Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर) – Ripe Banana Salad

Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)
Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)

Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर) – Ripe Banana Salad

केळ्याची कोशिंबीर मराठी

This is a traditional recipe of Salad using Ripe Bananas. It’s an easy recipe using the common ingredients. This curd based salad is very tasty and can be used as accompaniment with Roti or can be relished as it is. This can be a good option when you want to have light meal. One can have it on fasting days as well.

Ingredients (Serves 2-3) (1 cup = 250 ml)

Ripe Bananas 2

Curd about 1 cup (make sure curd is not sour)

Crushed Green Chilies ½ teaspoon

Sugar ½ to 1 teaspoon

Fresh scraped coconut 2 teaspoon

Chopped coriander 1 teaspoon

Salt to taste

Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch (optional)

Instructions

1. Peel Bananas. Make lengthwise 4 pieces of each Banana and chop into medium size pieces.

2. Transfer Bananas to a bowl.

3. Add Crushed chilies, salt, sugar, coconut, curd and mix.

4. Heat Ghee in ladle. Add Cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida. Pour this mixture in the bowl and mix.

5. Add chopped coriander, mix.

6. Serve Kelyachi Tasty Koshimbir with Roti or as Salad.

Note

1. This Salad releases water if you keep it for long. So keep all the ingredients ready and mix this salad just before serving.

Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)
Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)
Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)
Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

केळ्याची कोशिंबीर – सोपी स्वादिष्ट रेसिपी उपासालाही चालते

केळ्याची कोशिंबीर ही एक पारंपरिक रेसिपी आहे. माझी आजी, आई करायची ती ही रेसिपी. घरात नेहमी असणारं साहित्य वापरून केलेली ही स्वादिष्ट कोशिंबीर पानातली डावी बाजू सांभाळायला कधीही उपयोगी पडते. कधी हलका आहार घ्यायचा असेल तर फक्त ही कोशिंबीर खाता येते. उपासाच्या दिवशी बाकीच्या साबुदाणा, शेंगदाण्याच्या पदार्थासोबत ही दह्यातली कोशिंबीर खाल्ली तर पोटाला आराम मिळतो.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

पिकलेली केळी २

घट्ट गोड दही १ कप

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

साखर अर्धा एक टीस्पून

ताजा खवलेला नारळ २ टीस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

मीठ चवीनुसार

साजूक तूप १ टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग १ चिमूट (ऐच्छिक उपासासाठी करत असाल तर घालू नका)

कृती

. केळी सोलून त्याचे उभे चार तुकडे करा. आणि प्रत्येक तुकड्याच्या मध्यम आकाराच्या फोडी  करा.

. केळ्याच्या फोडी एका वाडग्यात घाला.

. त्यात मिरची, साखर, मीठ, नारळ आणि दही घालून नीट एकत्र करा.

. एका कढल्यात साजूक तूप घालून जिरं, हिंगाची खमंग फोडणी करा. फोडणी वाडग्यातील मिश्रणावर ओता. मिश्रण ढवळून घ्या.

. चिरलेली कोथिंबीर घालून केळ्याची स्वादिष्ट कोशिंबीर खायला द्या.

टीप

. २ तासांनंतर ह्या कोशिंबीरीला पाणी सुटतं. त्यामुळे जेवायच्या खूप आधी ही कोशिंबीर करू नका. सगळं साहित्य तयार करून ठेवा आणि आयत्या वेळी कोशिंबीर एकत्र करा.   

Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)
Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)
Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)
Kelyachi Koshimbir ( केळ्याची कोशिंबीर)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes