Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे ) – Goan Specialty Mix Veggies – No Onion Garlic, No Oil Ghee recipe

Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )

Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे ) – Goan Specialty Mix Veggies – No Onion Garlic, No Oil Ghee recipe

खतखते / खदखदे मराठी

In every region in India, there are recipes of Mix Veggies like Rushinchi Bhaji, Bhogichi Bhaaji in Maharashtra, Undhiyo in Gujrat, Avial in Southern states. Khatkhate / Khadkhade is a mixed vegetable of Goa. It’s a simple and easy recipe without using Onion Garlic. You can add vegetables of your choice. Veggies like Radish, Pumpkin, Jackfruit, Carrot, Drumsticks go very well in this recipe. Like most other Goan recipes, this recipe also has coconut. It’s neither a Gravy subji nor a dry subji. Consistency is something in between. Goans relish this with Roti or Rice or as it is. In spite of using minimal spices, it’s very tasty.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Red Pumpkin with skin about 100 grams – chopped into medium size pieces (do not peel)
Raw Jackfruit medium size pieces 1 cup
Radish 1 medium size – chopped into medium size pieces
Split Pigeon Peas (Toor dal)
2 tablespoon
Fresh scraped Coconut
½ cup
Turmeric powder ½ teaspoon
Chili powder ½ teaspoon
Tamarind 1 cm diameter ball
Black pepper 4-5
Jaggery 1-2 teaspoon
Salt to taste

Instructions

1. Wash Toor dal. Transfer it to a pan, add enough water, a pinch of turmeric powder and boil on low flame.
2. When half cooked, add radish. Add water if required.
3. When radish is little soft, add pumpkin, Raw Jackfruit. Add water and cook on low flame till veggies are almost cooked.
4. Grind coconut, turmeric, chili powder, black pepper, tamarind together into a coarse paste.
5. Add salt, Jaggery to cooked veggies. Add coconut paste. Add water to adjust consistency.
6. Boil for 5 minutes till veggies are cooked.

Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )

7. Delicious Khatkhate is ready. Serve hot with Roti / Rice or relish it as it is.

Note

1. Add vegetables of your choice. Make sure you don’t overcook any veggies.

Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

खतखते / खदखदे गोव्याची खास भाजी कांदा लसूण, तेल तूप विरहित

भारतात प्रत्येक प्रांतात मिक्स भाजी केली जाते. महाराष्ट्रात ऋषींची भाजी, भोगीची भाजी, गुजरात मध्ये उंधियो, दक्षिणेकडे अवियल वगैरे. तशीच ही गोव्याकडची मिक्स भाजी आहे. ह्याचं खरं नाव काय आहे काही कल्पना नाही. काही जण खतखते म्हणतात तर काही जण खदखदे!! कोकणी भाषेत असा नावाचा गोंधळ बरेचदा होतो. कोकणी भाषेला लिपी नसल्यामुळे बोली भाषेतले शब्दच सगळ्यांना माहित असतात आणि बोली भाषा दर १२ कोसांवर बदलते. त्यामुळे गोंधळच गोंधळ!!! असो शेवटी नावात काय आहे !!!

तर ही गोव्याकडची मिक्स भाजी तुम्हाला आवडत्या भाज्या घालून करू शकता . कांदा, लसूण, तेल, तूप काहीही न घालता चविष्ट आणि पौष्टिक खतखते / खदखदे करतात. ही रस्सा भाजी नाही आणि सुकी भाजीही नाही. ही भाजी सरबरीत असते (अंगचा रस असलेली). ही पोळी, भातासोबत खातात किंवा असंच खातात. एकदा करून बघा.

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

लाल भोपळा १०० ग्रॅम्स सालासकट चिरलेल्या मध्यम आकाराच्या फोडी

कच्चा फणस मध्यम आकाराच्या फोडी १ कप

मुळा १ मध्यम आकाराचा मध्यम आकाराच्या फोडी करून

तूर डाळ २ टेबलस्पून

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

हळद अर्धा टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

चिंच १ सेमी व्यासाचा गोळा

काळी मिरी ४

चिरलेला गूळ १२ टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. तूर डाळ धुवून घ्या. एका कढईत डाळ, पुरेसं पाणी आणि चिमूटभर हळद घालून मंद आचेवर शिजत ठेवा.

. डाळ अर्धी शिजली की त्यात मुळ्याचे तुकडे घाला. मंद आचेवर शिजवत राहा.

. मुळा थोडा मऊ झाला की त्यात भोपळा आणि कच्चा फणस घाला. जरुरीनुसार पाणी घालून मंद आचेवर शिजवा.

. मिक्सरच्या भांड्यात नारळ, हळद, लाल तिखट, मिरी आणि चिंच घालून, थोडं पाणी घालून जाडसर वाटून घ्या.

. कढईतल्या भाज्या शिजत आल्या की त्यात मीठ, गूळ आणि वाटलेलं नारळाचं मिश्रण घाला. एक उकळी काढा. जरुरीनुसार पाणी घालून ५ मिनिटं शिजवा.

Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )

. चवदार आणि पौष्टिक खतखते / खदखदे तयार आहे. गरमागरम खतखते / खदखदे पोळी / भातासोबत किंवा असंच खायला द्या.

टीप

. ह्यात तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या घालू शकता. फक्त कोणतीही भाजी जास्त शिजणार नाही ह्याची काळजी घ्या.

Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )
Khatkhate / Khadkhade Bhaaji (खतखते / खदखदे )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes