिंबाचा रस / आमचूर, नारळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. २ मिनिटं शिजवा.
७. नीर फणसाच्या चविष्ट काचऱ्या तयार आहेत. गरम काचऱ्या पोळी / भाकरी किंवा दही भातासोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes