Akhkha Masoor (अख्खा मसूर) – Red Lentil Spicy Curry
Indian cuisine uses different types of whole Lentils and also in different ways. In Maharashtrian Kokani Brahmin kitchens, not many spices are used. The food is generally neither spicy nor pungent. But in regions on the other side of Sahyadris food is generally spicy and pungent. This recipe is famous in Satara, Kolhapur region. It uses Whole red Lentils. If you travel on Pune Bangalore Highway, you will see many restaurants, road side eateries advertising about this curry. For us, it’s very different than my other recipes. But it’s very tasty. Good to have it once in a while. If you like spicy food, you will love this.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Red Lentil (Whole Masoor) ¾ cup
Onions 2 medium
Grated Dry Coconut 2 tablespoon
Garlic Cloves 4-5
Tomatoes 2 medium
Kanda Lasun Masala 1 teaspoon
Chili Powder ½ teaspoon
Cinnamon 1 inch stick
Bay Leaf 1
Green Cardamom 1
Oil 2 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida a pinch
Curry Leaves 8-10
Jaggery ½ teaspoon (optional)
Chopped Coriander 2 teaspoon
Salt to taste
Instructions
1. Wash and Soak Red Lentils for 8 hours.
2. Sort soaked lentils to take out any hard lentils. Peel and Slice Onions. Slice Tomatoes.
3. In a pan, add 3 cups of water and bring it to boil. Turn the flame to low. Add Lentils, cardamom, cinnamon and bay leaf. Cook covered on low flame till lentils are soft.
4. In a wok, add ½ teaspoon oil. Add onions and saute on low flame for 3-4 minutes.
5. Add dry coconut, Garlic and saute on low flame till onions are translucent.
6. Add tomatoes and cook on low flame for 3-4 minutes.
7. Take out the mixture to a plate and Leave it to cool. Upon cooling, grind into a fine paste. Add little water if required.
8. In a wok, heat remaining oil. Add mustard seeds. Wait for splutter. Add Turmeric Powder, Asafoetida and Curry leaves.
9. Add cooked lentils along with the stock. Bring the mixture to boil.
10. Add Ground paste, Salt, Chili powder, Kanda Lasun Masala, Jaggery. Cook for 5 minutes. Adjust the consistency of curry by adding / reducing water.
11. Add chopped coriander. Switch off the gas.
12. Yummy spicy Red Lentil Curry is ready. Serve hot with Indian Bread or Bread or Rice.
==================================================================================
अख्खा मसूर – सातारा / कोल्हापूरची स्पेशालिटी
भारतीय स्वयंपाकात आपण बरीच कडधान्ये वापरतो. माझ्या कोकणी ब्राह्मणी स्वयंपाकात अगदी कमी (जवळजवळ नाहीतच) मसाले वापरून कडधान्यांच्या उसळी असतात. पण सह्याद्रीच्या दुसऱ्या बाजूला देशावर मसालेदार आणि तिखट पदार्थ आवडीने खाल्ले जातात. ही अख्खा मसूर त्यातलीच एक उसळ. सातारा, कोल्हापूर ची स्पेशालिटी. पुणे बंगलोर हायवे वर प्रवास करताना साताऱ्याच्या जवळपास ‘अख्खा मसूर‘ च्या पाट्या दिसायला लागतात. उत्सुकता म्हणून अशी उसळ करून पहिली आणि छान लागली. नेहमी खायला नाही पण कधीतरी चवीत बदल म्हणून ही मसालेदार चमचमीत उसळ छान वाटते. ही करायच्या पद्धती थोड्या वेगवेगळ्या असतील पण मी ही रेसिपी वापरून उसळ करते. नक्की करून बघा.
साहित्य (४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली)
मसूर पाऊण कप
कांदे २ मध्यम आकाराचे
किसलेलं सुकं खोबरं २ टेबलस्पून
लसूण ४–५ पाकळ्या
टोमॅटो २ मध्यम आकाराचे
कांदा लसूण मसाला १ टीस्पून
लाल तिखट अर्धा टीस्पून
दालचिनी १ इंचाचा तुकडा
तमालपत्र १
हिरवी वेलची १
तेल २ टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग १ चिमूट
कढीपत्ता ८–१० पानं
चिरलेला गूळ अर्धा टीस्पून (ऐच्छिक)
चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. मसूर धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा.
२. भिजलेले मसूर निवडून घ्या. कांदे , टोमॅटो उभे पातळ चिरून घ्या.
३. एका पातेल्यात ३ कप पाणी उकळून त्यात मसूर, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र घाला. झाकण ठेवून मंद आचेवर मसूर शिजवून घ्या.
४. एका कढईत अर्धा टीस्पून तेल घालून त्यात कांदा घालून मंद आचेवर ३–४ मिनिटं परतून घ्या.
५. कढईत खोबरं आणि लसूण घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत मिश्रण परतून घ्या.
६. कढईत टोमॅटो घालून ३–४ मिनिटं परता.
७. मिश्रण एका ताटलीत घालून गार करा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. जरूर पडल्यास थोडं पाणी घाला.
८. कढईत उरलेलं तेल घालून मोहरी, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.
९. फोडणीत शिजवलेले मसूर पाण्यासकट घाला आणि एक उकळी काढा.
१०. त्यात वाटलेलं मिश्रण, मीठ, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि गूळ घालून ढवळून घ्या आणि ५ मिनिटं शिजवा. भाजीला जेवढा रस हवा असेल तसं पाणी घाला किंवा पाणी आटवा.
११. चिरलेली कोथींबीर घाला. गॅस बंद करा.
१२. चविष्ट मसालेदार अख्खा मसूर तयार आहे. गरमगरम अख्खा मसूर पोळी / भाकरी / पाव / भातासोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes