Aathalyanchi Bhaaji (आठळ्यांची भाजी ) – Jackfruit Seeds Subji – No Onion Garlic recipe
Generally Seeds of fruits are discarded. But Jackfruit is an exception. There are different ways to use Jackfruit Seeds in cooking. You can roast or boil the seeds and have them as healthy snack. Or you can boil them, peel and crush them and use in Chilla / Thalipeeth (Indian Pancake). Or dry the seeds and grind them. This flour can be stored for a long time and be used in Chilla / Thalipeeth (Indian Pancake). This can be used in any snack made for Fasting (Upas / Upwas) days. One another use of the seeds is to make a subji.
This subji does not use Onion and Garlic and yet it is tasty. This is a very easy recipe and does not require too many ingredients. You can cook this subji using Coconut Oil also.
Ingredients (Serves 2) (1 cup = 250 ml)
Jackfruit Seeds 1 cup
Green Chilies 3-4 with a slit lengthwise
Curry leaves 7-8 (optional)
Fresh Scraped coconut 2 tablespoon
Chopped coriander 1 tablespoon
Lemon Juice ½ teaspoon / Dry Mango Powder (Aamchur) ¼ teaspoon
Sugar ½ teaspoon (adjust as per taste)
Salt to taste
For Tempering / Tadka
Oil 1 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida (Hing) 2 pinch
Instructions
1. Wash Jackfruit Seeds properly. Cook them in Pressure Cooker with little water added while cooking. These seeds cook fast so make sure you don’t overcook them.
2. Upon cooling, peel the seeds (this is little tedious job). Chop them into slices or pieces as you like.
3. In a wok, heat oil on medium heat. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter.
4. Add Asafoetida, chilies, and curry leaves. (I always make small pieces of curry leaves so that one can easily eat them).
5. Add Jackfruit Seeds and turmeric powder. Mix.
6. Saute for 2-3 minutes. Add Sugar, Salt, Lemon juice / Aamchur, Scraped coconut, chopped coriander and mix.
7. Cook for 2 minutes. Tasty Jackfruit Seeds Bhaaji are ready.
8. Serve hot with Puri or Roti (Indian Bread) or relish it as it is.
==================================================================================
आठळ्यांची भाजी – खास कोकणी भाजी – कांदा लसूण विरहित
फणसाच्या आठळ्यांचे वेगवेगळे प्रकार करता येतात. आठळ्या भाजून किंवा उकडून खाता येतात. किंवा उकडलेल्या आठळ्या सोलून कुटून थालीपीठात घालता येतात. किंवा आठळ्या वाळवून त्याचं पीठ करून साठवून ठेवता येतं. हे पीठ उपासाच्या पदार्थात घालता येतं. किंवा आठळ्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये पडखळण म्हणून घालता येतात. किंवा आठळ्यांची भाजी करता येते.
कांदा लसूण न घालता केलेली ही भाजी अतिशय चविष्ट होते. साधी सोपी रेसिपी आणि साहित्य नेहमीचंच. ही भाजी कशाही सोबत छान लागते. ही भाजी खोबरेल तेलातही करू शकता.
साहित्य (२ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
फणसाच्या आठळ्या १ कप
हिरव्या मिरच्या उभ्या मधे कापून ३–४
कढीपत्ता ७–८ पानं (ऐच्छिक)
ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
लिंबाचा रस अर्धा टीस्पून/ आमचूर पाव टीस्पून
साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी
तेल १ टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग २ चिमूट
हळद अर्धा टीस्पून
कृती
१.फणसाच्या आठळ्या स्वच्छ धुवून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. आठळ्या लवकर शिजतात त्यामुळे कूकरमध्ये भातासोबत लावल्या तरी चालतात.
२.गार झाल्यावर आठळ्या सोलून त्यांचे उभे किंवा आडवे तुकडे करा.
३. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा. त्यात हिरवी मिरची आणि कढीपत्ता घाला. मी कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून घालते म्हणजे खाल्ले जातात.
४. आठळ्यांचे तुकडे कढईत घाला. हळद घाला आणि २–३ मिनिटं परतून घ्या.
५. आता मीठ, साखर, लिंबाचा रस / आमचूर, नारळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. २ मिनिटं परता.
६. आठळ्यांची चविष्ट भाजी तयार आहेत. गरम भाजी पोळी / भाकरीसोबत किंवा अशीच खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes