Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके) – – Crispy and Healthy Snack using Monsoon Vegetable

Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)

Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके) – – Crispy and Healthy Snack using Monsoon Vegetable – No Onion Garlic recipe

फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके मराठी

Phodshi / Mulshi / Kuli is a leafy vegetable that grows on hillside in rainy season. It’s found in forest patches all over India. I could not find Hindi / English name for this vegetable. I’ve given a photo of raw vegetable in the post. Both green and white part of the leaves are eaten. So you just need to wash the leaves properly. I make a tasty crispy and healthy snack using this vegetable. You can serve this as a starter also. I don’t add Baking soda; still it’s crispy. This is a no Onion Garlic recipe.

Ingredients (1 cup = 250 ml)

Phodshi Leaves (फोडशीची पानं )

Phodshi leaves finely chopped 2 cups

Gram Flour (Besan) 1 cup

Rice Flour ½ cup

Oil 2 teaspoon

Green Chili Paste 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) ¼ teaspoon

Sesame Seeds 1 teaspoon

Salt to taste

Oil To Pan Fry

Instructions

1. Mix all ingredients (except oil required for Pan frying and water) in a bowl. Add water and make a batter of a consistency of thicker than Pan Cake batter.

2. Grease flat plates with oil. Apply some oil to your palms and Make oblong rolls of the batter. Place the rolls in the plate.

3. Steam for 20-25 minutes. Use either idli maker or pressure cooker without whistle.

Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)

4. On cooling cut into bite size discs about .5 to .75 cm thick.

5. These are ready to eat (more healthy) or

6. Shallow Fry using some oil. Healthy and crispy snack is ready.

7. Serve hot with chutney / sauce.

Tip

1. Alternatively You can deep fry the discs and serve.

2. Or Make a seasoning of Oil, Mustard seeds, cumin seeds and Asafoetida. Spread it on the steamed disc. Spread some fresh scraped coconut if you like and serve this healthy and tasty side dish/ snack.

Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)

==================================================================================

फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके बेकिंग सोडा न घालता कांदा लसूण विरहित

फोडशी / मुळशी / कुली ही पालेभाजी फक्त पावसाळ्यात मिळते. सर्वांच्या माहितीसाठी कच्च्या भाजीचा फोटोही टाकलाय पोस्ट मध्ये. भाजीचा हिरवा आणि पांढरा भाग दोन्ही घ्यायचे. पावसाळा सुरु झाला की ही भाजी डोंगरावर उगवते. मी ह्या भाजीचे मुटके करते. बेकिंग सोडा न घालता मुटके खुसखुशीत होतात. चहासोबत / जेवणात डावीकडे वाढायला अगदी छान आणि पौष्टिक पदार्थ आहे. पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून ही ठेवू शकता.

साहित्य (१ कप = २५० मिली)

Phodshi Leaves (फोडशीची पानं )

बारीक चिरलेली फोडशीची भाजी २ कप

बेसन एक कप

तांदुळाचं पीठ अर्धा कप

तेल दोन टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग पाव टीस्पून

तीळ १ टीस्पून

मीठ चवीनुसार

तेल तव्यावर घालायला

कृती

. एका वाडग्यात वर लिहिलेले सर्व जिन्नस घेऊन (तळण्यासाठीचं तेल आणि पाणी वगळून) एकत्र करा. आता थोडं थोडं पाणी घालून इडलीच्या पिठापेक्षा घट्ट मिश्रण बनवून घ्या.

. वड्या वाफवण्यासाठी इडली पात्रात किंवा मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा.

. सपाट ताटलीला तेल लावून घ्या. तळहाताला थोडं तेल लावून मिश्रणाचे लंबगोल मुटके करा आणि ताटलीत ठेवा.

. गरम करायला ठेवलेल्या पाण्याला उकळी आली की त्यात ताटली ठेवून झाकण लावून २०२५ मिनिटं वाफवून घ्या.

Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)

. गार झाल्यावर अर्धा ते पाऊण सेमी च्या चकत्या कापा.

. हे मुटके कच्च्या गोडेतेलात बुडवून असेच खाऊ शकता खूप चविष्ट आणि पौष्टिक असतात.

. किंवा तव्यावर तेल घालून चकत्या भाजून घ्या आणि गरमागरम खायला द्या.

टीप

. ह्या चकत्या तुम्ही तेलात तळूनही खाऊ शकता.

. किंवा तेलाची मोहरी, जिरं, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि ह्या चकत्यांवर घाला. हवं असल्यास थोडा खवलेला नारळ घाला. हे ही खूप छान लागतं.

Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)
Phodshiche Mutke (फोडशीचे / मुळशीचे खुसखुशीत मुटके)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes