Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा – पारंपरिक खमण ढोकळा) – Popular Gujarati Snack

Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा - पारंपरिक खमण ढोकळा)
Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा - पारंपरिक खमण ढोकळा)

Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा पारंपरिक खमण ढोकळा) – Popular Gujarati Snack

वाटी दाल ना खमण ढोकळा / पारंपरिक खमण ढोकळा मराठी

Way back in 1970, when we shifted to Malad, there were only few shops that used to sell snacks. Malad being Gujarati dominated suburb, these shops used to sell Gujarati snacks like Khaman Dhokla, Moongdal Gota, Fafda etc. The Khaman Dhokla shop was a family owned shop and the family used to live behind the shop. It sold only traditional Khaman Dhokla made from Split Pigeon Peas (Chana Daal) with just two variations – One without Tempering (Rs 3 per kg) and other with Tempering (Rs 4 per kg). We used to buy the one without tempering and add tempering, scraped coconut and coriander at home. Because home made tempering and scraped coconut used to taste better than grated coconut. That shop still sells Traditional Khaman Dhokla but now with hundreds of other snacks and sweets.

This is the traditional recipe of Khaman Dhokla using Chana Daal. This requires soaking, grinding of Chana Daal and fermentation of batter. It has a different taste. It’s not sweet like Instant Khaman Dhokla made using Gram Flour. But it’s very yummy.

Ingredients (1 cup = 250 ml) (serves 4)

Split Pigeon Peas (Chana Daal) 1 cup

Ginger Chili paste 1.5 teaspoon

Turmeric Powder ¼ to ½ teaspoon

Eno or fruit salt 1 teaspoon or Baking Soda ¼ teaspoon

Curd 2 tablespoons or buttermilk ½ to ¾ cup

Oil 1 teaspoon

Salt to taste

For tempering

Oil 2 teaspoon

Mustard seeds ¼ teaspoon

Cumin seeds ¼ teaspoon (optional)

Asafoetida a pinch

for Garnish

chopped coriander 2 teaspoon

fresh scraped grated coconut 2 teaspoon (optional)

Instructions

1. Wash and soak Chana Daal in water for 5-6 hours.

2. Drain water and grind Chana Daal into a coarse mixture.

3. Add curd or buttermilk. Get consistency of Idli batter (add water if required) and keep covered for 4-6 hours to ferment.

4. Add Ginger Chili paste, salt, turmeric powder, oil and mix well.

5. Heat water in Idli / Dhokla pan. Grease Dhokla plates with oil.

6. Add Eno fruit salt / Baking Soda to the batter, add a teaspoon of water and quickly mix in one direction for 30-40 seconds. Don’t over-mix.

7. Quickly pour the batter in greased Dhokla plates and steam covered for 20-25 minutes. It is most important that you start steaming the batter soon after adding Eno / Baking Soda to it. If there is a delay in steaming, Dhokla won’t be soft and fluffy. If you don’t have big enough plate(s) to steam all the batter together, then take out batter sufficient for your plate(s) in a small bowl, mix Eno / Baking Soda and steam Dhokla. Repeat this step for remaining batter.

8. Once cooked, take out the plates from Dhokla pan and allow to cool. Using a knife cut pieces in desired shapes.

9. For tempering, heat oil in a ladle. Add mustard seeds; wait for splutter. Add cumin seeds; wait for splutter. Add Asafoetida. Switch off the gas.

10. Spread Fresh scraped coconut, chopped coriander and Tempering on Dhokla plates and serve Dhokla with Chutney of your choice or tomato sauce.

Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा - पारंपरिक खमण ढोकळा)
Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा – पारंपरिक खमण ढोकळा)
Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा - पारंपरिक खमण ढोकळा)
Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा – पारंपरिक खमण ढोकळा)

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

वाटी दाल ना खमण ढोकळा पारंपरिक खमण ढोकळा

१९७० मध्ये जेव्हा आम्ही मालाडला राहायला आलो तेव्हा तिथे तयार पदार्थ विकणारी काही ठराविक दुकानंच होती. बहुसंख्य गुजराती लोक असल्यामुळे ह्या दुकानात  गुजराती पदार्थच मिळत असत खमण ढोकळा, मूगडाळ गोटा, फाफडा वगैरे. खमण ढोकळा मिळायचा ते दुकान एक कुटुंब चालवायचं. गाळ्यात पुढे दुकान आणि पाठीमागे ते कुटुंब राहायचं. तिथे फक्त पारंपरिक खमण ढोकळा मिळायचा. २ प्रकारचा –  साधा (फोडणीशिवाय) ३ रु /किलो आणि वघारेला (फोडणी दिलेला) ४ रु / किलो. अतिशय चविष्ट असायचा ढोकळाआम्ही नेहमी साधा ढोकळा आणून त्याला घरी फोडणी द्यायचो. दुकानातली फोडणी आणि किसलेला नारळ आम्हाला आवडत नसेआईने केलेली खमंग फोडणी आणि ताजा खवलेला नारळ, कोथिंबीर घालून तो ढोकळा आणखीनच चवदार लागायचा. आता लिहिताना ही तोंडाला पाणी सुटतंय.

ते दुकान अजूनही मालाडमध्ये आहे. मूळ मालकाचा मुलगा / नातू चालवतो. हा पारंपरिक ढोकळा अजूनही तिथे मिळतो. पण त्यासोबत अनेक दुसरे पदार्थ आणि मिठाया ही मिळतात. आता  ते फरसाण आणि स्वीट शॉप झालंय.

हल्ली आपण वेगवेगळ्या डाळी घालून ढोकळा करतो पण ह्या पारंपरिक खमण ढोकळ्यात फक्त चणा डाळ घालतात. डाळ भिजवून, वाटून, आंबवून ढोकळा करतात. फार चविष्ट लागतो. ह्यात साखर अजिबात नसते. हल्ली मिळणाऱ्या इन्स्टंट बेसनाच्या ढोकळ्यासारखा गोड आणि पाणीदार ही नसतो. हलका असतो पण spongy  नसतो. मला तर हा पारंपरिक ढोकळा फार आवडतो.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

चणा डाळ १ कप

वाटलेली आलं मिरची दीड टीस्पून

हळद पाव अर्धा टीस्पून

इनो फ्रुट सॉल्ट १ टीस्पून किंवा बेकिंग सोडा पाव टीस्पून

दही २ टेबलस्पून किंवा ताक अर्धा पाऊण कप

तेल १ टीस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल २ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून (ऐच्छिक)

हिंग १ चिमूट

सजावटीसाठी

बारीक चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून

ताजा खवलेला नारळ २ टीस्पून

कृती

. चणा डाळ धुवून घ्या आणि ५६ तास पाण्यात धिजवून ठेवा.

. पाणी निथळून घ्या. मिक्सरमध्ये चणा डाळ जाडसर वाटून घ्या.

. वाटलेल्या डाळीत दही / ताक घालून मिश्रण इडलीच्या पिठाएवढं दाट करा आणि ४६ तास झाकून ठेवा.

. मिश्रणात वाटलेलं आलं मिरची, हळद, मीठ आणि तेल घालून मिश्रण एकजीव करा.

. इडली / ढोकळ्याच्या भांड्यात पाणी घालून गरम करायला ठेवा. ढोकळ्याच्या ताटल्यांना तेल लावून घ्या.

. पाणी उकळलं की डाळीच्या मिश्रणात इनो / सोडा घालून, १ टीस्पून पाणी घालून लगेच ३०४० सेकंद एका दिशेने फिरवून घ्या. जास्त ढवळू नका.

. लगेच अजिबात वेळ न घालवता मिश्रण ढोकळ्याच्या ताटल्यांमध्ये ओता आणि वाफवायला ठेवा. कृतीची आधीची आणि ही पायरी खूप महत्वाची आहे. ह्यात चूक झाली तर ढोकळा फुलणार नाही आणि हलका होणार नाही.

. तुम्हाला सगळं ढोकळा एकदम वाफवता येणार नसेल तर हवं तेव्हढं मिश्रण दुसऱ्या वाडग्यात काढून त्यात इनो / सोडा घालून वाफवून घ्या आणि बाकीच्या मिश्रणासाठी हीच कृती परत करा.

. ढोकळा वाफवायला २०२५ मिनिटं लागतात. ढोकळा झाला की तो जरा गार करत ठेवा. गार झाल्यावर सुरीने तुकडे करा.

१०. छोट्या कढल्यामध्ये तेल घालून मोहरी, जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करा.

११. ढोकळ्यावर ताजा खवलेला नारळ, कोथिंबीर पसरून घ्या. तयार फोडणी नीट पसरून घाला.

१२. चवदार खमण ढोकळा तुमच्या आवडीच्या चटणी / टोमॅटो सॉस सोबत खायला द्या.

Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा - पारंपरिक खमण ढोकळा)
Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा – पारंपरिक खमण ढोकळा)
Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा - पारंपरिक खमण ढोकळा)
Vati Daal na Khaman Dhokla / Traditional Khaman Dhokla (वाटी दाल ना खमण ढोकळा – पारंपरिक खमण ढोकळा)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes